History of Goa
History of Goa Dainik Gomantak
ब्लॉग

History of Goa: पश्चिमचक्रवर्ती कदंब

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वेश बोरकर

राष्ट्रकुटांचे नेमलेले सामंत म्हणून शिलाहार राज्यकर्त्यांच्या ताब्यात असताना गोवा हा दक्षिण कोकणाचा भाग होता. कदाचित श्री शास्तादेव कदंब यांनी कल्याणी चालुक्यांना केलेल्या मदतीमुळेच त्यांना हंगल कदंबांप्रमाणे गोव्याचे सिंहासन मिळाले असावे.

कल्याणी चालुक्यांकडून हा वारसा श्री शास्तादेव कदंबांना (इ.स 960)चालुक्यांचे सामंत म्हणून मिळाला. कदंबपूर(चंद्रपुर किंवा आताचे दक्षिण गोव्याचे चांदोर)ही गोव्याची राजधानी बनविण्यात आली.

इ.स. 980 मध्ये त्याचा मुलगा श्री गुहालदेव कदंब (इ.स. 980 - इ.स. 1005) उत्तराधिकारी म्हणून सिंहासनावर विराजमान झाला. दुसऱ्या शास्तादेवाच्या (इ.स. 1005 - इ.स. 1050) राजवटीत गोव्याने शिलाहारांच्या दक्षिण शाखेवर विजय मिळवून प्रादेशिक विस्तार केला.

त्याचा उत्तराधिकारी श्री जयकेशीन कदंब -पहिला (इ.स. 1050 - इ.स 1080) याच्या काळात गोपकपट्टणमला( किंवा आताचे उत्तर गोव्याचे शहर वेल्हा-गोवा) राजधानी बनविण्यात आले. कल्याणी चालुक्यांचा सामंत म्हणून श्री जयकेशीन कदंबने श्री सोमेश्वर चालुक्यच्या सैन्याला चालुक्य प्रदेशातून चोलांना हाकलून लावण्यासाठी मदत केली.

पुढील राज्यकर्ते श्री गुहालदेव-द्वितीय याच्या (इ.स. १०८० - इ.स ११२५) आणि श्री विजयादित्य कदंब (इ.स. ११०० - इ.स ११०४) यांच्याविषयी माहिती उपलब्ध नाही, परंतु श्री जयकेशीन कदंब-द्वितीय(इ.स. ११२५ - इ.स ११४८) याच्या काळात गोवा राज्याची भरभराट झाली.

कदंब राजघराण्याने अगदी बेळगावचा आणि आधुनिक ठाण्याचा बराचसा भाग आपल्या सत्तेच्या शिखरावर असताना भरभराटीस आणला.

कल्याणी चालुक्यांचा राजा श्रीविक्रमादित्य चालुक्य आणि कदंब यांच्यात विवाहबंधन जुळून आले. त्यानंतर श्री जयकेशीन- द्वितीय याचे दोन पुत्र श्री शिवचित्त परमादी कदंब (इ.स. ११४७-इ.स ११७९) व विष्णुचित्त कदंब(इ.स. ११४८ - इ.स. ११८८) लवकरच सिंहासनावर विराजमान झाले आणि त्यांनी दुर्बल चालुक्यांपासून ते स्वतंत्र असल्याची घोषणा केली.

तरीही कसेबसे काळचुरींनी चालुक्यांविरुद्ध बंड केले आणि गोव्याच्या कदंबांनी ते टिकवून ठेवण्यासाठी या प्रदेशातील नवीन कलचुरी राज्यकर्त्यांशी निष्ठा ठेवली.

पुढील राज्यकर्ते श्री जयकेशीन-तृतीय याच्या (इ.स. इ.स. ११८८- इ.स. १२१६) आणि श्री शिवचित्त वज्रदेव कदंब (इ.स. ११९३ -इ.स १२०२) यांच्याविषयी माहिती उपलब्ध नाही. पुन्हा काळाच्या चाकाने होयसळांचा उदय पाहिला आणि गोव्याचा कदंब शासक होयसळांचा सामंत बनला.

पुढे यादव शासक श्री सिंघाना यादव) यांच्या बाजूने राजकीय सत्तापरिवर्तन झाले आणि श्री त्रिभुवनमल्ल कदंब(इ.स. १२१६ - इ.स. १२३८) यांनी यादवांकडून आपले राज्य गमावले. यादवांचे पुढचे कमी शक्तिशाली सामंत राज्यकर्ते, श्री शास्तादेव कदंब - तिसरे (इ.स. १२४६-इ.स १२६५) आणि श्री कामदेव (इ.स. १२६५ -इ.स १३१०) कदंब गोव्याचे राज्य चालविण्यात यशस्वी झाले.

परंतु, लवकरच त्यांना हा प्रदेश मुस्लीम आक्रमक मलिक काफूरकडे(इ.स. १३१०) सोपवावा लागला. या प्रदेशावरील मुस्लीम राज्यकर्त्याचे हितसंबंध व नियंत्रण कमी झाल्याने इ.स. १३२७ मध्ये मुसलमानांचा पुढचा हल्ला होईपर्यंत शेवटच्या कदंब राज्यकर्त्याला राज्य काबीज करण्याची संधी मिळाली.

बहामनी सल्तनत या मुस्लीम राज्यकर्त्यांनी लवकरच गोवा ताब्यात घेतला आणि गोवा हा त्यांच्या आधिपत्याखालील एक भाग बनला.

पुढे विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेनंतर २९ ऑगस्ट १३८० रोजी श्री हरिहर- द्वितीय याच्या आदेशाने बहमनी सल्तनतीकडून गोवा जिंकल्यानंतर लगेचच श्री मल्लप्पा वोडेयर म्हणजेच विरा वसंत-माधव राया (श्री माधव मंत्री) याला कोकण-राज्याच्या महाप्रधानाचा दर्जा देण्यात आला.

श्री माधव मंत्री विजयनगर साम्राज्याचा राजा श्री हरिहर- द्वितीय याच्या दरबारातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्याने संपूर्ण कोकण- कर्नाटक किनारपट्टीवर राज्य केले.

बहमनी सल्तनतच्या ख्वाजा महमूद गवानने इ स १४७०मध्ये गोवा पुन्हा जिंकला. त्यानंतर गोवा विजापूरच्या आदिल शाह( इ स १४८० - इ स १५१०) आणि अखेरीस पोर्तुगिजांच्या ताब्यात इ स १५१० मध्ये गेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Corporation Building : मडगाव पालिका इमारत दुरुस्ती करा;पोर्तुगीजकालीन प्रशासकीय इमारत जीर्ण

Death Due To Fasting: निर्जळी उपवास बेतला जीवावर, फोंड्यात बिहारच्या युवतीचा मृत्यू

Savoi Verem : निशानने धाग्यातून टिपला ‘द ग्लो ऑफ आई लईराई’;सावईवेरेतील युवा कलाकाराची कलाकृती

Netflix यूजर्संना आता आणखी एका खास फिचर्सला म्हणावं लागणार अलविदा; मिळणार नाही ‘ही’ सुविधा

Goa Today's Live News: सांताक्रुज ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप सावंत

SCROLL FOR NEXT