Ganesh Chaturthi 2023: शहरांमध्ये रानभाज्यांना पसंती; चिबूड, तवशी आणि दोडकी बाजारात दाखल

श्रावण महिन्‍यात गोव्‍यातील बहुतांश घरांमध्‍ये शाकाहारी जेवण बनविले जाते. त्‍यामुळे भाजीपाल्‍याला मोठी मागणी असते.
Goa Market
Goa Market Dainik Gomantak
Published on
Updated on

संदीप देसाई

गणेश चतुर्थीचा सण जवळ आला आहे. बाजारात भाजीपाल्‍याची आवक वाढली आहे. चिबूड, तवशी, दोडगी, वाली तसेच इतर फळभाज्या, पालेभाज्या बाजारात दाखल होत असून त्यांना चांगली मागणीही आहे.

चिबूड आकाराप्रमाणे 70 ते 150 रुपये दराने विकला जातोय. तवशांना देखील आकाराप्रमाणे दर मिळतोय. इतरही भाज्यांना चांगली मागणी आहे, असे विक्रेते सांगतात.

Goa Market
Gomantak Editorial: वैश्‍विकतेची राजनीती

श्रावण महिन्‍यात गोव्‍यातील बहुतांश घरांमध्‍ये शाकाहारी जेवण बनविले जाते. त्‍यामुळे भाजीपाल्‍याला मोठी मागणी असते. ग्रामीण भागात पिकविलेल्या भाज्यांसह नीरफणस, भाजीची केळी, फागला आदींना जास्‍त पसंती दिली जाते.

मध्यम आकाराचा नीरफणस 200 रुपये प्रतिनग तर भाजीचे एक केळे 20 रुपये दराने विकले जात आहे. सोबतच आंबाडे, कंदमुळे भाज्यांची मागणीही वाढली आहे.

टोमॅटोचा दर आता स्थिर झाला असून 30 रुपये प्रतिकिलो दराने तो विकला जातोय तर फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर त्‍याचा भाव 19 रुपये इतका आहे. बटाटे. कांदे तसेच इतर भाज्यांचे दरही स्थिर असल्याने ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत.

Goa Market
Music Album: युती म्हणतेय, ''पावसा पावसा खेळया आमी...''

शहरांमध्ये रानभाज्यांना पसंती

गोव्‍याची राजधानी असलेल्‍या पणजी शहरात तायखिळा, कुड्डूक, फांगला, कोंब, नीरफणस तसेच इतर रानभाज्या विक्रीसाठी येत आहेत. त्यांना चांगली मागणीही आहे. ग्रामीण भागात रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे शहरांत भाज्‍यांचे दर वाढले तरी ग्रामीण भागात फारसा परिणाम जाणवत नाही. सध्‍या सर्वत्र रानभाज्या मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com