Relationship Dainik Gomantak
ब्लॉग

मुलांनो! मुलींसाठी होयबा होऊ नका

स्त्री-पुरुष एकमेकांना आवडण्यासाठी अनेक कारणं असतात

दैनिक गोमन्तक

प्रत्येकाला माहित आहे की, मानवी स्वभावानुसार विरुद्ध गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. स्त्री-पुरुष एकमेकांना आवडतात (Love) अशा अनेक गोष्टी असतात, तर अशा अनेक गोष्टी असतात ज्या त्यांना अजिबात आवडत नाहीत. प्रत्येकामध्ये काही चांगले तसेच काही वाईट गुण असतात.

महिलांबद्दल बोलायचे झाले तर महिला पुरुषांबद्दलच्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष देतात. अशा स्थितीत महिलांना पुरुषांच्या काही सवयी अजिबात आवडत नाहीत. याचा अर्थ असा नाही की एखाद्या स्त्रीला संतुष्ट करण्यासाठी तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदलले पाहिजे. तुम्हाला फक्त आपल्या काही सवयींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एखादी स्त्री आवडत असेल तर तुम्हाला काही गोष्टी आधीच माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला नकाराचा सामना करावा लागणार नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या प्रकारचे पुरुष महिलांना अजिबात आवडत नाहीत.

स्वत:ला महान समजू नका - महिलांना स्वत:ला उच्च आणि महिलांना नीच समजणारे पुरुष आवडत नाहीत. महिलांना अशा लोकांपासून नेहमी दूर राहणे आवडते जे त्यांना अपमानित करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हीही अशी व्यक्ती असाल तर लगेचच तुमची सवय बदला. आजचे युग स्त्री आणि पुरुष दोघांनी सोबत चालण्याचे आहे आहे. स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, परंतु काही क्षेत्रात महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. त्यामुळे महिलांना हीन समजण्याची चूक करू नका.

होयबा होऊ नका - एखाद्या गोष्टीवर त्यांची भूमिका न मांडता हो ला हो करणारे पुरूष महिलांना आवडत नाही. अनेकवेळा असे घडते की महिलांना प्रभावित करण्यासाठी पुरुष त्यांच्या हो ला हो करतात. असे केल्याने तुम्ही कोणत्याही स्त्रीला काही दिवसांसाठीच संतुष्ट करू शकाल पण त्यानंतर समोरच्या व्यक्तीला असे वाटेल की, तुमचे स्वतःचे काही मत नाही आणि तुम्ही फक्त त्यांचे मन वळवण्यासाठी त्यांना इंप्रेस करण्याचे काम करत आहे. त्यामुळे तुमची ही सवय बदला.

जोडीदाराच्या रूपात लहान मूल- तुम्ही बाहेरून कितीही आकर्षक असलात तरी काही फरक पडत नाही, पण तुमचे मन जर लहान मुलासारखे असेल तुम्ही लहान मुलांसारखे वागत असाल तर महिला तुम्हाला अजिबात पसंत करणार नाहीत. महिलांना पुरुषांवर अवलंबून राहणे आवडत नाही. त्यांना जोडीदाराचे लहान मुलासारखे बोलणे किंवा वागणे आवडत नाही. जर तुम्ही दिवसभर घरी बसून वेळ वाया घालवत असाल तर कोणतीही स्त्री तुम्हाला पसंत करणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही या सवयींमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.

उपदेशक होऊ नका- केवळ स्त्रियाच नव्हे, तर पुरुषही अशा व्यक्तींचा तिरस्कार करतात जे सतत ज्ञानाच्या गोष्टी सांगत असतात. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा लोकांना कशाचीही पर्वा न करता फक्त आनंद घेणे आवडते. अशा परिस्थितीत जे लोकं पूर्णवेळ प्रवचन देत असतील अशा पुरूषांवर महिला खूप नाराज होतात. त्यामुळे महिलांना असे लोक अजिबात आवडत नाहीत.

डोमिनेटिंग बॉईज- काही मुलांची सवय असते की ते सर्वांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांची इच्छा असते की त्यांनी आपल्या जोडीदारावर नेहमी नियंत्रण ठेवावे. जर तुम्हीही असे असाल तर महिलांना असे पुरूष अजिबात आवडत नाहीत. आजकाल मुली खूप हुशार आहेत आणि त्यांना त्यांच्या अटींवर जगायला आवडते त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT