Goa Dainik Gomantak
ब्लॉग

उत्तरांनी निर्माण केलेले प्रश्‍न

क्षत्रिय आणि ब्राह्मणांनी गोव्यातील झुआरीपर्यंत केलेला धाडसी प्रवास हा निव्वळ योगायोग होता का?

गोमन्तक डिजिटल टीम

तेनसिंग रोद्गीगिश

गोव्यातील लोकांचे मूलस्थान कुठले असेल, हे शोधताना आपल्या हाती बरेच धागेदोरे गवसले आहेत. त्यांचेच सूत्र पकडून आता आपल्याला पुढे जायचे आहे. जरी इतक्या हजारो वर्षांच्या कालखंडात याचे ठोस पुरावे हातून निसटले असले तरीही, जे काही उपलब्ध आहे, त्यावरून काढलेल्या निष्कर्षांना ‘सुतावरून स्वर्ग गाठणे’, असे म्हणणे योग्य होणार नाही.

या लेखमालेतील अनेक लेखांमध्ये आपण जो शोध घेत आलो आहोत, त्याचे धागे एकत्र करून काही ठोस निष्कर्ष काढता येणे शक्य आहे.

मागे लिहिलेल्या एका लेखात मी असे म्हटले होते की, काठियावडा (काठियावाड) द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्यावर गोमती नदीच्या मुखाशी असलेल्या प्राचीन यादव शहराचे नाव कुशस्थी होते, मथुरेहून तिथे गेल्यावर कृष्णाने आपली नवीन राजधानी द्वारका बांधली होती.

कुशस्थळी सुमारे ६,००० वर्षांपूर्वी पाण्यात बुडाली असावी असे मानले जाते; म्हणजे ख्रिस्तपूर्व सुमारे ७,५००. हा कालावधी हिमयुगाचा शेवटचा टप्पाही आहे. अशीच नगरी जी बुडाली ती यादव राजा रैवताने बांधली होती.

त्या बुडालेल्या कुशस्थळीचा आणि गोव्यातील झुआरी नदीच्या मुखाशी असलेल्या कुशस्थळी(कुठ्ठाळी)चा काही संबंध जुळतो का, हे पाहण्याचा आपण प्रयत्न मागे एका लेखामधून केला होता. त्या प्रलयातून वाचण्यासाठी क्षत्रियांच्या एका गटाने तेथून स्थलांतर करून समुद्रमार्गे गोव्याचा किनारा गाठला.

त्यांना इथे अशी भूमी सापडली, जी त्यांच्या भूमीसारखीच होती- सुपीक जमीन, हिरवीगार झाडे, भरपूरपाणी व सुरक्षित बंदर; म्हणून आपल्या मायभूमीची आठवण ठेवण्याकरता त्यांनी याही भूमीला कुशस्थळी हे नाव दिले असावे, या निष्कर्षाप्रत आपण आलो होतो.

त्यांनी आजूबाजूची अनेक गावे ताब्यात घेतली व त्यांचेही नामकरण केले. शंखवाळ (साकवाळ) हे नावही बेट द्वारकेच्या जुन्या नावाशी म्हणजे ‘संखोधर’ या नावाशी साम्य असणारे नाव आहे. आजवरचा समज असा आहे की, कुशस्थळी हे गाव सरस्वती नदी आटल्यावर तेथून स्थलांतरित झालेल्या ब्राह्मणांनी वसवले.

वास्तविक कुशस्थळी ही क्षत्रिय राजा रेवताची राजधानी असल्याने तिथे ब्राह्मण नव्हते. जे तेथून स्थलांतरित झाले ते क्षत्रिय होते.

अर्कामोनने रोममधील आपल्या वरिष्ठांना लिहिलेल्या अहवालात स्पष्टपणे असे नमूद केले आहे की सासष्टीमधील पंधरा गावे क्षत्रियांनी येणाऱ्या ब्राह्मणाला दिली होती.

याचाच अर्थ ब्राह्मण तेथे पोहोचण्यापूर्वीच ही गावे क्षत्रियांच्या ताब्यात होती. कुशस्थळीचे बुडणे सुमारे ख्रिस्तपूर्व ७५००मध्ये झाल्याचे दिसते; पण कोकण किनारपट्टीची उन्नती त्यानंतर खूप वर्षांनी झाल्याचे दिसते. हा कालावधीतील फरक घोळ निर्माण करतो.

या टप्प्यावर इतिहासात नमूद असलेला आणखी एक पर्याय कुठ्ठाळीच्या नावासंदर्भात मांडू इच्छितो. झुआरी नदीच्या काठावरचे गाव कुशस्थळी ऐवजी कुलस्थळी असावे. आर्क्विवो डिस्ट्रिटल डी ब्रागा, पोर्तुगालमध्ये असलेल्या लिप्यंतरित कोडेक्स ७७२मध्ये कोकणी रामायणातील उतारा वाचून हीच छाप उमटते.

आम्ही हा फरक लिप्यंतरकर्त्याची चूक (जेझुइट मिशनरी मूळ भारतीय नसून परदेशी असल्याने) म्हणून सांगू शकलो असतो, परंतु भाषिक अपभ्रंश याला पुरेसा पुराव देत नाहीत. कुल+स्थळी याचा कुठ्ठाळी हा अपभ्रंश सहज संभवतो. कुश+स्थळी याचा कुठ्ठाळी हा अपभ्रंश ओढूनताणून बसवल्यासारखा वाटतो.

जर कुठ्ठाळीचे आधीचे नाव खरोखरच कुशस्थळी होते तर त्याचा अपभ्रंश कुशथळी व्हायला हवा होता. परंतु कुलस्थळी या नावाचा अपभ्रंश कुठ्ठाळी हे मान्य केल्यास, ’काठियावाडातील क्षत्रियांचा एक गट समुद्रमार्गे गोव्याच्या किनाऱ्यावर स्थलांतरित झाला आणि त्यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या जन्मभूमीचे नाव या नवीन भूमीला दिले’ हे आपले पूर्वीचे गृहितक कमकुवत ठरते.

पण ते खरेच आहे का? काठीयावाडातील त्या मूळ नगराचे नावच कुशस्थळी ऐवजी कुळस्थळी असू शकते, ज्याचे संस्कृत रूपांतर नंतर कुशस्थळी असे झाले असावे.

इतर अनेक ठिकाणांच्या नावांच्या बाबतीत घडले आहे, कारण संस्कृतमध्ये कुशस्थळ म्हणजे अनेक वैदिक विधींमध्ये वापरले जाणारे कुश नावाचे गवत जिथे उगवते, वाढते ती जागा. याला संभाव्य कारण म्हणजे कुश हा सोमाचा पर्याय मानला जात असे.

अपभ्रंश झालेले व मूळ नाव हा जसा एक प्रश्‍न आहे, तसाच आणखी एक महत्त्वाचा प्रश्‍न पुढे उपस्थित होतो; ‘कुशस्थळी आणि आजूबाजूच्या गावांचे क्षत्रिय कोठे गायब झाले?’ अर्थात आम्ही आधीच उत्तर दिले आहे की, नंतर स्थायिक झालेल्या ब्राह्मणांनी त्यांना विस्थापित केले.

पण ते गेले कुठे? कुशस्थळी आणि झुआरी नदीच्या आसपास असलेल्या गावांमधील क्षत्रिय, आपल्या जमिनी ब्राह्मणांच्या ताब्यात देऊन वेळसांव, कासावली, आरोशी, उतोर्डा, माजोर्डा, शेरावली यांसारख्या शेजारील किनारी गावांमध्ये स्थलांतरित झाले. हे शरणार्थी वेर्णा-मुरगाव डोंगररांगेतून आश्रयस्थानात उतरत आहेत, याची मी कल्पना करू शकतो.

असा प्रश्‍न पडू शकतो की, अचूक स्थलांतरण नमुना कशावर आधारित आहे? त्यासाठी आधी चर्चा केलेल्या लेखांमधील विषयाकडे परत यावे लागेल.

तिथे आम्ही ’चाड्डी म्हणून वर्गीकृत केलेल्या सासष्टीतील काही किनारी गावांमधील इतरांपेक्षा खूप वेगळ्या लोकांचा एक छोटासा गट’, असे वर्णन केले होते व ते विद्याधर म्हणजे गंगा सिंधू मैदानाच्या आसपासचे निवासी असलेले शुद्ध क्षत्रिय असू शकतात, असा तर्क मांडला होता.

क्षत्रिय काठीयावड द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्यावरून समुद्रमार्गे गोव्याच्या किनाऱ्यावर पोहोचले व तेथे स्थायिक झाले. नंतर आलेल्या ब्राह्मणांपाशी त्यांनी आपली जमीन गमावली आणि पुन्हा शेजारील किनारी गावांत स्थलांतर केले. ते स्थायिक झालेली गावे त्यांनी सोडलेल्या गावांच्या जवळ होती, ही वस्तुस्थिती पाहता, या गृहीतकाला पुष्टी मिळते.

किनाऱ्यावरील खेड्यांमध्ये स्थायिक झालेले क्षत्रिय विद्याधराच्या वर्णनात अगदी तंतोतंत बसतात, जे अद्याप ब्राह्मणांच्या ताब्यात नसलेल्या थेट गंगा-सिंधू मैदानाच्या पश्चिम टोकापासून आले होते.

इतर क्षत्रिय दख्खनमार्गे कोकणात पोहोचले - प्रसिद्ध ट्रान्स-सह्याद्री स्थलांतर, जिथे ते वडूकर पशुपालकांमध्ये मिसळले आणि एक नवीन क्षत्रिय समाज निर्माण केला. कदाचित पूर्वीचे लोक दीर्घकाळ समाजाबाहेर रोटीबेटीचा व्यवहार करत नसत.

परंतु त्यापैकी काहींनी समाजाबाहेर लग्न केले असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही; विशेषतः अन्य चाड्डी. तसेच काही कुटुंबे मुळात ज्या गावात स्थायिक झाली त्या गावातून स्थलांतरित झाल्याचे दिसते.

मी निष्कर्ष काढत असताना, माझ्या मनात एक खोडकर प्रश्न रुंजी घालू लागतो. ७,००० वर्षांहून अधिक कालावधी निघून गेलाय ही बाब थोडा वेळ बाजूस ठेवल्यास, क्षत्रिय आणि ब्राह्मणांनी उपखंडाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यापासून गोव्यातील झुआरीपर्यंत १,००० किमीचा धाडसी प्रवास केला; तो निव्वळ योगायोग होता का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT