Fati Biscuits Dainik Gomantak
ब्लॉग

फाती बिस्किट: प्रत्येकाची टेस्ट वेगळी

ही फाती बिस्कीट (Biscuit) ऊर्फ टोस्ट (Toast) माझ्या आयुष्यात कधी आलं ते नक्की सांगता यायचं नाही.

दैनिक गोमन्तक

ही फाती बिस्कीट (Biscuit) ऊर्फ टोस्ट (Toast) माझ्या आयुष्यात कधी आलं ते नक्की सांगता यायचं नाही. जेव्हा कधी चहा माझ्यासमोर फुलपात्रात भरून आला त्याच्या बरोबरीने बाजूच्या ताटलीत फाती बिस्कीट आलेलं मला आठवतं. जेव्हा कधी मी स्वतःला लहानपणी आठवायचा प्रयत्न करतो तेंव्हा स्मरतो कपाटाला पाठ लावून घुड घालून बसलेला मी आणि समोर फुलपात्रभर चहा.

तो चहा सांडू नये म्हणून त्याला ताटली आणि त्या ताटलीच्या भोवती मांडलेले टोस्ट ही माझी मूर्ती माझ्याच डोळ्यासमोर येते. पाव फुलपात्र भरलेला चहा वाढत वाढत अर्ध फुलपात्र होत होत पाऊण फुलपात्रभर मिळू लागला आणि त्याबरोबरींने टोस्ट एकाचे दोन आणि दोनाचे तीन होत गेले. कधी आईने चहा किती देऊ असे विचारताच '' दे दोन टोस्ट बुडेल इतका'' असं उत्तर दिल्याचं आणि आई गालात हसल्याचं अंधुकसं आठवतं.

गरम चहात बुडवलेला सच्छिद्र टोस्ट यथाशक्ती फुलपात्रातला चहा आणि त्या चहाची उष्णता ओढून घेतो आहे आणि तो गरम आणि नरम टोस्टचा तुकडा तुटण्या पडण्याच्या आधी मी जिभेवर झेलतो आहे हे मला कित्येकदा पडलेलं लोभस स्वप्न आहे. आणि हे स्वप्न खरं व्हावं म्हणून मी कित्येकदा चहा टोस्ट घेऊन बसलेलो आहे. माझे बाबा बरेचदा दक्षिण मुंबईतून वेगवेगळ्या बेकरीतून अगदी पारश्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे टोस्ट घेऊन येत. प्रत्येकाची टेस्ट वेगळी असे. काही पांढुरके असत, काही केशरी, काही पिवळट, काही काही सपक असत, काही गोड असत. पण चहाची संपर्क आला की ते सर्व एका जातकुळीत येत.

मग पुढे पार्ल्याला कॅफे मैलूकडून टोस्ट आणले जात. ते किंचित पांढरट असत पण त्याच्या कडा खरपूस भाजलेल्या केशरी असत आणि त्या इतक्या तलम की मूळ टोस्ट चहात बुडण्याआधी निखळून चहात पडत. आणि त्या तलम चहात बुडालेल्या कडा खाणे ही एक वेगळीच ट्रीट असे. टोस्ट जरी संपले तरी त्याचा उरलेला चुरा चहात बुडवून खाणे अमर्याद आनंद असे. मग आम्ही रघुवीर स्टोअर्समधून टोस्ट आणायचो. ते मोठाले, पिवळेजर्द आणि किंचित गोड असत.

तो गोडवा दृष्ट लागून कमी पडू नये म्हणून त्याला काळ्या मनुका खोवलेल्या असत आणि टोस्टसोबत त्या मनुकाही भाजून आल्यावर अफलातून लागत. गोव्याला गेलो तर कॅफे सेंट्रलमधून टोस्ट आणायचे. तिथीम ते घरी आणणे हे एक शास्त्र होते. कॅफे सेंट्रलचे मालक गायतोंडे (मला वाटते, तिसरी पिढी असावी) अजूनही दर्जा सांभाळून आहेत.

आयुष्याचे फुलपात्र किती भरले आहे आणि किती उरले आहे ते माहीत नाही, पण जोपर्यंत हातातला प्राणरूपी टोस्ट (दोस्त) शाबूत आहे तोपर्यंत हा आनंदाचा प्रवास चहात टोस्ट बुडवून तुटायच्या आधी जिभेवर ठेवण्याच्या क्रियेसारखा मनोहर व्हावा, हीच देवी शांताईच्या चरणी प्रार्थना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT