देवचारांची टेकडी कामातुरांनी व्यापली

देवचारांच्या भयाने व्यापलेली टेकडी नंतर ‘न भयं न लज्जा’ या अवस्थेत पोहोचलेल्या कामातूर व्यक्तींनी व्यापली.
Christian
ChristianDainik Gomantak
Published on
Updated on

विसाव्या शतकात, एकेकाळच्या बलाढ्य एस्ताद दा इंडियाच्या नवीन राजधानीत, आल्तिनो-पणजी येथील हवामान केंद्राने बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजासह तासाची घोषणा केली.

माझ्या बालपणात, साओ ब्रास (गंडावळी कुंभारजुवा, एके काळी जुन्या शहराची बाह्य तटबंदी आणि त्यातील सात प्रवेशद्वारांपैकी एक असलेले उपनगर) येथे वक्तशीरपणे तासाला घंटानाद करण्यासाठी व्हिकरच्या गाढवावर विश्‍वास ठेवला जात असे.

(लेखकाची आई साओ ब्रास-कुंभारजुवे येथील आहे.) पण इकडे मडगावमध्ये घड्याळाचे यांत्रिकीकरण, बंदुकीच्या गोळ्या किंवा एका अशक्त गाढवाच्या फेऱ्यांऐवजी मॉन्ते सॅक्रिस्टनने कपेलची घंटा तासाच्या तंतोतंत तेवढ्या वेळा वाजवली.

दिवसा सभोवतालच्या ध्वनीच्या पातळीची घातांकीय वाढ आणि स्थानिक समृद्धीचे स्तर जे सहजपणे वेळ-पाळण्याच्या उपकरणांच्या संपूर्ण श्रेणीला परवडतात, हे लक्षात घेता, ही प्रथा अजूनही प्रचलित असती तर असे वाटून जाते.

जुन्या शहराच्या मध्यभागातून मॉन्ते कपेलकडे जाण्यासाठी लार्गो दे पे जुझे वाझच्या पूर्वेकडील टोकापासून एक लहान रस्ता होता. हा रस्ता मंदिरातील भटांच्या आणि त्यांच्या मठांच्या पूर्वीच्या घरांजवळून जात असे.

काल्सादा दे नोस्सा सेनोरा दे पिएदाद (काल्सादा म्हणजे एक खडी व दगडांनी भरलेला उताराचा रस्ता. हे दगड घोडे आणि गाड्या सरकण्यापासून रोखण्यासाठी घातले जात) नावाचा रस्ता वरच्या वाटेवर पहिल्या वळणावर संपे. डॉ. विसेन्ट कोलासो यांनी चर्च स्क्वेअरमधील त्यावेळी अस्तित्वात असलेल्या शेवटच्या घराला कुंपण बांधल्याने अरुंद झाला.

या ठिकाणी, एउ पे दे मोन्ते (टेकडीच्या पायथ्याशी) नावाचा एक लांबलचक दगडी जिना होता डाव्या बाजूने वळून व पुन्हा उजव्या बाजूने वळून मॉन्तेेच्या पठारावर विसावत असे. जिना आणि दोन्ही बाजूची जमीन ही खाजगी मालमत्ता होती.

ही जमीन विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात एका बिल्डर्स फर्मला विकण्यात आली होती, जिना नाहीसा झाला आणि त्याच्या जागी आज काही इमारती आणि बंगल्यांची वसाहत आहे, ज्यामध्ये तीन सारख्याच इमारतींचा समावेश आहे. पलीकडे मॉन्ते कपेलमध्ये बोर्डा आणि घोगळ किंवा त्याऐवजी आज विद्यानगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातून येता येत असे.

एउ पे दे मोन्तेपासून मॉन्ते कपेलपर्यंत वाहनाने जात येईल, असा रस्ता प्रथम फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी त्यांची लहान मुलगी, आना फ्रान्सिस्का फर्नांडिस यांच्या स्मरणार्थ बांधला होता. या रस्त्याच्या कडेला एका दगडी स्मारकावर बसवलेला संगमरवरी फलक आज अर्धवट अवस्थेत झाडाझुडपांनी वेढलेला आहे आणि तो पडण्याचा धोका आहे.

या छोट्याशा स्मारकाच्या आधी एक चढावावर जाताना, रस्त्याच्या त्याच (डाव्या) बाजूला अँथनी मेंडिसच्या वडिलांनी बांधलेले घर होते, जिथे भावी तियात्रिस्ट आणि गोमंतकीय रंगमंचावरील सर्वांत मोठा विनोदी कलाकार जन्माला आला होता. त्यानंतर हे घर प्रस्तावित खाजगी रुग्णालयासाठी पाडण्यात आले.

उजवीकडे थोडे पुढे गेल्यावर हॉस्पिसिओच्या उत्तरेकडील एक जिना जुन्या पे मिरांडा रोडपासून नवीन मॉन्ते रोडला जोडण्यासाठी बांधण्यात आला होता. कपेलपर्यंतचा पूर्ण मॉन्ते रोड आज कॅलसादा दे नोसा सेन्होरा दा पिएदाद म्हणून ओळखला जातो. मडगाव नगरपालिकेने १९८०च्या सुरुवातीला रस्त्याचे डांबरीकरण केले होते.

हॉस्पिसियो हॉस्पिटलच्या कपेल आणि टीबी सेनेटोरियम व्यतिरिक्त, वसाहत युगाच्या शेवटपर्यंत पठारावरील पोर्तुगीज लष्करी छावणीशिवाय मॉन्तेवर कोणतेही निवासस्थान नव्हते. त्यात पोर्तुगीज सैनिक राहायचे. नंतरचे कर्मचारी बहुतेक गोमंतकीय सैनिक होते. कॅम्प आता आर्मी सप्लाय कॉर्प्सचा अन्न पुरवठा डेपो आहे.

देवचारांच्या भयाने व्यापलेली टेकडी नंतर ‘न भयं न लज्जा’ या अवस्थेत पोहोचलेल्या कामातूर व्यक्तींनी व्यापली. (दोन स्थानिक राजकारण्यांमधील भांडणानंतर १९८०च्या दशकाच्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणात वसवलेल्या राजकीयदृष्ट्या प्रेरित झोपडपट्ट्यांबद्दल तर न बोललेलेच बरे). १९६०च्या दशकाच्या उत्तरार्धात, एक श्रीमंत मडगाव व्यापारी आणि त्याचा शिंपी, स्थानिक बाजारपेठेतील दोन कामुक व टंच मच्छीमार-महिलांसह उत्तररात्री टेकडीवर गेला होता.

सोरोस कुटुंबाची अद्याप शिल्लक असलेल्या तुरळक काजूच्या झाडाखाली प्रणयक्रीडा सुरू होती. जवानांनी त्यांच्या छावणीच्या गेटजवळून चौघांना जाताना पाहिले होते. ते त्यांचा पाठलाग करत काजूच्या झाडांजवळ पोहोचले.

पुढे जे घडले ते अवर्णनीय आणि अ-लौकिक होते. त्यातील दोन्ही पुरुषांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आणि महिलांच्या बाबतीत जे घडले, त्याचे वृत्त फेलिसिओ कार्दोझेचे स्थानिक वृत्तपत्र, ‘सोत’(सत्य, की दिवटी?)मध्ये छापून आले. मथळाच फार चित्तवेधक होता; ‘जाम करून, घरा धाडली’ (पूर्ण थकवून घरी पाठवले). अधिक सांगणे नलगे!

Christian
Goan Culture: गोव्याची मिश्र संस्कृती

२. नुवें येथील जीझस-मारिया-जुझे कपेल (१६९५, कोलाको कुटुंबाचे खाजगी कपेल) : दक्षिणेकडील नावेलीमप्रमाणे, नुवें हा उत्तरेकडील मडगावचा पूर्वीचा प्रभाग होता. दोन्ही प्रभागांचे स्वत:चे असे कोणीही गावकरी किंवा कोमुनिदाद नव्हती.

काही राशोलमधील आणि काही मडगावमधील रहिवाशांच्या नुवेंमध्ये मोठ्या जमिनी होत्या (उर्वरित मडगाव कोमुनिदादची इस्टेट). नुवें हे शेतीप्रधान क्षेत्र असल्याने प्रामुख्याने ख्रिश्चन गावडा येथे राहत होते.

बोर्जेस, कोलासो आणि रिबेलो यांसारखी राशोल आणि मडगाव येथील काही कुटुंबे नुवेंमध्ये स्थलांतरित झाली. नुवें (याचा पोर्तुगीज भाषेतील अर्थ ढग असा होतो) एकेकाळी एक सुंदर आणि आरोग्यदायी ठिकाण होते.

Christian
Celibacy: ब्रह्मचर्य म्हणजे काय?

जुझे कोलासो हे आधी पाहिलेल्या अंता पै यांचे १७व्या शतकातील वंशज होते, ज्यांचे राशोल येथे मृत्यूशय्येवर पेरो कोलासो म्हणून ख्रिस्तीकरण झाले होते. राशोल येथे राहत असताना जुझेच्या कुटुंबाकडे नुवेंमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जमिनी होत्या (कुटुंब १८व्या शतकाच्या मध्यात मडगाव येथे स्थलांतरित झाले).

जुझेने नुवेंमध्ये एक समरहाउस बांधले आणि नंतर १६९४मध्ये, घराला जोडलेले एक खाजगी कपेल बांधले. येशू-मारिया-जुझे यांना समर्पित हे कपेल २१,००० झेराफिन खर्चून बांधले गेले. त्यात तीन वेदी, एक सोन्याचे पीठ आणि दोन बुरूज होते.

जानेवारी १६९५मध्ये पहिल्या मासच्या पूर्वसंध्येला रात्री जेरोनिमो बार्रेतो (बहुधा मडगावच्या बार्रेतो गावकर घराण्यापैकी असावेत) आणि फादर आंतोनियो साल्वादोर कोलासो (बहुधा राशोलच्या जुझे कोलासो कुटुंबापैकी) यांना या भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Christian
Celibacy: ब्रह्मचर्य म्हणजे काय?

येशू-मारिया-जुझे यांना समर्पित केलेले हे कपेल, कालांतराने गरीब शेतकऱ्यांमध्ये गरिबांच्या आईसाठी (माई दोस पोब्रेस) प्रसिद्ध झाले. श्रीमंत कुटुंबातील कपेल गरिबांच्या आईच्या नावे ओळखले जाणे, हा गमतीशीर विरोधाभास आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी साजरी होणारे माई दोेस पोब्रेसचे फेस्त व्यावहारिकदृष्ट्या मुख्य फेस्त आहे. पूर्वी या फेस्तात गुराढोरांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या फेस्ताला ‘गोरवांचे फेस्त(गुरांची जत्रा) म्हटले जात असे.

योगायोगाने, नावेली या मडगावच्या दक्षिणेकडील वॉर्डातसुद्धा फेस्तामध्ये गुरांचा व्यापार होत असे. त्यावेळी, तळावलीचे ग्रामस्थ फेस्तात गुरे आणण्यासाठी घाट ओलांडून जात असत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com