Anant Salkar | Goa Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: आणखी एक जवळचा मित्र गेला...

Goa: अनंत साळकर यांचा भाषांवरील पकड आणि प्रभुत्व पाहून कुणा लेखक, पत्रकारालाही हेवा वाटेल.

दैनिक गोमन्तक

Goa: गेल्या काही वर्षांत एक एक दुःखद घटना कानी पडत आहेत. एक एक जवळचे मित्र सोडून जाऊ लागले आहेत. सुरवातीला श्रीधर कामत गेले. धक्का मोठा होता; पण तो पचविता आला. कारण श्रीधरवर त्यावेळी परिस्थितीच तशी आली होती. ती पाहिल्यास एक ना एक दिवस असे होणारच, याची खात्री होती.

त्यानंतर अशोक नाईक (पुष्पाग्रज) गेला. तोही धक्का पचविला; कारण अशोकचे नाही म्हटले तरी वय झाले होते. निवृत्तीचे जीवन तो जगत होता. एक ना एक दिवस माणसाला मृत्यू हा येणारच, ही भावना ते दुःख पचविताना साथीला होती.

पण अनंतचे जाणे चटका लावून जाणारे होते. हे काय जाण्याचे वय आहे काय? कालपर्यंत ज्याचे चपखल विनोद आणि भाष्य ऐकून मी माझे दुःख किंवा निराशा कमी करण्याचा प्रयत्न करत होतो. तोच साळकर सोडून जातो म्हणजे काय? हा घाव तसा जिव्हारी लागणारा म्हणावा लागेल.

साळकर आणि माझी मैत्री किमान 30 वर्षांची. तरुण भारत जेव्हा गोव्यात अगदी बाल्यावस्थेत होता, त्यावेळी आम्ही दोघेही तिथे काम करायचो. साळकरना तिथे संपादकीय विभागातच काम करण्यासाठी घेतले होते. मात्र, त्यांचे त्यावेळी खरे काम होते ते ग्रामीण भागातील वार्ताहरांना मार्गदर्शन करण्याचे.

प्रत्येकाच्या तक्रारी तो त्यावेळी लक्षपूर्वक ऐकून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करायचा बेळगाव येथील व्यवस्थापन आणि ग्रामीण गोव्यातील वार्ताहर यांच्यातील तो महत्त्वाचा दुवा होता. त्याचे सर्वांशी चांगले जुळत असे. त्यामुळे आम्ही आणि त्याचे सहकारी आमच्या कुठल्याही अडचणी त्याला बिनदिक्कत सांगायचो आणि आम्हाला खात्री असायची की, साळकर त्यावर काही तरी तोडगा काढणारच. साळकरच्या सान्निध्यात घालवलेली ती वर्षे माझ्यासाठी अप्रूप अशीच होती.

त्यानंतर काही कारणास्तव त्याने तरुण भारत सोडला. पण आमच्या मैत्रीत खंड पडला नाही. त्याने सुनापरान्त जॉईन केला. पणजीला काही कामासाठी गेल्यास साळकरशी भेट व्हायचीच. कालांतराने मीही तरुण भारत सोडला आणि लोकमत पकडला आणि बरोब्बर एका वर्षाच्या कालावधीनंतर साळकरही तिथे आला. आमची मैत्री पुन्हा एकदा दृढ झाली.

साळकर लोकमतमध्ये संपादकीय पान आणि रविवार आवृत्ती पाहायचा. त्याने या पानांना एक वेगळीच उंची आणून दिली. त्यापूर्वी तरुण भारतमध्ये असताना साळकरच्याच पुढाकारातून दर रविवारी ''ग्रुव्ह'' नावाची एक सप्लिमेंट काढली जायची. त्यासाठी मीही लिहायचो. साळकरचे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांवर तेवढेच प्रभुत्व होते.

तो शब्दांशी अक्षरशः खेळायचा. लोकमतमध्ये आम्ही अगदी धमाल करायचो. मला एक वाईट सवय आहे. मला कुणा मित्राची तीव्रतेने आठवण आली तर रात्री अपरात्री मी कधीही त्यांना फोन करतो. साळकर हा त्यापैकी एक होता. पण त्याने त्याचा कधीही त्रागा केला नाही.

मागचे वर्षभर आमचे गोमन्तकमध्ये चांगले जुळून आले होते. साळकर हा खरे तर शब्दप्रभू. प्रत्येक शब्दाला त्याच्याकडे प्रतिशब्द असायचा. बातमी लिहिताना मला जर कुठलाही चपखल असा शब्द मिळाला नाही तर मी साळकरला फोन लावायचो आणि माझे काम शंभर टक्के व्हायचे.

मात्र, आता हा सगळा भूतकाळ होणार. मी यापुढेही बातमी लिहिताना एखाद्या शब्दासाठी निश्चितच चाचपडणार आणि सहज साळकरच्या मोबाईल क्रमांकावर माझे बोट जाणार. साळकर तर कधीचाच मला सोडून गेला, याचे भानही राहणार नाही. काही का असेना, अशा रितीने तरी साळकर माझ्या काळजात राहील, कायमचा!

साळकर यांची पत्रकारिता-

तरुण भारत 1994 ते 2004, सुनापरान्त 2004 ते 2012 , लोकमत 2012 ते 2021, गोमन्तक 2021 ते अखेरपर्यंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Beef Trafficing: केरी चेकपोस्टवर 2000 किलो गोमांस जप्त! 2 दिवसांतील तिसरी घटना; पुन्हा तेच वाहन पकडले Video

Goa Politics: खरी कुजबुज; सिनेप्रेम ठीक आहे हो, परंतु पार्किंगचे काय?

Mungul Crime: मुंगुलप्रकरणी नवी अपडेट! हल्ल्यानंतर गँगस्टर वेलीने घेतली 60 लाखांची कार; काणकोणमधील एकजण पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: 'भाजपला पराभूत करण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला सोबत घेऊन लढू', पाटकरांनी केले युतीचे सूतोवाच

Candolim: मद्यधुंद पर्यटकांचा गोव्यात धुडगूस! कांदोळी बीचवर 10 दुचाक्यांची तोडफोड; बंगळुरूच्या 5 जणांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT