bombli Restaurant
bombli Restaurant  Dainik Gomantak
ब्लॉग

खाद्यभ्रमंती: एशियन चव देणारे; बोमली

Manaswini Prabhune-Nayak

मनस्विनी प्रभुणे-नायक

पणजीत इतक्या झपाट्याने नवीन रेस्टोरंट सुरू होत आहेत की त्यावर लिहिण्यासाठी आता एक यादी तयार करावी लागेल. आता रेस्टोरंट सुरू होण्यापूर्वी त्याचा जोरात प्रचार सुरू होतो. सोशल मीडियावरील पोस्टमुळे आपोआप समजते.

शिवाय आता आमचे वाचक, स्नेही परिवारातील अनेकजण कुठे काही नवे खाल्ले की कळवतात. गेल्या आठवड्यात पणजीमध्ये असेच एक नवे कोरे रेस्टोरंट सुरू झाले. डॉन बास्कोत नॅचरल आइस्क्रीम शेजारी ‘बोमली’ नावाच्या रेस्टोरंटची पाटी दिसली.

‘बोमली’ हे नाव वाचून आश्चर्य वाटले. रेस्टोरंट एशियन पदार्थांचे आहे त्यांच्या नावाच्या पाटीवरून समजले. अगदी अलीकडेच सुरू झालेय हे लक्षात येत होते.

इथे याच जागेत आधी एका छान वेगळ्या संकल्पनेवर आधारित असलेले रेस्टोरंट होते. त्या जागी ‘बोमली’ नाव समोर येताच थोडेसे हरवल्यासारखे झाले. अर्थातच ते पूर्वीचे रेस्टोरंट बंद पडले असणार किंवा ते तिथून स्थलांतरित झाले असेल.

‘बोमली’चा अर्थ

‘बोमली’ या नावाची पाटी बघताच जरा आश्चर्य वाटले. एशियन पदार्थांचे रेस्टोरंट आणि नाव बोमली कसे काय? बर कदाचित हे कंबोडियन, व्हिएतनामी, मलेशियन, जपानी यातले काहीतरी असेल अशी उगाच स्वतःची समजूत घालून घेतली. पण काही केल्या कुठून नावाचा अर्थ जुळत नव्हता. कोकणीत बोमली म्हणजे ‘बेंबी’ हे माहीत होते.

पण एकूणच एशियन, चायनीज रेस्टोरंटचे नाव कोकणी असू शकते हे काही डोक्यात आले नाही. पण खरेच हे बोमली म्हणजे कोकणीतले ‘बोमली’ आहे. जिथून आपली नाळ आईशी जोडलेली असते, आईच्या गर्भात असताना आपल्या बेंबीशी जोडलेल्या नाळेच्या माध्यमातून आपण अन्नाची पहिली चव घेतो.

आईशी जोडणारे, आपल्या पहिल्या अन्नाशी जोडणारी बेंबी म्हणजे ‘बोमली’, असा एक विस्तृत अर्थ या रेस्टोरंटने पकडला आहे. या रेस्टोरंटचे मालक नक्कीच कोकणीप्रेमी असले पाहिजे. ज्यांनी ‘मेड इन एशिया’, ‘कुंग फू’ अशा पद्धतीचे नाव न ठेवता. इथल्या लोकांच्या भावनांच्या जवळ जाणारे नाव ठेवले.

‘बोमली’मध्ये काय मिळते?

तर ‘बोमली’ हे ‘पॅन एशियन’ म्हणजेच आशिया खंडातील सर्व देशांमधील पदार्थ मिळणारे रेस्टोरंट आहे. कंबोडियन, मलेशियन, व्हिएतनामी, जपानी, चायनीज अशा देशांमधील वेगवेगळे पदार्थ इथे मिळतात.

नूडल्स, फ्राइड राइस, डम्पलिंग्स, थाइ करी, बाउल मीलपासून ते मी फिश, कंबोडियन पद्धतीचे हिरव्या मिरी घालून केलेले प्रॉन्स, लसूण आणि मिरी घातलेले थाइ पद्धतीने बनवलेले प्रॉन्स, मलेशियन रिदान्ग करी, इंडोनेशियन चिली साम्बल असे खूप वेगळे पदार्थ आहेत.

पदार्थांची ही नावे ऐकून इथे शाकाहारी काही मिळत नसेल असे तुम्हाला कदाचित वाटू शकेल. पण तसे काही नाही. या नॉनव्हेज पदार्थांइतकेच अतिशय वेगळेच शाकाहारी पदार्थ इथे मिळतात.

श्रीलंकन करी विथ चेरी टोमॅटो, सुमात्रन (सुमात्रा देशातली) करी, उत्तर थायलंडमधील ‘जंगल करी’, कंबोडियन पमकीन करी, बँकाक पद्धतीचे नूडल्स, इंडोनेशियन बम गोरेंग, थायी चिली बेसिल नूडल्स इतके सगळे शाकाहारी पदार्थ इथे मिळतात.

काही पदार्थांची नावे मी पहिल्यांदा ऐकली. मेन्यू नीट समजला नाहीतर वेटर आपल्याला पदार्थांबद्दल, त्यातील घटकांबद्दल माहिती देतात.

शाकाहारी पदार्थांमध्ये खूप वेगवेगळ्या चवींचे पदार्थ आहेत. म्हणजे एशियन शाकाहारी पदार्थ खाण्यासाठी मुद्दाम जावे असे हे रेस्टोरंट आहे.

आम्ही लसूण आणि मिरी घातलेले थाइ पद्धतीने बनवलेली फिशची डिश, ब्रन्ट अंडा फ्राइड राइस, पानको चिकन, कंबोडियन पद्धतीचे हिरव्या मिरी घालून केलेली फिश ग्रेव्ही असे खाऊन बघितले. घरी कायम मासळी खातोच.

पण या कंबोडियन, व्हिएतनामी, इंडोनेशियन पद्धतीच्या मसाल्यांमध्ये, ते शिजवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्याच मासळीची चव कशी वेगळी लागते ते इथे येऊन अनुभवण्यासारखे आहे.जुन्या पिढीला मासळीमध्ये तसे अजून काही प्रयोग केलेले आवडत नाहीत.

पण आताची तरुण पिढी खाण्याच्याबाबतीत खूप नवनवीन प्रयोग करून बघायला उत्सुक असते. पारंपरिक पदार्थांपेक्षा त्यांना ‘फ्युजन फूड’ अधिक आवडते. आताच्या पिढीचा जेवणाचा ‘पॅटर्न’देखील बदलत आहे.

‘शीत -हुमण-कढी’ची जागा पास्ता - नूडल्सने घेतली आहे. त्यामुळे इथे तरुणाई अधिक दिसते. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की मध्यम आणि ज्येष्ठ वयाच्या लोकांनी हे एशियन आगळेवेगळे पदार्थ कधी खाऊन बघायचेच नाहीत.

इथला मेन्यू सर्व वयोगटातील खवय्यांना डोळ्यांसमोर ठेवून तयार केला आहे. मुद्दाम काही वेगळे करू पाहणाऱ्यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे शेवटी तुमच्या हातात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT