TB  Dainik Gomantak
ब्लॉग

क्षयरोग संपवण्यासाठी गुंतवणूक करा, जीवन वाचवा..!

दैनिक गोमन्तक

जगभरात 24 मार्च हा जागजिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या काळात क्षयरोग हा असाध्य प्रकारचा रोग नसला तरी अनेक वर्षांपूर्वी जगात त्या रोगामुळे महामारी पसरली होती व तो असाध्य ठरला होता. आजही क्षयरोगाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. त्यामुळे या रोगाबाबत (Disease) जनजागृती करण्याच्या हेतूने 24 मार्च हा दिवस क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती सुप्रसिध्द पल्मोनॉलॉजिस्ट डॉ. अनिका अनिल प्रभू पर्रीकर यांनी दिली. डॉ. अनिका पर्रीकर यांच्या या विषयावरील मुलाखतीचा हा भाग (March 24 is celebrated worldwide as World Tuberculosis Day)

क्षयरोगाला एवढे महत्त्व का?

क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे. जेव्हा एखादा क्षयरोगाचा रूग्ण खोकतो किंवा शिंकतो त्यावेळी त्याच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या थुंकीतील किंवा त्याच्या नाकातील थेंबांद्वारे या रोगाचा संसर्ग इतरांना होतो. या रोगापासून जगात दर वर्षी १० लाख क्षयरोग प्रकरणांची नोंद होते. तसेच जगात वार्षिक 1.5 दशलक्ष लोकांचा या रोगामुळे मृत्यू होतो आणि म्हणूनच हा रोग सांसर्गिक प्रकारच्या रोगांपैकी आजही जगातील सर्वात मोठा जीवघेणा रोग ठरला आहे. भारतात या रोग्यांचे प्रमाण जगाच्या तुलनेत २६ टक्के एवढे आहे. हा रोग केवळ फुफ्फुसांनाच बाधा पोचवतो असे नसून तो हृदय, मेंदू, पोट, हाडे, मूत्रपिंड व शरीराच्या अन्य भागांनाही बाधा पोचवू शकतो.

क्षयरोगाची लक्षणे कोणती?

फुफ्फुसांच्या क्षयरोग झाल्यास सर्वसामान्यपणे मोठ्या प्रमाणातील खोकला हे प्रमुख लक्षण असते. हा खोकला काही वेळा कोरडा असतो कफ बाहेर टाकणाऱ्या अशा प्रकारचा असतो. श्‍वास घेण्यात त्रास, हलका ताप जो संध्याकाळी वाढणारा असा असतो. रात्रीच्या वेळी खूप घाम येणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे किंवा भूक न लागणे, पोटदुखी, मासिक पाळीत अनियमितपणा, नपुंसकत्व, डोकेदुखी, फेंफरे अशी अनेक लक्षणे अशा रोगात दिसून येतात.

अशी लक्षणे दिसल्यास कोणाचा सल्ला घ्यावा?

अशी लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा आपणच कोणतीही औषधे घेऊ नका. त्याऐवजी लगेच तुम्ही तुमच्या डॉक्टरांची (Doctor) भेट घ्या. तुमचे डॉक्टर तुम्हाला एखाद्या पल्मोनॉलॉजिस्ट किंवा स्पेशालिस्टकडे जाण्याचा सल्ला देतील. क्षयरोगाचे योग्य वेळी निदान झाले आणि लगेच उपचार सुरू केले तर त्याचे चांगले परिणाम होतात.

क्षयरोगावर कोणते उपचार करावेत आणि उपचार न केल्यास कोणत्या गुंतागुंती निर्माण होतात?

एकदा एखाद्या व्यक्तीस क्षयरोग झाल्याचे निदान झाले की त्या रूग्णाला क्षयरोगविरोधी औषधे दिली जातात. रूग्णाला तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ३-४ प्रकारची औषधे ६ महिने कालावधीसाठी दिली जातात, मग त्याचा क्षयरोग कोणत्याही प्रकारचा असला तरी. न्युरोलॉजिकल किंवा स्पायनल किंवा हाडांचा क्षयरोग असल्यास अशा रुग्णावर ९ महिन्यांपासून एक वर्षांपर्यंत उपचार करणे आवश्‍यक असते ज्याचा निर्णय संबंधित डॉक्टर घेतात. ही औषधे सरकारी रूग्णालयांत तसेच खासगी इस्पितळांमध्येही सहजतेने उपब्ध असतात. फुफ्फुसांच्या क्षयरोग्यावर योग्य उपचार न झाल्यास त्याच्याबाबत गुंतागुंती निर्माण होतात. कोणत्या प्रकारचा क्षयरोग झाला आहे त्यावरही या गुंतागुंती अवलंबून असतात.

क्षयरोग आणि त्याच्या नियंत्रणावर कोविड - 19 महामारीचे परिणाम आहेत काय?

कोरोना विषाणू (Covid 19) महामारी येईपर्यंत क्षयरोग ही एचआयव्ही एडस्‌नंतरचा सर्वाधिक मृत्यूचे कारण ठरणारा सांसर्गिक एकेरी एजंट असलेला रोग होता. मात्र कोविड-१९ नंतर आलेल्या अहवालानुसार नव्याने क्षयरोग झालेल्यांच्या संख्येत घट झाली आहे.

जागतिक क्षयरोग 2022 ची संकल्पना काय आहे?

क्षयरोग्यांची आणि त्यामुळे येणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करणे आणि पर्यायाने २०३५ पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करणे ही एक संकल्पना आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र संघ या संस्थांनी ही महामारी संपवण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे २०१४-१५ साली स्पष्ट केले होते आणि त्यादृष्टीने त्यांनी लक्ष्य ठेवले होते. या संस्थांनी २०१८ साली एक उच्चस्तरीय बैठक घेऊन याबाबत ध्येयनिश्‍चिती केली. त्यात २०१८ ते २०२२ पर्यंत ४० दशलक्ष क्षयरोग्यांवर उपचार करणे, ज्यात ३.५ दशलक्ष लहान मुलांचे लक्ष्य ठेवले गेले. त्यात एचआयव्ही झालेल्या ६ दशलक्ष रूग्णांचा, ५ वर्षांखाली ४ दशलक्ष मुलांचा आणि अन्य वयोगटातील २० दशलक्ष रूग्णांचा समावेश होता. या सर्वांच्या परिणामस्वरूप २०२२ च्या क्षयरोग दिनाची प्रमुख संकल्पना आहे ती, ‘क्षयरोग संपवण्यासाठी गुंतवणूक करा, जीवन वाचवा...’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT