Ganpati Idol Making Dainik Gomantak
ब्लॉग

Ganpati Idol Making: शरीराची साथ नाही, पण कलाही स्वस्थ बसू देत नाही, 82 वर्षांचा युवा कलाकार सांगतोय रंजक कहाणी

रमाकांत शेटकर हे पणजोबापासूनची ही परंपरा सांभाळून आहेत. त्यांच्या चित्रशाळेतील गणपतीच्या मूर्तींना आजही मोठी मागणी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ganpati Idol Making गोमंतकीयांचा सर्वांत मोठा व आवडीचा सण गणेश चतुर्थी आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्‍यामुळे सर्वत्र सणाची तयारी आणि लगबग सुरू झाली आहे. डिचोलीतील गणपतीच्या चित्रशाळाही गजबजल्‍या असून मूर्तिकार रात्री जागवू लागले आहेत.

कुंभारवाडा-बोर्डे येथील एका चित्रशाळेत तर ज्येष्ठ म्हणजेच ८२ वर्षांचे मूर्तिकार रमाकांत शेटकर गणपतीच्या मूर्ती रंगविण्याच्या कामात मग्न आहेत.

रमाकांत शेटकर हे पणजोबापासूनची ही परंपरा सांभाळून आहेत. त्यांच्या चित्रशाळेतील गणपतीच्या मूर्तींना आजही मोठी मागणी आहे.

‘‘वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपणाला गणपती मूर्तिकलेची आवड निर्माण झाली आणि हळूहळू आपण या कलेत झोकून दिले. पणजोबा, आजोबा आणि वडिलानंतर आपण ही कला सुरूच ठेवली आहे’’ असे त्‍यांनी त्यांच्या चित्रशाळेला भेट दिल्यानंतर सांगितले.

वयोमानाचा विचार करता, शरीर साथ देत नाही, तरीसुद्धा अंगातील पिढीजात कलाकार स्वस्थ बसू देत नाही. या कामात आपली मुले आपणाला साथ देतात, असे शेटकर यांनी सांगितले.

चिकणमातीची मोठी समस्‍या

गेल्या काही वर्षांपासून मूर्तिकारांसमोर चिकणमातीची समस्या निर्माण झाली आहे. पूर्वीप्रमाणे आता चिकणमाती उपलब्ध होत नाही, अशी खंत रमाकांत शेटकर यांनी व्यक्त केली.

सरकारने या समस्येचा विचार करून मूर्तिकारांना चिकणमाती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. मूर्तिकला टिकवून ठेवण्यासाठी प्रशिक्षण देणारी एखादी चित्रशाळा सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

‘पीओपी’च्या मूर्ती टाळा

गेल्या काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे आक्रमण वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक मूर्तिकारांना त्याचा मोठा फटका बसत आहे, अशी खंत रमाकांत शेटकर यांनी व्यक्त केली.

पीओपीच्या मूर्ती या पर्यावरणाला हानिकारक तर आहेच, उलट त्‍या शास्त्राप्रमाणे पूजनासाठी योग्य नाहीत, असे मत त्‍यांनी व्यक्त केले. गणेशभक्तांनी या मूर्ती टाळाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बंगाल हादरले! झोपेत असताना 'मच्छरदाणी फाडून'अपहरण, लैंगिक अत्याचारानंतर 4 वर्षांची चिमुकली आढळली गटाराजवळ

Konkani Drama: सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारी व्हिजुअल ट्रिट - ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’

Goa Chess World Cup: जगज्जेत्या गुकेशचे आव्हान संपुष्टात! स्वेनने केले पराभूत; अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्ण, प्रणव चौथ्या फेरीत दाखल

Goa: "किती पैसे घेतेस?", गोव्यात 19 वर्षांच्या मुलीसोबत गैरव्यवहार! 'विदेशी पर्यटक' समजून अश्लील कमेंट्स; Video Viral

Goa ZP Election: बहुतांश ठिकाणी ‘झेडपीं’ची पळापळ सुरू, डिचोली वाढणार रंगत; पेडणे तालुक्यातून अनेकांचा पत्ता कट!

SCROLL FOR NEXT