Lighthouse of Betul Dainik Gomantak
ब्लॉग

बेतूलचे दीपगृह

दीपगृह चढून वर आलात की दूर पश्चिमेला साळ नदी समुद्राला जाऊन मिळतानाचे विहंगम दृश्य आपल्याला प्रभावित करते.

गोमन्तक डिजिटल टीम

Lighthouse of Betul बेतुलच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बाराडी टेकडीवरच्या दीपगृहाला तुम्ही कधी भेट दिली आहे का? सायंकाळी 4 ते 5 या काळात केवळ 20 रुपये शुल्क भरून तुम्ही या दीपगृहामध्ये प्रवेश करू शकता.

या दीपगृहामध्ये प्रवेश करताना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याच्या सूचना तिथल्या माणसांकडून देण्यात येतात. (त्याचे पालन करणे अर्थातच योग्य असते.) ‘कठड्याच्या फार जवळ जाऊ नका’ ही त्यापैकी अर्थातच एक महत्त्वाची सूचना असते.

दीपगृह चढून वर आलात की दूर पश्चिमेला साळ नदी समुद्राला जाऊन मिळतानाचे विहंगम दृश्य आपल्याला प्रभावित करते.

नदीच्या किनाऱ्याने रांगेने असलेल्या माडांचे शेंडे, दूरवरून समुद्राच्या लाटांची रांगेने किनाऱ्याच्या दिशेने होत असणारी वाटचाल, बेतुलच्या टोकाला असलेले वाळूचे शुभ्र टोक, नदीच्या रुंद विस्तारात हेलकावणाऱ्या बोटी या साऱ्यांची मिळून एक बिलोभनीय जादू तिथे तयार झालेली असते.

सूर्य पश्चिमेला झुकलेला असल्यामुळे पिवळसर प्रकाशाचे गारुड तिथल्या सबंध अवकाशात पसरलेले असते. अर्थात या दीपगृहावर पाचनंतर राहता येत नसल्यामुळे तिथल्या अपूर्व सूर्यास्ताची साक्ष होण्याची संधी मात्र हुकते. विरुद्ध बाजूला जाताच दूर पूर्व दिशेला दिसणाऱ्या पश्चिम घाटामधील डोंगरांच्या नीळ्या रांगांचे दृश्यही आपल्याला भारून टाकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT