जयाने स्त्रियांना बचत गटाच्या माध्यमातून बनवले सक्षम Dainik Gomantak
ब्लॉग

जयाने स्त्रियांना बचत गटाच्या माध्यमातून बनवले सक्षम

स्वयंसहाय्यता गट हे ग्रामीण भागातल्या महिलांसाठी (Women) एक मजबूत पाठबळ आहे.

दैनिक गोमन्तक

या आपल्या नव्या घरात (Home) 2000 साली राहायला आली. नवीन घर, मुले, नवरा, सासू यांच्या साऱ्या व्यापात व्यस्त असताना देखील आपले घरकाम आटोपल्यावर घराभोवती जी मोकळी जागा होती त्यात तिने भाजीपाला लावला होता, फुल-फळ (Fruits) झाडे वाढवली होती.

तिच्या माहेरची कालिंदीताई, ज्या स्वातंत्र्यसैनिक होत्या, तिच्या जवळपासच राहायच्या. एके दिवशी जया कालिंदीताईंना भेटायला गेली. ताईनी तिला सल्ला दिला की त्यांचा जो स्वयं-सहाय्यक गट (Self Help Groups) होता त्याची तिने सभासद (Member) व्हावे, थोडा वेळ जयाने त्यासाठी जपून ठेवावा. जया विज्ञान विषयाची पदवीधर आहे. तिने दहा वर्षे संगणक क्षेत्रात काम केले होते. कालिंदी ताईने सांगितलेले जयाला पटले. ती त्यांच्या गटाची सभासद झाली.

ती न चुकता गटाच्या बैठकीला जायची. तिची ती नियमितता पाहून गटाच्या सर्व सभासदांनी एकमताने निर्णय घेतला की जयाला गटाची अध्यक्षा बनवायचे. त्यानंतर 2004 सालापासून ती या गटाची अध्यक्षा म्हणून काम सांभाळते आहे. गटाचं नाव होते, ‘साई श्रद्धा’. 2016 मध्ये जिल्हा ग्रामीण विकास (District Rural Development) संस्थेच्या ‘स्त्री शक्ती’ या योजनेत ‘साई श्रद्धा’ गटाचे विलीनीकरण करण्यात आले व या ग्रामसंघाचे नाव ‘उन्नती’ ठेवण्यात आले. या सर्व ‘उन्नती ग्राम संघांची अध्यक्षा म्हणून जयाची निवड (Selection) करण्यात आली. गटाच्या सर्व सभासदांनी संघटित होऊन काम केल्याने गटाची ताकद वाढते. त्याचप्रमाणे, प्रत्येक गटाच्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घेतल्याने सदस्यांचा आत्मविश्वास वाढतो. बचत गटाच्या सर्व सभासदांचा विकास (Development) व्हावा व त्या अधिक स्वावलंबी (Self-reliant) व्हाव्यात म्हणून जया वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करायला लागली. जया म्हणते, स्वयंसहाय्यता गट हे ग्रामीण भागातल्या महिलांसाठी (Women) एक मजबूत पाठबळ आहे.

उन्नती ग्राम संघाच्या महिलांना (Women) जास्तीत जास्त लाभ व्हावा म्हणून तिने मंजू वेर्णेकर, किरण पर्वतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यशाळांचे आयोजन करून गटाच्या महिला सभासदांना प्रशिक्षित केले. या महिलांना प्रशिक्षित करताना तिच्यासमोर एक प्रश्न आला तो महिलांच्या आरोग्याचा (Women Health ). त्यासाठी तिने आरोग्य शिबिराचे आयोजन करून महिलांना होणारे आजार कसे ओळखायचे व घरच्या घरीच आपण कशी काळजी घ्यावी, व्यायाम (Yoga) , सकस आहार (Healthy Diet) इत्यादी संबंधी महिलांना मार्गदर्शन (Guidance) करण्यात करण्यात महत्वाचा उचलला.

उन्नती ग्रामसंघाचे सभासद दरवर्षी गणेश चतुर्थी, दिवाळी या सणांच्या वेळी स्टॉल घालून त्यांनी स्वत: बनवलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करतात. दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या ‘सरस’ प्रदर्शनात या ग्रामसंघाच्या महिला (Women) सभासदांनी तयार केलेले पारंपरिक खाद्यपदार्थ व इतरही वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. विक्री चांगली होते आणि महिलांना (Women) आर्थिक मदतदेखील होते. त्यामुळे त्यांचा व त्यांच्या घरच्यांचा आत्मविश्वासही वाढतो. आपण घरबसल्या उद्योग करू शकतो याची या सभासदांना आता खात्री झाली आहे. आता गावातुन देखील त्यांना लहानसहान कार्यक्रमात खाद्यपदार्थ बनवून देण्याची ऑर्डर मिळते. ‘उन्नती ग्राम संघा’ची प्रगती बघून जिल्हा ग्रामीण संस्थेच्या संचालिका मीना गोलतेकर यांच्या नेतृत्वाखाली सरकारी इमारतीत ‘उन्नती ग्रामसंघ विक्रीकेंद्र’ सुरू झाले आहे. हे सर्व काम करत असताना जया व तिच्या ग्रामसंघाच्या महिला (Women) सभासद आपल्या घराकडे दुर्लक्ष करत नाहीत. हा सारा घरगुती व्यवहार घरच्यांच्या सहकार्यानेच चालतो. घर आणि गृहोद्योग यांचा मेळ जयाने साध्य आणि यशस्वी करून दाखवला आहे.

- भारती बांदोडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Goa Government Jobs: 'निवड आयोगा'तर्फे विविध खात्‍यांतील रिक्‍त पदांची भरती! 24 तासांत लागणार निकाल

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

SCROLL FOR NEXT