गोमंतक मराठी साहित्य संमेलनातून दिशादर्शन व्हावे!

कोरोना महामारीनंतर (Corona) होणारे हे संमेलन गोमंतकातल्या मराठी साहित्य अभिवृद्धीच्या दृष्टीने दिशादर्शक ठरण्याची गरज आहे.
गोमंतक मराठी साहित्य संमेलनातून दिशादर्शन व्हावे!
गोमंतक मराठी साहित्य संमेलनातून दिशादर्शन व्हावे!Dainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे (Pernem) तालुक्यातील विर्नोडा गावातल्या सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयात गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सुरू होत आहे. कोरोना महामारीनंतर (Corona) होणारे हे संमेलन गोमंतकातल्या मराठी साहित्य अभिवृद्धीच्या दृष्टीने दिशादर्शक ठरण्याची गरज आहे.

1935 साली पोर्तुगीज (Portugal) राजवटीत मडगाव (Margao) येथे गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे पहिले साहित्य संमेलन झाले. त्यावेळी मराठी साहित्यसृष्टीतले सकस कादंबरीकार आणि लेखक वि. स. खांडेकर इथल्या साहित्यिकांना ऊर्जा देण्यासाठी उपस्थित होते. गोव्यातील (Goa) मराठी संस्कृतीचे बाळकडू प्राशन केलेल्या त्यावेळच्या विद्वजनांनी बहुजन समाजात साक्षरता आणि सुशिक्षितपणा वाढीस लागावा म्हणून मराठी भाषेतील शिक्षणाचा पाठपुरावा करण्याचा ठराव मंजूर केला. केवळ साहित्य अभिवृद्धी आणि चर्चा यांच्यापुरते हे संमेलन मर्यादित न राहता त्यांनी मराठी शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यामुळेच गोव्यात (Goa) पूर्वापार चालत असलेल्या मराठी परंपरेला अधिष्ठान लाभले.

महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी साहित्य संमेलनाची परंपरा असताना इथल्या प्रादेशिक मराठी अस्मितेचे भरण-पोषण व्हावे, गोव्यातल्या मातीत पूर्वापार रुजलेल्या मराठी साहित्य, नाट्यकलेला व्यासपीठ देण्याच्या दृष्टीने या संमेलनाने वेळोवेळी योगदान दिलेले आहे. गोव्याची (Goa) भूमी पोर्तुगिजांच्या (Portugal) जोखडातून मुक्त व्हावी आणि ही भूमी भारत (India) भूमीशी एकजीव व्हावी, या ध्येयाने या संमेलनाने मार्गदर्शन केलेले आहे.

गोवा (Goa) मुक्तीनंतर १९६२ साली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन भरले आणि उपस्थित साहित्यरसिकांना मराठी संस्कारांबरोबरच भारतीय विचार परंपरेच्या वैभवाचे दर्शन झाले. पश्चिम किनारपट्टीवरचा गोवा (Goa) भारतापासून वेगळा व्हावा म्हणून प्रयत्न करणाऱ्यांचे स्वप्न भंग पावले. दामोदर अच्युत कारे, बा. भ. बोरकर, लक्ष्मणराव सरदेसाई अशा एकापेक्षा एक थोर गोमंतकीयांनी या संमेलनाला समृद्ध करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. गेल्या 12 वर्षांचा खंड पडलेल्या या संमेलनाला पेडणेत (Pernem) आयोजित करण्याचा निर्णय गोमंतक साहित्य सेवक मंडळाने घेऊन कोविड काळात साहित्यसृष्टीवर निर्माण झालेल्या काजळीला दूर करण्याची धडपड आरंभलेली आहे.

गोमंतक मराठी साहित्य संमेलनातून दिशादर्शन व्हावे!
विद्यार्थ्यांचा ‘पोपट’ होऊ नये म्हणजे झालं!

पेडणे (Pernem) ते काणकोणपर्यंत (Canacona) गोमंतकात पूर्वापार वास करत असलेल्या भारतीय धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञानाला अधिष्ठान देण्याची कामगिरी गोव्यातल्या (Goa) मराठी भाषेने केली आहे. पेडणेतील (Pernem) ताविर्नोडा हा तालुक्याच्या क्षात्रधर्मीय परंपरेला जागृत ठेवणारा गाव आहे. भारतीय संगीत(Music) , नाटक (Drama), साहित्य यांना समृद्ध करणारी थोर व्यक्तिमत्त्वे पेडणे (Pernem) तालुक्याने दिलेली आहेत. संत सोहिरोबानाथ आंबिये यांनी त्यावेळी सावंतवाडी संस्थानात येणाऱ्या पेडणे महालात हरिभजनाने काळ व्यतीत करण्यासाठी भगवदभक्तीची गुढी समर्थपणे रोवली. नैराश्याने ग्रासलेल्या मनाला ऊर्जा प्रदान केली.

अशा पेडणे (Pernem) तालुक्यात गोमंतकीय साहित्यिक विजय कापडी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन संपन्न होत आहे. गोव्याची (Goa) अस्मिता समृद्ध करण्यात मराठीचे योगदान गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू आहे. यंदाचे हे संमेलन गोमंतकातल्या मराठी भाषा, संस्कृतीला नवी दिशा देणारे ठरो. आज गोवा (Goa) स्वतंत्र राज्य म्हणून भारतीय संघराज्यात कार्यरत आहे. दिशाहीन पर्यटन, चंगळवादी संस्कृती (Culture) यांमुळे गोव्याचे अस्तित्व संकटग्रस्त बनले आहे. गोव्यातील (Goa) जल, जंगल, जैविक संपदा, जमीन आणि जीवन केंद्रित संस्कृती टिकविण्याच्या दृष्टीने या संमेलनाने दिशादर्शन झाले तर ते या भूमीच्या समृद्धीला पोषक ठरेल.

राजेंद्र पां. केरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com