Epic poet Homer Dainik Gomantak
ब्लॉग

महाकवी होमर

गोमन्तक डिजिटल टीम

दत्ता दामोदर नायक

Epic poet Homer डेल्फीला होम स्टेची व्यवस्था आहे. व्हिक्टर आणि सोफियाच्या कॉटेजच्या एकमजली घरात तळमजल्यावर ती दोघे आपल्या छोट्या मुलांबरोबर राहतात आणि वरच्या मजल्यावर पर्यटकांना राहता येते. सकाळचा ब्रेकफास्ट आणि हवे असल्यास दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्थाही सोफिया आणि व्हिक्टर मोठ्या आपुलकीने करतात.

डेल्फीतला तीन दिवसांचा निवांत मुक्काम फारच सुखद होता. दिवस मावळला आणि तिन्हीसांजा झाल्या की, डेल्फीभोवतालचे अवकाश आणि वेळ गोठून जाते. आसमंत स्तब्ध, नि:स्तब्ध होतो. सगळीकडे आंधळ्या अंधाराचे आणि बहिऱ्या शांततेचे साम्राज्य असते. अचानक, रवींद्रनाथ टागोराचे शब्द सहजपणे ओठी आले:

पीस माय हार्ट

लेट लव्ह मेल्ट - इनटू मेमरी अँड पेऽन इन टू सॉंग्ज

लेट द फ्लाइट थ्रू स्काय अँड इन द फोल्डिंग ऑफ द विंग्ज ओव्हर द नेस्ट

स्टँड स्टिल, अँड से युवर लास्ट वर्ड्स इन सायलेन्स

आय बाव टू यू अँड होल्ड अप माय लॅम्प टू लाइट ऑन युवर वे

प्लाकाच्या बाजारातून खूप पुस्तके आणली होती. प्रत्येक पुस्तक म्हणजे एकेका व्यक्तीचा सहवास. डेल्फीच्या माझ्या मुक्कामात माझ्याबरोबर इसापनिती लिहिणारा इसाप होता. इलियड आणि ओडेसी ही महाकाव्ये लिहिणारा होमर होता.

सोफिक्लस, युरिपिडस आणि एस्कलस हे ग्रीस शोकांतिका लिहिणारे नाटककार होते. सोक्रेटिस, प्लूटो, ऍरिस्टोटल, एपिक्युरस, डेमोक्रेटीस, इपिक्टेटस हे तत्त्वज्ञ होते. पायथागोरस, युक्लीड, आर्किमेडिज, हिपेशिया हे गणितज्ञ, शास्त्रज्ञ होते. वैद्यकीय व्यवसायाला नैतिकतेचे अधिष्ठान देणारा हिपोक्रेटस होता.

इसापला इथे डेल्फीतच मृत्युदंडाची शिक्षा झाली आणि कडेलोट करून त्याला मारण्यात आले. इसापच्या बोधकथांतील उपरोधाने संतापून डेल्फीच्या पुरोहितांनी इसापला मृत्यूची शिक्षा दिली की, त्याच्या मृत्युदंडाला दुसरे कोणते कारण होते याचा उलगडा होत नाही - इसाप हा मूळ ग्रीक गुलाम. तो मूळ आफ्रिकन निग्रो असावा.

आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि चातुर्याच्या जोरावर आपल्या मालकाला उपयोगी पडल्यामुळे त्याच्या मालकाने त्याची गुलामगिरीतून सुटका केली. इसापनितीतल्या सर्वच बोधकथा (फॅबल्स) इसापने रचल्या असे म्हणता येणार नाही.

इसापचा काळ इ. स. पू. ६व्या शतकाचा. या काळात ग्रीकमध्ये गावागावांत जाऊन गोष्टी सांगणारे, लोकांची करमणूक करणारे व त्यावर आपली उपजीविका भागवणारे अनेक लोक होते. इसापने बऱ्याच गोष्टी अशा लोकांकडून ऐकून संकलित केल्या. इसापनितीत कोल्हा, लांडगा, सिंह, हरण, उंदीर, ससा, कासव, बगळा, कावळा, अशी जनावरे व पक्षी ही प्रमुख पात्रे आहेत.

दुबळ्या जनावरांनी अक्कलहुशारीने आक्रमक शत्रूपासून आपला बचाव कसा करावा, हे सांगणाऱ्या या इसापच्या बोधकथा अप्रत्यक्षपणे गुलामांनी मालकाच्या छळातून कसे मुक्त व्हावे, याचा बोध देणाऱ्या कथा आहेत. या कथांना गडद सामाजिक संदर्भ आहेत. इसापनितीतली प्रत्येक गोष्ट गुलामाच्या परीप्रेक्ष्यातून पाहिली की, त्या गोष्टीतील सामाजिक अन्यायाविरुद्धचा अंत:प्रवाह आपल्या ध्यानात येतो.

महाकवी होमर अंध होता, असे मानले जाते. इ. स. पू. आठवे शतक हा होमरचा काळ. होमरच्या इलियडचे कथानक आणि रामायणाचे कथानक यात कमालीचे साम्य आहे. ग्रीसची राणी हेलनला ट्रॉयचा राजकुमार पॅरीस पळवून नेतो.

ग्रीक सैन्य ट्रॉयवर चालून जाते. ट्रॉयचा पराभव होतो. राणी हेलनची सुटका होते. ट्रॉयचा राजकुमार पॅरीसबरोबर शारीरिक संबंध ठेवूनही हेलनला स्वीकारले जाते. ओडेसीत ट्रॉयपासून ऍथेन्सपर्यंत परतीच्या समुद्रप्रवासाचे व त्यात आलेल्या संकटांचे वर्णन आहे.

पाच हजार किलोमीटर्सच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या भारताच्या रामायण व महाभारत या महाकाव्यांत ओडेसीएवढे समुद्राचे सर्वांगीण वर्णन नाही. ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ किंवा ‘मॉबी डिक’ यासारख्या कादंबऱ्या कोण लिहिणार? विश्राम बेडेकरांच्या ‘रणांगण’ कादंबरीत समुद्र केवळ मूक पात्र आहे.

अनंत सामंतांची ‘एम. टी. आयवा मारू’ ही कादंबरी हा एकमेव अपवाद आहे. एकशे पाच किलोमीटर्सचा समुद्रकिनारा असून गोमंतकीय कवी बा. भ. बोरकरांच्या कवितेत ‘समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा म्हैना’ यासारख्या समुद्राकडे दूरस्थपणे पाहणाऱ्या ओळी सोडल्या तर खरा समुद्र दिसत नाही.

दुसरे गोमंतकीय कवी र. वि. पंडित यांची ‘दर्या गाजोता दर्या गाजोता दरेका ल्हारांमदीं देव दिसोता’ ही कविता लोकप्रिय झाली, पण बोरकर काय पंडित काय समुद्राच्या उथळ पाण्यात पाय बुडवण्यापलीकडे या पांढरपेशा कवींनी समुद्र पाहिलाच नाही. मग त्यांच्या साहित्यांत समुद्र कसा येणार? महाकवी होमर मात्र समुद्रपक्षी (सिगल) असल्याप्रमाणे समुद्राच्या अंगाखांद्यावर खेळला असावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील करासवाडा येथील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

Professional League 2024: स्पोर्टिंग क्लबचा एफसी गोवाला धक्का! स्पर्धेतील सलग तिसरा विजय

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

SCROLL FOR NEXT