Goa Shravan Culture Amey Kinjawadekar
ब्लॉग

Goa Shravan Culture: श्रावणमासातील 'आयतार' पूजा...

दैनिक गोमन्तक

अमेय किंजवडेकर

Goa Shravan Culture: श्रावणमासाचं आगमन झालं आहे. या महिन्याचं सांस्कृतिक दृष्ट्या वैशिष्ट्य म्हणजे हा महिना सण आणि व्रतवैकल्यांनी भरगच्च भरलेला असतो. या महिन्यात गोमंतकातील हिंदू घरांतील जेवणाच्या पानावरचे जिन्नस बदलतात.

कुळाचार आणि परंपरांचं पालन करताना समाजजीवन व्रतवैकल्यांचे पालन करते. ही व्रतवैकल्यं म्हणजे सुग्रास भोजन आलंच. यांच्याशिवाय सणवार पूर्ण होत नाहीत. आज श्रावणातील दुसरा 'आयतार' म्हणजेच 'आदित्यवार' आहे.

गोव्याच्या इतिहासात सौर उपासनेची मुळं सापडतात. कुडणे गावातील भग्न सूर्य मंदिर, बोरी गावात असलेलं सूर्यनारायणाचं मंदिर ही उदाहरणं एकेकाळी गोवाभर विखुरलेल्या सौर्य पंथाचा प्रभाव दर्शवतात.

श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी 'आदितवार' किंवा 'आयतार' पुजणे हे व्रत गोव्यातील सुहासिनी स्त्रिया नेमाने करतात. दर रविवारी विशिष्ट पानांपासून द्रोण तयार करून त्यांचे 'आदितवार' म्हणून पूजन केलं जातं.

देवाला कसल्याही फळांचा आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवला जातो. पूजा झाल्यानंतर तो प्रसाद आणि तीर्थ म्हणून भक्तीभावाने त्याचं ग्रहण केलं जातं. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक रविवारी वेगळा वेगळा विशेष नैवेद्य दाखवला जातो.

पहिल्या रविवारी 'मुठल्यां'चा नैवेद्य दाखवला जातो. तांदळाचे पीठ मळून, त्याचे गोळे बनविले जातात. या गोळ्यांमध्ये पंचखाद्य भरुन त्यांना उकडून 'मुठल्या' हा पदार्थ बनवण्यात येतो. अशी मान्यता आहे की मुठल्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर 'आयतार' देव आपल्या जागेवर स्थिर बसतो.

दुसऱ्या रविवारी पातोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. वरील सर्व साहित्य समान असून फक्त हळदीच्या पानांमध्ये या पातोळ्या उकडल्या जातात. असं मानलं जातं की पातोळ्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर देव पातोळ्यांसारखा पसरून बसतो.

तिसऱ्या रविवारी खिचडीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. ज्याप्रमाणे खिचडी मध्ये सगळे जिन्नस असतात, त्याप्रमाणे देव सगळीकडे सगळ्या गोष्टींमध्ये आहे असा समज करून हा नैवेद्य दाखवला जातो.

चौथ्या रविवारी पोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. पोळ्यांचा नैवेद्य दाखवल्यावरती देव पळून जातो असा लोकमनाचा समज आहे.

श्रावण महिन्यात देवतांना दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्य आणि अन्नपदार्थ यांच्या मागे काहीतरी विचार आणि बऱ्याचदा तत्वज्ञान दडलेलं असतं. या कारणांचा शोध घेतल्यास अधिक डोळसपणे आपण व्रतवैकल्यांचं पालन करू शकू हे निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT