Cafe Dainik Gomantak
ब्लॉग

Cafe In Goa: द फित्ती कॅफे

या कॅफेत गरम गरम कॉफी पीत अक्षरशः एक तास मी शांतपणे शून्यात नजर लावून पावसाचे निरीक्षण करत बसले.

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे- नायक

पणजी हे अनोख्या कॅफेंचे शहर बनले आहे. इथे दर तीन चार महिन्यांनी एखादे नवे कॅफे सुरू झालेले दिसते. मध्यंतरी पणजीतील फार्मसी कॉलेजच्या रस्त्यावर चालत जात असताना एक नवा कॅफे दिसला.

‘द फित्ती कॅफे’ असे आगळेवेगळे नाव वाचून क्षणभर थांबले. ‘फित्ती’ हे कसले नाव? साहजिकच हा प्रश्न पडला. कॉफीशी तर संबंध नाही ना असे वाटून गेगे. वेगळेच नाव असल्यामुळे पक्के लक्षात राहिले. मग नंतर ठरवून ‘द फित्ती कॅफे’मध्ये कॉफी प्यायला गेले.

प्रत्येक कॅफेचा आपला स्वतंत्र असा चेहरामोहरा असतो. ‘द फित्ती कॅफे’त मला सर्वांना सामावून घेणारे वातावरण दिसले. तरुणाई, मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातील वर्गाला ‘द फित्ती कॅफे’ने सामावून घेतलेय. सजावटीचा अजिबात भपका नाही की, जोरदार संगीत वाजवून हैराण करणे नाही.

मी गेले होते तेव्हा बऱ्यापैकी पाऊस पडत होता. मोठ्या खिडकीत बसून बाहेर कोसळणारा पाऊस बघत शांतपणे ‘कॅपचिनो’ पिताना बरे वाटले. दिवसभराच्या धावपळीला जरासा पूर्णविराम दिल्यासारखे झाले.

दिवसभर डोके कोणत्या ना कोणत्या कामात, नियोजनात व्यग्र असते. यात कधीतरी स्वतःसाठी वेळ काढावा लागतो. छान वाफाळणारी कपभर कॉफी पिऊन, थोडेसे निवांत बसून स्वतःला ‘रिचार्ज’ केले की पुन्हा नव्या जोमाने कामाला लागता येते.

पण असे निवांत, स्वतःच्या विचारांमध्ये गुंगून जाऊ देणारे वातावरण असायला हवे. असे वातावरण मला ‘द फित्ती कॅफे’मध्ये अनुभवायला मिळाले. गरमगरम कॉफी पीत अक्षरशः एक तास मी शांतपणे शून्यात नजर लावून पावसाचे निरीक्षण करत बसले.

ब्रेकफास्टसाठी स्पेशल मेन्यू

‘द फित्ती कॅफे’ मधला सगळाच मेन्यू छान आहे. पण मला ब्रेकफास्टसाठी तयार केलेला खास मेन्यू फार आवडला. विविध प्रकारचे ऑम्लेट आणि त्यासोबत तसेच वेगवेगळे ब्रेड, बेक्ड एग शशुका, पोळी (पावाचा प्रकार) व्हेज सॅन्डविच असे पदार्थ तर आहेच पण इथे ‘ब्रेकफास्ट प्लॅटर’ मिळते आणि त्यात सहा प्रकारचे पदार्थ मिळतात.

अंड्यापासून बनवलेले तुम्ही काहीही यात निवडू शकता; जसे की उकडलेले अंडे किंवा ऑम्लेट किंवा एग हाफ फ्राय यातले काहीही एक निवडू शकता. मग वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या- बीन्स, ब्रोकोली, गाजर, पालक, मटार, मशरूम या हलक्या फ्राय करून त्यासोबत दिल्या जातात.

यासोबत ब्रेड बटर असतो शिवाय आणि एखादा छोटासा गोड पदार्थ दिला जातो. मग हे सगळे तुम्ही कॉफी किंवा चहासोबत आरामात खाऊ शकता. तुम्हांला यातील एखादा पदार्थ नको असेल तर तुम्ही यात दुसरा वेगळा पदार्थ निवडू शकता.

290 रुपयात ‘ब्रेकफास्ट प्लॅटर’चा आस्वाद घेता येईल. याशिवाय पॅनकेक्स, पनीर, बटाटा, चीज पराठादेखील मिळतो. ब्रेकफास्टसाठी एवढे सगळे भरपूर झाले ना!

सकाळ -दुपार आणि रात्र अशा प्रत्येक प्रहारासाठी इथे खूप काही वेगळे खायला मिळते. लोकांची मागणी, आवड बघून इथे आता वडापाव आणि मिसळदेखील मिळू लागलीय. व्हेज आणि नॉनव्हेज सॅन्डविचचे असंख्य प्रकार आहेत.

फ्रान्समधील प्रसिद्ध ‘बुगेट’ या पावासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या संगती करून स्वादिष्ट अशा पदार्थांची निर्मिती केली आहे. यात तंदुरी पनीर, तंदुरी चिकन खाऊ शकता. आपल्या गोव्यातील पोळी (पाव)सोबतदेखील अशीच कल्पकता वापरून नवीन पदार्थांची निर्मिती केलीय. त्याला

‘पोयीझा’ असे नाव दिलेय. या पोयीझामध्ये ‘रस्टिक पनीर पोयीझा’ आणि ‘चिकन कॅफरियाल पोयीझा’ मिळतो. रोस ऑम्लेट, बार्बेक्यू चिकन विंग्स, रोस्टेड चिकन, व्हेज द फित्ती प्लॅटर, नॉन व्हेज द फित्ती प्लॅटर असे असंख्य आगळे वेगळे पदार्थ आहेत.

बर्गर, पिझ्झा, पास्ता, सलाडदेखील मिळते. पण नेहमी तेच पदार्थ खाण्यापेक्षा जरा आगळेवेगळे पदार्थ खाऊन बघण्यासारखे आहेत. माझे इथे बरेच रेंगाळून झाल्यावर आणि काउंटरवर असलेला मुलगा मोकळा आहे हे बघून मी त्याला फित्ती नावाबद्दल विचारलेच.

तर फित्ती हे इटलीमधील गावाचे नाव आहे. आता फित्तीच नाव का? हे याच्या मालिकच माहीत. ते तिथे नसल्यामुळे हा उलगडा झाला नाही. नावात काय आहे? असे म्हटले जाते. पण नावातच खूप काही असते. फित्ती हे लक्षात राहण्यासारखे, उत्सुकता वाढवणारे आहे. त्याहीपेक्षा चविष्ट पदार्थ मिळणारे कॅफे आहे हे महत्त्वाचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT