Manohar Parrikar  Dainik Gomantak
ब्लॉग

IIT मधून पदवीधर झालेले पहिले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले

दैनिक गोमन्तक

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आणि गोव्याचे मुख्यमंत्री होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मधून पदवीधर झालेले ते पहिले मुख्यमंत्री होते.

पर्रीकर यांनी 2014 ते 2017 पर्यंत भारताचे संरक्षण मंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये काम केले. नंतर 2017 च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांची नियुक्ती गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली. (Manohar Parrikar, the first Chief Minister to graduate from IIT)

राजधानी पणजीचा आणि भाजपचा, राज्याचा बुलंद आवाज म्हणून ओळख कायम राहीलेल्या दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची राजकीय कारकिर्द तशी संघर्षाचीच. भाजपला गोव्यात (Goa) शून्यातून सत्तेपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी पक्ष संघटनेच्या बांधणीतही त्यांनी हातभार लावला. भाजपकडे (BJP) सत्ता नव्हती, सरकार डळमळीत झाले त्यावेळी कार्यकर्त्यांत उत्साह कायम असावा यासाठीही ते झटले. त्यांना भाजप नेते लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar), दत्ता खोलकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली.

पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळत शस्त्रास्त्रे मिळवली, ज्यापैकी अनेक वर्षे अनेक वर्षांपासून अडचणीत होत्या. त्यापैकी 36 डसॉल्ट राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी करारासह दीर्घकाळ विलंबित असलेला MMRCA प्रकल्प होता. पर्रीकर लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य होते. आयआयटी मुंबईमधून पदवी मिळवल्यानंतर 2000 साली ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. 2000 ते 2005 या काळात पर्रीकरांनी गोव्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं. 2012 साली पुन्हा मनोहर पर्रीकरांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

प्रथमच राज्यात भाजप सत्तास्थानी आल्यानंतर ज्या योजना राबवल्या त्या योजनांच्या अंमलबजावणीत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचाही सहभाग होता, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्रीकर यांच्या मागे राहीला, प्रामुख्याने संघनेते सुभाष वेलिंगकर, रत्नाकर लेले यांचा त्यांत प्रामुख्याने समावेश होता. पर्रीकर संघाच्या मुल्यांना चिकटून राहीले नसले तरी त्या मुल्यांचा त्यांनी अनादर केला नाही हेही महत्त्वाचे. समन्वयाच्या राजकारणातून पर्रीकर यांनी पेडणे ते सत्तरी, काणकोणपर्यंत भाजप रुजवण्याचे प्रयत्न केले, मिशन सालसेतही झाले, त्यांत वैयक्तिक स्वार्थाऐवजी पक्षनिष्ठा अधिक होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT