Goa Election 2022: मडकई मतदारसंघामध्ये सुदिन ढवळीकरांचा प्रतिस्पर्धी कोण? Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Election 2022: मडकई मतदारसंघामध्ये सुदिन ढवळीकरांचा प्रतिस्पर्धी कोण?

मगोचा अढळ बालेकिल्ला; मतदारसंघात हवे सुसज्ज इस्पितळ; जलमार्ग जोडताना पुलांची बांधणी काळाची गरज

नरेंद्र तारी

फोंडा: फोंडा तालुक्यातील महत्त्वाचा ठरलेल्या मडकई मतदारसंघावर आतापर्यंत मगो पक्षाचेच वर्चस्व राहिले आहे. 1972 ते गत 2017 ची निवडणुकीचे निकाल पाहिले, तर फक्त एकदाच भाजपचा उमेदवार या मतदारसंघात निवडून आला आहे. उर्वरित नऊवेळा मगो पक्षाने आपले वर्चस्व अबाधित ठेवताना सर्वाधिक पाचवेळा सुदिन ढवळीकर यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. एकंदर मगो पक्षाचा बालेकिल्ला ठरलेल्या या मतदारसंघात विद्यमान आमदार सुदिन ढवळीकर यांच्यावर मात करणे तेवढे सोपे नाही हे विरोधक पूर्णपणे जाणून आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत एकमेकांबरोबर युती करून ढवळीकर यांना शह देण्याचे प्रयत्न होणार आहेत, मात्र सुदिन ढवळीकर हे या वेळेलाही निर्विवादपणे निवडून येतील, असा ठाम विश्‍वास मगो पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

मडकई मतदारसंघ हा कवळे, बांदोडा, वाडी-तळावली, दुर्भाट-आडपई-आगापूर, मडकई व कुंडई अशा सात पंचायतींचा समावेश असलेला विशेषतः ग्रामीण भाग असलेला मतदारसंघ आहे. कृषीप्रधान असलेल्या या मतदारसंघात शेती बागायती सर्वाधिक आहे. मंदिर पर्यटनासाठी मतदारसंघ प्रसिद्ध आहे.

मिथिल ढवळीकरही चर्चेत

येत्या निवडणुकीत मगो पक्षातर्फे सुदिन ढवळीकर निश्‍चित आहेत. याशिवाय ढवळीकर यांचे पुत्र मिथिल ढवळीकर यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. ढवळीकर ट्रस्टच्या माध्यमातून मिथिल ढवळीकर यांनी सामाजिक उपक्रम हाती घेतल्याने त्यांचाही जनसंपर्क वाढला आहे. त्यामुळे सुदिन यांचे वारसदार म्हणून मिथिल यांचे नाव पुढे येत आहे.

रवींमुळे चुरशीची लढत

फोंड्याचे विद्यमान आमदार रवी नाईक हे मडकई मतदारसंघातून 1989 मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आणि विकासकामे उभी राहिली. या विकासकामांचा पाठपुरावा करण्याची आज गरज आहे आणि नेमका तोच मुद्दा विरोधकांनी हाती घेतला आहे. त्यावरूनच सुदिन ढवळीकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालला आहे. तरीही 1999 ते 2017 च्या निवडणुकीचा आलेख घेतला तर प्रत्येक निवडणुकीत मगो पक्षाची मते वाढली आहेत. त्यामुळे ढवळीकर यांना शह देणे तेवढे सोपे नाही. गेल्या निवडणुकीत भाजपचे प्रदीप शेट यांनी मगोच्या विरोधात उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्यांचा तेवढा प्रभाव दिसला नाही. आता ढवळीकर यांचे खंदे समर्थक आणि भाजपमध्ये प्रवेश केलेले सुदेश भिंगी यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. रवी नाईक यांनी या मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मगो लय भारी...

मतदारसंघात सद्यस्थिती पाहिली तर मगो पक्ष लय भारी ठरला आहे. आमदार सुदिन ढवळीकर यांनी सुरवातीला 11, 587 मतांवरून आता मागच्या 2017 च्या निवडणुकीत 17093 वर झेप घेतली आहे. मगोची मतांची आकडेवारी या मतदारसंघात चढतीच आहे. भाजपने आपले कार्य विस्तारायला सुरवात केली असून त्यांनी संपर्क मोहीम वाढवली आहे, पण मगो पक्षाला शह देणे हे मोठे आव्हान आहे.

रवींनी टाकला बॉम्ब

अलिकडेच फोंड्याचे काँग्रेसचे आमदार रवी नाईक यांनी आपण मडकईतून निवडणूक लढवू शकतो, असे सांगून बॉम्बगोळाच टाकला. 1989 च्या निवडणुकीत मगो पक्षातून रवी नाईक या मतदारसंघात निवडून आले होते. त्यांचा असा खास मतदारही येथे आहे. त्यामुळे या वेळेला कदाचित आपण पुन्हा एकदा मडकईत येऊ इच्छितो, असे त्यांनी सांगितले आहे. रवी यांनी मडकईतून येत्या निवडणुकीत उमेदवारी दाखल केली तर कदाचित सुदिन आणि रवी यांच्यात थेट लढत होऊ शकते.

औद्योगिक वरदान

औद्योगिक क्षेत्राला चालना देणारी मडकई औद्योगिक वसाहतही या मतदारसंघात असल्याने रोजगाराच्यादृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. या मतदारसंघात सरकारी नोकरही सर्वाधिक असल्याचा अहवाल आहे. इतर सर्व बाबी असल्या तरी मतदारसंघात सुसज्ज, असे इस्पितळ उभारण्याची आवश्‍यकता आहे. रासई-दुर्भाट किंवा मडकई-आगशी जलमार्ग जोडताना पुलांची बांधणीही नजीकच्या काळात व्हायला हवी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT