Humorous literature Dainik Gomantak
ब्लॉग

होय, विनोदी साहित्य हे सुद्धा साहित्यच!

कापडी मराठीतील इतर विनोदी साहित्यिक यांच्याबरोबरीने सातत्याने आणि व्रतस्थपणे अजूनही लिहीत आहेत.

दैनिक गोमन्तक

विजय कापडी हे मराठी विनोदी साहित्यिकांचीच्या (Humorous literature) मांदियाळीतीले एक महत्वाचे नाव. गणित व संख्याशास्त्र या रुक्ष विषयांचे पदवीध. ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ (Reserve Bank of India) मध्ये 36 वर्षे नोकरी. डेप्युटी जनरल मॅनेजरपदावरून सेवानिवृत्त! 1961 पासून आजतागायत विनोदी बाजाचे लेखन. 40 पुस्तके प्रकाशित. पाच पुस्तकांना मानाचे पुरस्कार. 2005 पासून ते आजतागायत सतत सोळा वर्षे गोव्यातील दैनिकांसाठी दैनंदिन तसेच स्फुट लेखन. निवडक स्फुट लेखनांचे तेरा संग्रहही प्रकाशित. ही त्यांची आजतागायतची साहित्य क्षेत्रातली एकूण मिळकत.

मराठी साहित्य समीक्षेचा आढावा घेतल्यास समीक्षेने विनोदी वाङयाकडे दुर्लक्षित केल्याचे दिसून येते. ‘टवाळा आवडे विनोद’ असे संत रामदासस्वामींनी खूप वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे. पण या सगळ्यांकडे विशेष न लक्ष देता, कापडी मराठीतील इतर विनोदी साहित्यिक यांच्याबरोबरीने सातत्याने आणि व्रतस्थपणे अजूनही लिहीत आहेत.

विनोद हीसुद्धा काव्यासारखीच उत्स्फूर्त पण अत्यंत भिन्न प्रकारची तितकीच महत्त्वाची वाङययीन ललित शाखा आहे. हे श्री कृ. कोल्हटकर यानी ‘सुदाम्याचे पोहे’ या आपल्या विनोदी लेखनाने मराठी रसिकतेला सर्वप्रथम 120 वर्षांपूर्वी जाणवून दिले. याच पुस्तकाने कोल्हटकरांना ‘मराठी विनोद विद्यापीठाचे आद्य शंकराचार्य’ ही पदवीही मिळवून दिली आणि मराठी विनोदी साहित्यात गुरु-शिष्य परंपरा ही सुरू झाली. कोल्हटकर-राम गणेश गडकरी-आचार्य अत्रे ही दिग्गज नावे मराठी साहित्य पटलावर झळकली.

चिं. वि. जोशी यांच्या ‘चिंतामणराव आणि गुंड्याभाऊ’ या मानसपुत्र जोडगोळीने मराठी विनोदी साहित्यामध्ये धम्माल उडवून दिली आणि विनोदी साहित्याला उपहासाऐवजी परीहासाची दिशा दाखवून दिली. आणि मग शामराव ओक, कॅप्टन गो गं. लिमयेबुवा, वसंत सबनीस, बाळ गाडगीळ, रमेश मंत्री अशी कितीतरी विनोदी लेखकांची पलटणच निर्माण झाली. मराठी जनमानसाचे लाडके पु. ल. देशपांडे हेसुद्धा याच पलटणीतले.

गंगाधर गाडगीळ, जयवंत दळवी, मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले, अवधूत पालकर, डॉक्टर अरुण नासिकर, डॉक्टर र. म. शेजवलकर, भा. ल. महाबळ, सुधीर सुखटणकर, वसंत मिरासदार, उत्तम सदाकाळ. प्रा. साईनाथ पाचारणे अशा कितीतरी विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांनी विनोदी वाङमयाच्या परंपरेचे पालन करत, वाङमयातल्या स्वतःच्या स्वतंत्र वाटाही निर्माण केल्या.आपल्या गोव्याच्या डॉक्टर सुभाष भेंडेयांना विसरून कसं चालेल? तात्पर्य, साहित्य क्षेत्रातील कितीतरी दिग्गजानी सकस आणि समृद्ध विनोदी साहित्य निर्मिती करून विनोदी साहित्याचा एक लक्षवेधी प्रवाह निर्माण केला.

विजय कापडी हेसुद्धा त्याच परंपरेतले. ‘होय, विनोदी साहित्य हेसुद्धा साहित्य आहे!’ असे आग्रहपूर्वक सांगणारे गोमंतकीय विनोदी ज्येष्ठ कथाकार. त्यांनी गोमंतकीय साहित्यामध्ये विनोदी कथांचा स्वतंत्र संग्रह स्वतंत्र प्रवाह निर्माण करून समीक्षकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले.

ज्येष्ठ साक्षेपी समीक्षक डॉक्टर प्रल्हाद वडेर कापडींच्या कथांची लेखन वैशिष्ट्ये सांगताना म्हणतात की त्यांचा विनोद माणसांच्या वृत्ती प्रवृत्तींशी निगडित असल्याने तो शिळा होत नाही. त्यांचे नायक - नायिका बहुधा सारस्वत समाजातील असतात, हे त्यांच्या ‘साखरदांडे’, ‘बोरकर’, ‘पिसुर्लेकर’ इत्यादी आडनावावरून कळते. अर्थात, केवळ नावापलीकडे या समाजाचा किंवा गोमंतकीयत्वाचा त्यांनी उपयोग केलेला दिसत नाही. ज्येष्ठ समीक्षक अनंत मनोहर म्हणतात की कापडींची दृष्टीच विनोद ओळखणारी आहे. त्यांना परिस्थिती व व्यक्तीचा स्वभाव आव्हान करतो.

विजय कापडींची अठ्ठाविसाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे साहित्याची प्रतिष्ठा आणखीही उजळेल आणि ‘विनोदी साहित्य हे सुद्धा साहित्यच आहे’ या सत्याला उजाळा मिळेल.

- नारायण महाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Merchant Trophy: टीमच्या 168 धावा, त्यात सलामीवीराचे शतक! गोव्याच्या 'अदीप'ची झंझावाती खेळी; आंध्रची सामन्यावर मजबूत पकड

Cooch Behar Trophy 2025: गोव्याच्या लेगस्पिनरची कमाल! टिच्चून मारा करत पटकावले 6 बळी; चंडीगडविरुद्धचा सामना रंगतदार अवस्थेत

Pilgao Mining: 'धडधडीमुळे झोप लागत नाही'! खाणवाहतुकीविरुद्ध ग्रामस्थ संतप्त; रस्त्यावर उतरून अडवले ट्रक Watch Video

Goa ZP Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्‍या! जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी 8,69,356 मतदार बजावणार हक्क; 5 तृतीयपंथीय मतदार रिंगणात

Goa Liberation Day 2025: गोवा मुक्तीचा 'तो' ऐतिहासिक लढा...! संयुक्त राष्ट्रात भारतासाठी रशियाने घेतला संपूर्ण जगाशी पंगा; फेल झाली अमेरिका-ब्रिटनची चाल

SCROLL FOR NEXT