लोककलांचा आविष्कार ! Dainik Gomantak
ब्लॉग

गोवा ही लोककलेची खाण...

‘साधना डेल आर्ट’! एक नव्यानेच उदयाला येणारे ते एक सांस्कृतिक (Culture) केंद्र आहे

दैनिक गोमंतक

पणजीच्या (Panaji) अगदी जवळच वसलेल्या मेरशी गावात पोर्तुगिज (Portugal) शैलीचे स्थापत्य असलेला एक देखणा बंगला आहे, ‘साधना डेल आर्ट’! एक नव्यानेच उदयाला येणारे ते एक सांस्कृतिक (Culture) केंद्र आहे असे म्हणायला हरकत नाही. हे केंद्र गेल्या डिसेंबर 2020 पासून ‘नाटक डॉट कॉम’ द्वारे चालवले जात आहे, जिथे भारताल्या वेगवेग़ळ्या भागातले ग्रामीण कलाकार (Artist) त्यांच्या हस्तकलेचे प्रदर्शन करत आहेत. कोविड (Corona) काळाने ह्या कलांकारावर फार मोठा आघात केला होता.

एकाप्रकारे त्या कलाकारांच्या (Artist) पुनर्वसनाचा हा प्रयत्न आहे. वर्षभर विविध राज्यातील पारंपारिक संगीत (Music) व हस्तकलांचे प्रदर्शन ही संस्था भरवत असते. अलीकडेच पश्चिम बंगालमधील खापा व साथींचा बाउल हा लोकप्रिय लोकसंगीताचा कार्यक्रम येथे पार पडला. दर्यापूर, पश्चिम बंगालमधील मुकुल हे डोक्रा हस्तकारागिर, शांतिपूरमधील बाप्पदित्या हे बंगाली हातमाग कलाकार व गोव्यातील डिचोलीच्या मालकमी लाडू शेठ हे चिनी मातीच्या भांडी बनवणारे कारागिर या साऱ्यांचे हस्तकला प्रदर्शन (Handicraft Exhibition) या संस्थेत भरले होते. गोव्यात (Goa) या संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारांना एकत्र आणून सुफी महोत्सव (Sufi Festival) घडवून आणला होता व त्याला उत्तम प्रतिसादही लाभला होता.

सध्या ‘साधना डेल आर्ट’मधे ‘बांगला नाटक डॉट कॉम’ने राजस्थान व तामिळनाडूमधील (Tamil Nadu) पारंपारिक हस्तकारागिरांचे प्रदर्शन (Handicraft Exhibition) भरवले आहे व ते सहा डिसेंबरपर्यंत सुरू राहील. शिवाय या प्रदर्शनादरम्यान गाजी खान व जमील खान या राजस्थानमधील (Rajasthan) कलाकारांचे संध्याकाळी चार ते रात्री आठपर्यंत मांगणियार हे अत्यंत लोकप्रिय लोकसंगीतही सादर होत असते..

गाजी खान हे मांगणियार जमातीमधील जयसिंधेर गावचे. त्यांचे वडील उस्ताद भुंगर खान हे मांगणियार मधील बुजूर्ग आणि अधिकारी व्यक्ती होते. गाझी संगीतमय वातावरणात लहानाचे मोठे झाले आणि त्यांनी वडिलांकडून विविध पारंपरिक गाणी (Song) शिकली. कालांतराने तो त्याच्या अद्वितीय आवाजाने आणि भावपूर्ण सादरीकरणाने एक उत्कृष्ट गायक म्हणून विकसित झाला. विविध राष्ट्रीय उत्सवांसोबतच गाझीने पॅरिस, न्यूझीलंड, मॉस्को आणि कैरोसह आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सादरीकरण केले आहे. आता त्यांनी आपल्या समाजातील मुलांना पारंपारिक ज्ञान आणि कौशल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्याना साथ देणारे जमील खान मंगणियार हे सियानी गावातील प्रसिद्ध मंगनियार गायक आणि सिद्धहस्त वादक आहेत. जमील भजन गायकीसाठी ओळखले जातात. गेली 20 वर्षे ते गात आहेत आणि अनेक टीव्ही (TV) आणि रेडिओ (Radio) कार्यक्रमांसाठी त्यानी सादरीकरण केले आहे. त्यांनी आपल्या भावपूर्ण संगीताने अनेक देशांमधल्या रसिकाना रिझवले आहे.

तामिळनाडुमधील(Tamil Nadu0 पी. एम मुर्गी हे फायबर कलेतले सिद्धहस्त कारागीर आहेत. त्यांनी आतापर्यंत सातशे पन्नास महिलांना (women) या कलेत (Art) प्रशिक्षित केले आहे. त्यांच्या प्रशिक्षण केंद्रालाराष्ट्रीय पुरस्कार (Award) लाभला आहे. हेंभू राम यांना ऍप्लिकची कला त्यांच्या वडिलांकडून वारसाहक्काने मिळाली, जी त्यांची कौटुंबिक परंपरा आहे आणि 15 वर्षांपासून ते या कलाकृती करत आहेत. गेल्या वर्षीपासून ते भारतात (India) विविध ठिकाणी प्रदर्शने भरवत आहेत. हे हस्तकला प्रदर्शन ‘साधना डेल आर्ट’मधे दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत खुले असते. सायंकाळी 4 वाजल्यापासून मांगणियार या जगप्रसिद्ध लोकसंगीताच्या सादरीकरणाला तिथे सुरुवात होते.

- नितीन कोरगांवकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT