अनवट इतिहास : डचांचा पोर्तुगिजांवर हल्ला

हळूहळू डचांनी पोर्तुगीज साम्राज्याच्या किनारी वसाहती जिंकण्यास सुरुवात केली. मलाक्का ताब्यात घेतला, सिलोनमधील पोर्तुगीज वसाहती जिंकल्या आणि कोचीन आणि मलबार किनारपट्टीवरील इतर प्रदेश काबीज केले.
Dutch attack the Portuguese
Dutch attack the PortugueseGoogle
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

डच ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील व्यापारावर वर्चस्व मिळवण्यासाठी अरबी समुद्रात पोर्तुगिजांशी कडवा लढा दिली.

१६३६ मध्ये जेव्हा अँटोनियो व्हॅन डायमेन यांना डच ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर-जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले तेव्हा त्यांनी उपसागरात, भारतातील पोर्तुगीज मुख्यालयाजवळ त्यांच्या व्यापाऱ्यांना बाहेर पडणे अशक्य करण्यासाठी वार्षिक नाकेबंदी सुरू केली.

२५ जुलै १६३९ रोजी डच ईस्ट इंडिया कंपनीचे अ‍ॅडमिरल कॉर्नेलिस सिमोन्स व्हॅन डर वीर यांच्या नेतृत्वाखाली सात जहाजांचा एक स्क्वॉड्रन बटाव्हिया येथून निघाला, १५ सप्टेंबर रोजी गोव्याजवळ जमलेल्या ताफ्यापर्यंत बातमी पोहोचली की, पोर्तुगीज गव्हर्नर ६ जून रोजी मरण पावला होता आणि त्याचा उत्तराधिकारी स्थानिक लोकांचा उठाव मोडून काढण्यासाठी निघाला आहे.

झुआरी नदीच्या मुखाशी किल्ले मुरगावच्या परिसरात तीन नि:शस्त्र गॅलियन असल्याचीही अफवा पसरली होती. डच ईस्ट इंडिया कंपनीचे अ‍ॅडमिरल व्हॅन डर वीरने ३० सप्टेंबर रोजी झालेल्या अचानक हल्ल्यात त्यांना पकडण्याचा किंवा नष्ट करण्याचा निर्णय घेतला.

डच आर्काइव्हजमध्ये जतन केलेल्या अ‍ॅडमिरलच्या फ्लॅगशिपच्या जर्नलमधून या मोहिमेबद्दलची विस्तृत माहिती मिळते. एक अहवाल पोर्तुगिजांच्या बाजूने व दुसरा डच अहवाल जो १६४०मध्ये प्रकाशित झाला होता आणि त्याच वर्षी इंग्रजीमध्ये अनुवादितदेखील झाला होता, आपल्याला पाहायला मिळतो.

Dutch attack the Portuguese
Goa Sports News: खेळाडूंची सुरक्षा आणि सुरक्षिततेवर भर

डच अहवालात असे म्हटले आहे की डच ईस्ट इंडिया कंपनीचे अ‍ॅडमिरल व्हॅन डर वीरने डच सैनिकांना रोइंग बोटीतून जाऊन पोर्तुगीज गॅलियनच्या डेकवर चढण्यासाठी आज्ञा दिली होती. तीन पोर्तुगीज गॅलियनविषयी यात लिहिले आहे.

मध्यभागी असलेला साओ बोव्हेंटुरा याच्याजवळ शस्त्रसाठा होता, पण ते जहाजावर युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित नव्हते, युद्धसज्ज नव्हते. त्यांच्या बाजूल असलेले गॅलियन बॉम जीझस आणि गॅलियन साओ सेबॅस्टिओ, हे दोघे खाडीत नि:शस्त्र होते.

या दोन नि:शस्त्र गॅलियनमधील तोफा समुद्रकिनाऱ्यावर पडून असल्याचे पोर्तुगीज अहवालात म्हटले आहे. डचांनी केलेल्या या हल्ल्याचे चित्रण व्हॅन अँथोनिसनच्या पोर्तुगीज गॅलियन साओ बोव्हेंटुराचा स्फोट या चित्रात अजरामर झाले.

जगप्रसिद्ध चित्रकार व्हॅन अँथोनिसन ऐतिहासिक घटनांचे वर्णन करणारी चित्रे काढण्यासाठी प्रामुख्याने प्रसिद्ध आहेत. त्यांची शेवटची काही कामे जगप्रसिद्ध झाली, त्यापैकी हे एक चित्र आहे.

३० सप्टेंबर १६३९ रोजी कॉर्नेलिस सिमोन्स व्हॅन डर वीर यांच्या नेतृत्वाखाली एक डच स्क्वॉड्रन गोव्याजवळील उपसागरात तीन पोर्तुगीज गॅलियन्सवर हल्ला करत आहे, असे चित्राचे स्वरूप आहे.

सध्या हे चित्र अ‍ॅमस्टरडॅमच्या रिजक्स म्युझियम मधील संग्रहालयात पाहायला मिळते. हे जगप्रसिद्ध चित्रकार हेंड्रिक व्हॅन अँथोनिसन यांचे आतापर्यंतचे सर्वांत मोठे चित्र आणि हे त्यांचे शेवटचे ज्ञात कामदेखील आहे.

हळूहळू डचांनी पोर्तुगीज साम्राज्याच्या किनारी वसाहती जिंकण्यास सुरुवात केली. १६४१मध्ये त्यांनी मलाक्का ताब्यात घेतला, १६५८मध्ये त्यांनी किनारपट्टीवरील सिलोनमधील पोर्तुगीज वसाहती जिंकल्या आणि १६६३मध्ये त्यांनी कोचीन आणि मलबार किनारपट्टीवरील इतर प्रदेश काबीज केले.

डिसेंबर १६४०च्या राष्ट्रीय क्रांतीची आणि स्पेनपासून पोर्तुगीजांच्या स्वातंत्र्याची बातमी आल्यावर डचांनी पुन्हा एकदा गोव्याची नाकेबंदी केली होती. व्हाईसरॉय, काउंट ऑफ एविरास यांनी घोषणेसाठी घाई केली.

पोर्तुगालचा राजा जॉन चौथा याने डचांशी वाटाघाटी करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु बटाव्हियाच्या डच गव्हर्नरने करार स्वीकारण्यास नकार दिला आणि पुन्हा एकदा अयशस्वीपणे गोव्याची नाकेबंदी केली.

समुद्रावर नजर ठेवण्यासाठी पोर्तुगिजांना अनेक जहाजांची गरज होती. १६३१मध्ये ११५ जहाजे सेवेत होती आणि चौल आणि वसईच्या शिपयार्ड्सना दरवर्षी एक गॅलियन बांधण्याची गरज होती.

युरोपमधील शत्रूंचा सामना करण्यासाठी आणि तथाकथित मिरपूड घेऊन जाणाऱ्या जहाजांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मजबूत नौदलाची आवश्यकता होती. मसाल्यांची तस्करी करणे, दक्षिण भारतात खरेदी आणि इतर ठिकाणी विक्री करण्यात गुंतलेले हे खाजगी मालक होते.

जोपर्यंत हे केवळ खाजगी होते तोपर्यंत पोर्तुगीज या समस्येचा सामना करू शकत होते परंतु जेव्हा हा व्यापार डच आणि इंग्लिश ईस्ट इंडिया कंपन्यांनी अधिकृतपणे हाती घेतला, तेव्हा पोर्तुगीज मक्तेदारीचा डोलारा कोसळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com