Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Floods Impact: सरकारची पुराबाबत उपाययोजनांकडे पाठ

दशरथ मोरजकर

पर्ये: बदलत्या पर्यावरणाचे चक्र पाहता पश्चिम घाटातील मान्सून आता लहरी झाला आहे. यापूर्वी हिमालयात पाऊस पडल्याने भूस्खलन व्हायचे; पण गेल्या दहा वर्षांपासून पश्चिम घाटात पाऊस पडून भूस्खलन होत आहे ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे म्हादईला पूर येण्याची शक्यता जास्त तेव्हा अशा परिस्थितीत म्हादई किनारी राहणाऱ्या लोकांना आपला जीव मुठीत धरून जीवन जगावे लागणार आहे.

पूरनियंत्रण क्षेत्रांना संरक्षण द्यावे

म्हादई नदीला स्वतः असे क्षेत्र आहे ज्यांना स्थानिक भाषेत ‘जुवाड’ म्हटले जाते. नदीच्या दोन्ही बाजूंनी ही क्षेत्रे पसरलेली आहे. अशा या क्षेत्रात शेती बागायतीची लागवड झाली आहे. तसेच या ठिकाणी बांधकामे उभारली जातात. त्यावर नियंत्रण आणावे. म्हादईच्या पात्रात शेरणी( fresh water mangroose) वनस्पती नदीचा पूर प्रवाह कमी करण्यास मदत करते. नदीचा गाळ उपसण्याच्या नावाखाली अशा शेरणीची कत्तल होताना दिसते. या शेरणीना संरक्षण मिळणे गरजेचे आहे.

Goa Flood Impact

सत्तरीतील नदीपात्राच्या बाजूने संरक्षक भिंत उभारून पुराचे पाणी बाहेर फुटण्यापासून अडवणे अशी मागणी केली जाते. पण, यावेळी आलेल्या पुराला अशा भिंतीचा काही उपयोग झाला नसता. तेव्हा अशा संरक्षक भिंती उभारणे कितपत योग्य ठरेल. संरक्षक भिंती उभारण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहीचे म्हणणे संरक्षक भिंती उभाराव्या, तर काहीजण याच्या विरोधात आहेत.

Goa Flood Impact

सरकारची उपाय योजना दूरच

पुराची कारणे शोधणे आणि भविष्यात पूर येऊ म्हणून उपाययोजना आखणे तसेच पूर आल्यावर कोणती दक्षता घेणे याबाबत सरकार दरबारी कुर्मगतीने काम चालू आहे. यासंबंधी जलसंसाधन खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की, भूगर्भ शास्त्रज्ञ व इतर तज्ज्ञ यांच्या मदतीने या पुराची कारणे शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली असून ती समिती आपला अहवाल सादर करील मग त्यानुसार उपाय योजना आखली जाईल.

Goa Flood Impact

महापुराची कारणे...

पुराच्या 24 तास अगोदर म्हादई खोऱ्यात सलगपणे 23 इंच पाऊस पडला. हा पाऊस म्हादईच्या पूर्ण खोऱ्यात एकसमान सर्व नद्यांना एकाच वेळी पूर आला आणि म्हादईच्या उपनद्या आणि म्हादईचे पाणी एकदाच वाढले.

समुद्राला भरती असल्याने गांजे-उसगाव भागात नदीचे पाणी वाहून न जाता गावात घुसले म्हादई खोऱ्यातील साट्रे (satre), कंरझोळ, कुडशे, झरमे, आदी भागात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून दरडीची माती नदीच्या पात्रात येऊन साचल्याने बऱ्याच ठिकाणी नदी पात्र बुजले.

महाराष्ट्र व कर्नाटकच्या म्हादई खोऱ्यातील जंगलाची मोठ्या प्रमाणात कत्तल.

Goa Flood Impact

भविष्यातही म्हादईला पूर

म्हादईवर यापूर्वी 1982 साली पूर आला होता. तसा पूर यंदा आला. व्यतिरिक्त लहान मोठे पूर येतच असतात. त्यात कुडशे-गांजे सारख्या गावांना त्याचा फटका बसतो. पण, गेल्या चार वर्षांपासून सलगपणे पश्चिम घाटात पूर येऊन मोठा हाहाकार माजला आहे. या चार पैकी 2018 व 2019 मध्ये केरळमध्ये महापूर आला तर 2020 मध्ये कर्नाटकात पूर आला. यंदा यांचा फटका पश्चिम घाटाच्या मध्यभागात म्हणजेच गोवा आणि कोंकणाला बसला. त्यामुळे पश्चिम घाटात सलगपणे आठवडाभर पाऊस पडून पूर येण्याची शक्यता व्यक्त होते. पश्चिम घाटात पाऊस पडण्याचे प्रकार आता बदलत आहे. पूर्वी येथे दोन-तीन महिने थोडा थोडा पडायचा, पण आठ दिवस सलगपणे जोरदार पडतो. वैश्विक वातावरण बदलाचा हा परिणाम असल्याचे मते निसर्ग अभ्यासकांनी मांडली आहेत.

Goa Flood Impact

पूर नियंत्रणासाठी उपाययोजना

महाराष्ट्र व कर्नाटकातील म्हादई खोऱ्यातील जंगलतोड, खडी क्रशरसारखे उद्योग बंद करणे. कर्नाटकातील पारवाड, चिखली, गवाळी, चापोली, नेरसा, मेंडील, कृष्णापूर, बेटणे, आदी भागातील जंगल तोडीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

सत्तरीतील म्हादई खोऱ्यात जंगल तोंडावर निर्बंध आणावे व नैसर्गिक जंगल क्षेत्र वाढवावे किंवा यासाठी वनीकरण करावे.

म्हादई नदी पात्रातील खडी / वाळू उपसा बंद करावी. सोनाळ, उस्ते आदी भागात अशी कामे सुरू असतात.

तत्कालीन उपाय

भूस्खलन झालेल्या ठिकाणीची माती पावसाच्या पाण्याने नदीत वाहून जाऊ नये म्हणून दरडीच्या खालच्या भागात छोटे छोटे दगडी बांध उभारावे व अशा मातीवर विशिष्ट प्रकारचे गवताची पैदास करावी.

पावसाची माहिती देणारी पर्जन्य माफक यंत्रांना व लोकांना अलर्ट करणारी यंत्रणा उभारावी. जेणेकरून जर पुराची स्थिती निर्माण झाली तर त्यांची माहिती ग्रामस्थांनी देण्यात यावी

पूर दक्ष उभारणी केंद्रे उभारावी

‘या’ गावांना जास्त धोका

म्हादई किनारी वसलेले सोनाळ-तार, कुडशे, मासोर्डे, वेळूस, वेळगे, खडकी, सावर्षे, भिरोंडा, खोतोडे, बाराजण, वांते, पाडेली, धामशे, गुळेली, कणकीरे, गांजे, उसगाव या गावांना या पुराचा फटका बसला. त्यापैकी सोनाळ, कुडशे व गांजे हे गाव नदी थोड्याशा समान पातळीवर असल्याने यांना याचा जास्त धोका आहे. या गावातील चिरेबंदी घरांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. या गावांनी पुराचे पाणी जोराने घुसले होते. तसेच म्हादईचे लहान मोठे पुरामुळे प्रभावित झाले आहे.

गाडगीळ समितीच्या अहवालातील मुद्दे

1) पश्चिम घाटाचा पट्टा हा पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करावा व त्याचे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र 1,2 व 3 विभाजन करून संवेदनशील भाग 1 मध्ये खाण, खणी क्रशर, चिरे खणी, थर्मल पॉवर व्यवसाय पूर्णपणे करणे करणे.

2) अभयारण्य क्षेत्राला 10 कि. मी. चा बफर झोन ठेवून तिथल्या प्रदूषणकारी प्रकल्पांना आळा घालणे

कस्तुरीरंगन समितीतील नोंदी

  • कस्तुरीरंगन समितीने पश्चिम घाटाची केवळ 37 टक्के क्षेत्र हे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले होते.

  • या क्षेत्रात खाण व्यवसाय, खडी क्रशर, थर्मल पॉवर प्रकल्प आदींना पूर्णपणे बंदी

  • अतिप्रदूषणकारी प्रकल्पांना पूर्णपणे बंदी

  • गाडगीळ समितीने पश्चिम घाटाची पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील 63 टक्के क्षेत्र वगळले होते

  • सरकारने हा अहवाल अंशतः (काही प्रमाणात) अमलात आणला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Israel Hamas War: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला, अनेक घरांवर डागली क्षेपणास्त्रे; लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू

Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

SCROLL FOR NEXT