गोव्यात खाजेकरांची खास मिठाई
गोव्यात खाजेकरांची खास मिठाई  निवृत्ती शिरोडकर
ब्लॉग

गोव्यात खाजेकरांची खास मिठाई

दैनिक गोमन्तक

शेती नुकतीच आटोपली आहे. हिवाळा (Winter) अगदी हाताच्या अंतरावर आला आहे. गुलाबी थंडी अवतरल्यानंतर जत्रेची दिवस आता सुरू होतील. गेल्या वर्षी जत्रांचा पूर्ण मोसम कोरोनामुळे सूना गेला. जग थोडेथोडे खुले व्हायला लागेल आत्ताच कुठे सुरुवात झाली आहे. देवळांची दारे खुली झाली आहेत. बहारदार जत्रांनाही आता सुरुवात होईल अशी आशा भाविकांच्या मनात पालवली आहे. जत्रेत इष्ट देव-देवतेचे दर्शन करून झाल्यानंतर प्रथम पाय वळतात ते खाजेकरानी जत्रेत थाटलेल्या दुकानांकडे. तिथे वर्षानुवर्षे आपल्या ओळखीच्या असलेल्या खाजेकराचे दुकान असतेच. आणि मग तिथे मांडून असलेल्या पिवळ्याधम्मक खाजे-लाडवांची चौकशी सुरू होते. दुकानदाराने परीक्षेसाठी दिलेल्या खाज्याच्या काडीचा एकेक तुकडा दातात मोडत आपल्या पसंतीची पावती खाजेकराला जाते आणि मग त्याचे खाज्याची ऑर्डर घेणे सुरू होते.

खाजे हा काही अगदी श्रेष्ठ स्वादिष्ट प्रकारात मोडणारा पदार्थ नव्हे. पण जत्रेत त्याला प्रसादासारखाच महत्त्वाचा मान असतो. ‘अमुक अमुक जत्रेचे खाजे’ अशी माहिती देऊन खाजे शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे पोचवले जाते. मग ते खाजे खाताना, खाणाऱ्यालाही त्या जत्रेची वारी केल्याचे समाधान मिळते. जीभेवरचा खाज्याचा गोड-तिखट स्वाद हा एका दीर्घ परंपरेची ओळख आपल्या रसनेद्वारे मनाला करून देतो आणि एक आत्मिक समाधानही देतो.

खाजेकर हा या साऱ्या संवेदनातला महत्त्वाचा दुवा. संगीतात जशी घराणी असतात तशी खाजेकर यांचीही घराणी आहेत. बापजाद्यांपासून खाज्याचा व्यवसाय त्यांच्या घराण्यात चालत आलेला असतो. ही सारी घराणी जत्रा-उत्सवाच्या निमित्ताने आपापली दुकाने जत्रेच्या त्या स्थानी थाटतात आणि या स्थानिक मेव्याच्या गंध –दरवळाची मैफल तिथल्या देव-देवतांच्या पाठबळावर संपन्न होते.

मांद्रे येथील महेश मांद्रेकर हा खाज्याच्या व्यवसायात आपल्या बालपणापासून आहे. गेली 64 वर्षे तो खाजे बनवतोय. त्याच्या हातच्या या स्वादिष्ट पदार्थांच्या चवीची ख्यती अशी आहे की स्थानिक आमदार देऊ मांद्रेकर यांनी महेश मांद्रेकर यांच्या हातचे पोहे त्याकाळचे उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना भेट म्हणून पाठवले होते. जेव्हा आमदारांनी महेशला सांगितले की आपण दिल्लीला चाललो आहोत आहे आणि त्याने बनवलेले पोहे ते उप-राष्ट्रपतींकडे पोचणार आहेत तेव्हा आपल्या आमदारांचे ते शब्द ऐकून महेशला काय वाटले असेल? त्याच्या व्यवसायाचा आणि हातच्या चवीचा यापेक्षा दुसरा गौरव काय असू शकतो?

महेशच्या आजोबांच्या काळापासून सुरू असलेला हा व्यवसाय महेश अजूनही जोमात चालवतो. खाजे, लाडू, फेणोरी, पोहे, भक्कम पेढे, बदामी हलवा, मैसूर पाक, काजू बर्फी हे सारे पारंपारिक पदार्थ त्याच्याकडे बनतात. त्याचे घर हेच इतर खाजेकरा प्रमाणेच महेशचेदेखील व्यवसाय केंद्र आहे. या साऱ्या मिठाया घरीच बनतात. घरची सारी मंडळी या व्यवसायात गुंतलेली असतात. ‘खाजेकारी’ हा एका प्रकारे गोव्याचा पारंपारिक ग्रामोद्योग आहे. आपली परंपरा अजून पसरावी असे त्याला वाटावे यातच त्याच्या या परंपरेचे महात्म्य दडलेले आहे. नाही का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT