Indian Workers Dainik
ब्लॉग

Indian Workers: अनिश्चित वेतनापायी असंघंटित कामगारांची फरफट!

Indian Workers: निश्‍चित वेतन नाही, कामाची हमी नाही, कुटुंबासाठी योजना नाहीत, भविष्याबद्दलची तरतूद नाही अशा अनेक समस्यांनी असंघटित कामगार ग्रासलेला आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Workers: देशाच्या विकासात कामगार लोकांचा मोठा हातभार असतो. कुठलाही उद्योग व्यवसाय कामगाराशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. भारतात लोकसंख्या जास्त आणि बेकारीची समस्या मोठी असल्यामुळे उद्योगधंदे काढताना कामगारांना कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले जाते. देशात मोठ्या प्रमाणात यंत्रे वापरण्यास ‘1991 आर्थिक धोरणा’मुळे सुरू झाली.

उद्योग व्यवसायात कामगार दोन प्रकारे विभागले जातात. पहिल्या प्रकारात कामगार हा संघटित असतो. त्यामुळे कामगारांना चांगला पगार, नोकरीची हमी, चांगली सुविधा, सगळ्या सोयी, भविष्याबद्दलची तरतूद किंवा पेन्शन, संघटित कामगार आपल्याबरोबर कुटुंबाला चांगले जीवन देतात. त्यांना व त्यांच्या कुटुंबाला कसलाच त्रास होणार नाही ह्याची काळजी मालक वर्ग घेतात. संघटित कामगारांचे जीवन सुरक्षित असते आणि त्यांचा फायदा उद्योजकांना होतो, यात मुळीच शंका नाही.

विखुरल्याने संघटन अडचणीचे:

असंघंटित कामगार हा सगळीकडे पसरलेला आहे. उद्योग व्यवसायात रोजगारीवर काम करणारा, शेतात मोलमजुरी करणारा, लहान-लहान दुकानात आणि हॉटेलात काम करणारा, बांधकामक्षेत्रात काम करणारा अशा अनेक व्यवसायात काम करणारे कामगार असंघटीतपणे काम करत असतात.

त्यांना पगार किंवा मजुरी कमी मिळते, सतत कामाची हमी नाही, राहण्याची चांगली सोय नाही, मुलांच्या शिक्षणाची सोय नाही, चांगले आरोग्याची सुरक्षा नाही, भविष्याबद्दलची तरतूद नाही किंवा पेन्शन नाही अशा अनेक समस्यांनी असंघटित कामगार ग्रासलेला आहे. मालकांना कमी पगार किंवा मजुरी दिल्यामुळे फायदा असतो म्हणून ते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उदासीन असतात. असंघटित कामगार हे अनेक उद्योगधंद्यात विखुरले असल्याने त्यांचे एकसंघटन होणे मुश्किल आहे.

हंगामावरच रोजगार:

असंघंटित कामगारांना त्यांच्या नेत्याचे मार्गदर्शन मिळत नाही. त्यांची संघटना स्थापन करण्यास मिळत नाही. कारण कुणीच एकमेकांशी संघटित नसतात. बहुतांश कामगार हंगामी असतात आणि हंगामपूरक कामगारांचे मर्यादित काळापुरतेच काम असते.

गोव्यात पर्यटन व्यवसाय हा सीझनवर आधारित असतो. पावसाळ्यात समुद्रकिनारी हॉटेल्स बंद ठेवतात. त्यामुळे त्यांना सक्तीची सुट्टी दिली जात. सिझन सुरू झाल्यावर परत बोलावतात किंवा नवीन कामगार ठेवतात. त्यांना कायमची नोकरी नसते आणि नोकरी केव्हा जाईल, ह्याची शाश्‍वती नसते.

सुरक्षा व्यवस्थेचा अभाव:

सरकारी कार्यालयात कायम नोकरी असते म्हणून गोव्यातील प्रत्येकाला सरकारी नोकरी पाहिजे असते. नोकरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे असते ती सुरक्षा आणि ती असंघटीत कामगारांना मिळत नाही. काम दररोज मिळत नसल्यामुळे उत्पन्न कमी होते पण खर्च तसाच राहतो किंवा वाढत असतो.

त्यांना आरोग्यासाठी सुरक्षा योजना नसते, काहीजण काम करतानाच अपघाताने वा घटनेने दगावतात. बांधकाम क्षेत्रात काम करताना अनेकांना आयुष्य गमवावं लागतं. त्यांच्यासाठी काही सुरक्षा व्यवस्था नसते. कामगार लोकांना काही झालं तर नंतर त्यांचं कुटुंबाला रक्षण करण्यासाठी कुणी नसतं आणि राज्य सरकारची तशी खास योजना देखील नाही.

सामाजिक सुरक्षा मंडळाची गरज:

असंघटित कामगारांची समस्या सोडविण्याची जबाबदारी सरकारवर येते. त्यासाठी सरकारने चांगले कायदे करून ते राबवावेत. कामगारांना चांगला पगार मिळण्यासाठी किंवा चांगल्या सुविधा मिळण्यासाठी राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्याची तरतूद सामाजिक सुरक्षा कायदा 2008 मध्ये आहे.

हल्लीच काही कामगार वर्गाचे काही नेते व हितचिंतकांनी कायदा मंत्र्यांची भेट घेऊन कामगारांसाठी राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. या मंडळामध्ये कामगार, मालक, काही तज्ज्ञ, लोकप्रतिनिधींची समावेश असतो. मंडळाला असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी काही सवलतही सुरू करता येतात किंवा सुचवू शकतात. त्यांच्या पगार वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी काही ठोस पावलं उचलू शकतात.

परप्रांतीय कामगारांची आवश्‍यकता:

गोव्यात प्रत्येक क्षेत्रात कामगार परप्रांतीय आहेत. त्यांच्यामुळेच बहुतांश कामे होतात हे विसरून चालणार नाही. त्याच बरोबर त्यांना चांगली सुविधा आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. गोव्यात इतर राज्याच्या मानाने कामगारांना चांगला पगार मिळतो.

सरकारच्या कमी पगाराच्या धोरणानुसार सध्या 392 रुपये पगार उद्योगधंद्यातील कामगारांना मिळतो. बांधकाम क्षेत्रातील किंवा इतर क्षेत्रात गोव्यात कामगार कमी आणि कामाची मागणी जास्त असल्यामुळे कामगार मजुरी पाहिजे तशी वाढवून सांगतात. त्याला पर्याय नसल्यामुळे गोव्यातील कामगारांना चांगली मजुरी मिळते.

शहरात त्यांना घराचं भाडं देणं परवडत नाही म्हणून काही लोक बेकायदेशीरपणे डोंगरावर घरे बांधून राहतात. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे गोव्यात आणखी काही समस्या निर्माण झाल्या तरीसुद्धा परप्रांतीय कामगारांशिवाय गोव्यात विकास होणे मुश्किल आहे, हे देखील तितकेच खरे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

SCROLL FOR NEXT