Goa: ‘स्वयंपूर्ण मित्रा’ चा स्वयंपूर्णतेसाठी हात Dainik Gomantak
ब्लॉग

Goa: ‘स्वयंपूर्ण मित्रा’ चा स्वयंपूर्णतेसाठी हात

सरकारी क्षेत्रात काम करत असलेल्या राजपत्रित अधिकाऱ्याची निवड ‘स्वयंपूर्ण मित्र’ म्हणून करण्यात येते.

दैनिक गोमन्तक

गोव्यातल्या (Goa) 191 पंचायतीच्या ‘स्वयंपूर्ण मित्रां’ पैकी सहा जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सन्मानित करण्यात आले. स्वयंपूर्ण मित्र म्हणजे काय आणि या पंचायतीना या मित्रांचा काय फायदा होतो?

महात्मा गांधी यांच्या सुराज्याच्या संकल्पनेत ग्रामीण भागाला खूप महत्त्व होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, गाव आत्मनिर्भर असेल तर राज्य सशक्त होईल. राज्य सशक्त असेल तर देश सर्वसंपन्न होईल. महात्मा गांधीजींच्या (Mahatma Gandhi) या उक्तीनुसार गावांना आत्मनिर्भर करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेचा एक महत्वाचा घटक म्हणजे ‘स्वयंपूर्ण मित्र’. सरकारी क्षेत्रात काम करत असलेल्या राजपत्रित अधिकाऱ्याची निवड ‘स्वयंपूर्ण मित्र’ म्हणून करण्यात येते. त्यांना वेगवेगळ्या पंचायतीत, गावकरी आणि वेगवेगळी सरकारी खाती यात माध्यम म्हणून काम करावे लागते. 2 ऑक्टोबर 2020 रोजी या स्वयंपूर्ण योजनेची सुरुवात झाली.

पंतप्रधानांनी गोव्यामधल्या (Goa) सन्मानित केलेल्या सहा ‘स्वयंपूर्ण मित्रां’पैकी एक होते आगरवाडा, चोपडे या पंचायतीत नेमण्यात आलेले दिपक पेडणेकर. त्यांच्याकडे संपर्क साधल्यानंतर ‘स्वयंपूर्ण मित्रा’च्या कामाचे स्वरूप अधिक स्पष्ट झाले.

ग्रामीण क्षेत्रात अनेकांना सरकारी योजनांची नीट माहिती नसते किंवा माहिती असूनसुद्धा सरकारी खाक्याच्या पूर्वप्रसिद्धीमुळे अनेकजण या योजनांचा लाभ घेण्यास पुढे सरसावत नाहीत. विविध सरकारी खाती आणि ग्रामीण भागात कष्ट करणारा व्यवसायिक यात ताळमेळ घडवून आणून सरकारी योजनातर्फे त्यांच्या व्यवसायाला ऊर्जितावस्था देणे हे स्वयंपूर्ण मित्र आणि पंचायतीचे कर्तव्य बनते. पंचायतीचे सारे पंचसदस्य आणि पंचायत सचिव या मंडळाचा भाग असतात. पंचायत क्षेत्रात होत असणाऱ्या विविध व्यवसायांचा व त्या करणाऱ्या व्यावसायिकांची माहिती गोळा केली जाते, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातात व त्या विशिष्ट व्यावसायिकाचा व्यवसाय ज्या सरकारी खात्याशी संबंधित असतो त्या खात्यामार्फत त्या व्यावसायिकाला प्रशिक्षण, अनुदान वगैरे माध्यमातून मदत पुरवली जाते.

दिपक पेडणेकर सांगत होते, त्यांनी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या मनात शंका होत्या. ‘स्वयंपूर्ण मित्र’ या नात्याने त्यांचे पहिले काम होते, लोकांच्या मनामधल्या या शंका दूर करणे. पेडणेकर यांच्या म्हणण्यानुसार आगरवाडा, चोपडे या पंचायतीतल्या अनेक व्यवसायिकांचा आता या योजनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. विविध सरकारी खात्यांकडून कार्यान्वित झालेल्या योजनांचा फायदा घ्यायला व्यवसायिक पुढे येत आहेत. या पंचायतीमधले लोक कष्टकरी आहेत. गावात अनेक पारंपरिक व्यवसाय आहेत. शेत बागायती, मीठ व्यवसाय, मासेमारी व्यवसाय (Fishing) लोकांनी सांभाळून ठेवले आहेत.

गावात पारंपारिक वैद्य आहे. त्यांना देखील जैविक विविधता मंडळाकडून ‘वैद्य मित्र’ म्हणून ओळख मिळवून दिली आहे. या क्षेत्रातील पडीक जमीन लागवडीखाली आणून भातपीक उत्पन्न वाढीस लावण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले गेले आहे. आगरवाडा गावात मीठ उत्पादन हा एक प्रमुख व्यवसाय आहे. मिठागरातील मीठ उत्पादन वाढविण्यासंबंधात त्या उत्पादकांना मार्गदर्शन करण्यात आले. शेती (Farm) व्यवसायाबरोबर दूध व्यवसायीकांना आणि कुक्कुटपालन व्यवसायालादेखील पाठबळ देण्यात आले. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना सरकारी योजनांचा लाभ समजावून सांगण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांच्या कार्यशाळा पंचायतीत आयोजित करण्यात आल्या.

‘स्वयंपूर्ण मित्र’ असणे म्हणजे समाजाबद्दल, त्यातल्या कष्टकरी जनतेबद्दल, त्यांच्या व्यवसायाबद्दल, कष्टांबद्दल जागरूक असणे व त्याबद्दल आत्मीयता बाळगणे आहे. तरच एखादा ‘स्वयंपूर्ण मित्र’, समाज आणि सरकारी योजना यांची नेटकी गाठभेट घडवून आणू शकतो. गोव्यातल्या (Goa) सहा पंचायतीतील ‘स्वयंपूर्ण मित्रां’नी या योजनेची सुरूवात पंतप्रधानांकडून सन्माननीय दखल घेण्याजोगी केली आहे. या योजनेच्या यशस्वीतेचे लोण संपूर्ण गोव्यात पोहोचो.

-निवृत्ती शिरोडकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT