Quepem Dainik Gomantak
ब्लॉग

Quepem: कच्चा रस्ता, व्हिडीओ, धरणे आणि दखल

एखाद्या दिवसासाठी आनंदी वाटणारी ती वाट नक्कीच शुद्ध नरक बनून जाईल.

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem: पावसाळ्यातील दिवसात गोव्यामधील ग्रामीण भागात ट्रेक चालू होतात. वाहणाऱ्या ओढ्यातून वाट काढत, चढाव-उतरण पार करत ट्रेकर आनंदाने आपला पावसाळ्यातला एखादा दिवस साजरा करत असतात. पण श्वास वर-खाली करणारी अशी एखादी वाट कायमचीच त्यांच्या आयुष्याला जखडून गेली तर काय होईल?

एखाद्या दिवसासाठी आनंदी वाटणारी ती वाट नक्कीच शुद्ध नरक बनून जाईल. केपे तालुक्यातील काजूगोटो आणि वावुर्लो गावातील लोकांना मुख्य रस्त्यापर्यंत नित्य तुडवावी लागणारी चार ते पाच किलोमीटरची कच्ची वाट त्यांच्या नित्य अपेष्टांची अशीच जणू साथ बनून राहिली आहे.

पावसाळ्यात या गावच्या रस्त्यावरचा ओढा खरे तर एखाद्या वेळेस वयस्करालाही ओढून घेऊन जाऊ शकेल अशा वेगाने वाहत असतो. अशा त्या प्रवाहातून आठ-दहा वर्षांची मुले वाट काढत रोज शाळेला जातात-येतात.

डिजिटल गोव्याचे निरज नाईक यांनी या रस्त्यासंदर्भाने बनवलेला साडेसहा मिनिटांचा व्हिडिओ सर्वत्र झालेला आहे. या रस्त्यावरून नेहमी शाळेला जाणाऱ्या मुलांबरोबर ते करत असलेली बातचीत भले लोकांना रोमँटिक वाटली तरी जिवावरचे ते खेळ त्यांना रोज कसे सहज घ्यावे लागतात याचे प्रत्यंतर आणून देणारी आहे.

नीरजबरोबरचा लहान मुलांचा संवाद साधारण पुढीलप्रमाणे आहे:

नीरज: किती वेळ लागतो तुम्हाला शाळेत जायला?

मुलगा: एक तास लागतो.

नीरज: ओढा ओलांडताना भीती नाही वाटत?

मुलगा: वाटते

नीरज: प्रवाह तर जोरदार आहे मग तुम्ही ते तुम्ही ओढा कसा ओलांडता?

मुलगा: आम्ही एकमेकांना घट्ट धरून ठेवतो.

नीरज: तासभर शाळेची वाट चालून पाय नाही दुखत?

मुलगा: दुखतात.

नीरज: तुम्हाला भिजायलाही होत असेल.

मुलगा: हो आम्ही भिजतो.

नीरज: किती मुले जातात शाळेत इथून?

मुलगा: पाच जण जातो

नीरज: ओढ्याला अधिक पाणी आले की मग काय करता?

मुलगा: शाळेला नाही जात.

नीरज: वाटेत जंगली जनावरे भेटतात का?

मुलगा: हो.

नीरज: कोणते जनावर भेटले आहे?

मुलगा: गवे रेडे.

नीरज: ते दिसले की तुम्ही काय करता?

मुले: आम्ही पळतो.

हा संवाद म्हणजे एका दिव्यातून रोज मुले कशी जात असतील याचा दाखला आहे. तासभर अंतरावर असणाऱ्या शाळेमध्ये मुलांना पाठवताना पालकांच्या मनातही भलते-सलते येत नसेल काय? नक्कीच येत असेल. अर्थात हे सारे त्रास सहन करून या गावातली मुले उच्चशिक्षण घेऊन चांगल्या पदावरदेखील पोहोचली आहेत.

त्या प्रत्येकाची ही ’कष्टसाध्य कर्तृत्वा’ची कहाणी प्रेरणा देणारी असली तरी आपल्या व्यवस्थेसाठी आदर्श अशी नक्कीच नाही. सुमारे २० घरे व १०० लोकांची वस्ती असलेले हे दुर्गम गाव कदाचित गोव्यातील याप्रकारचे एकमेव नसेल.

फक्त लहान मुलांसाठीच नव्हे तर गावात पिकणारे शेती उत्पादन बाजारात नेण्यासाठी, कोणी आजारी असल्यास त्याला इस्पितळात नेण्यासाठी किंवा इतर आणीबाणी उद्भवल्यास या गावातील लोकांना त्रास हा वाट्याला येतच असतो. दरवर्षी स्वतःच्या श्रमाने हा रस्ता गावचे लोक वाहतूकयोग्य बनवतात पण प्रत्येक पावसाळ्यात पाण्याच्या ओघामुळे रस्ता वाहूनही जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT