ब्लॉग

जनांच्या कल्याणा चॅनेल्सच्या करामती

तीन महाविभूतींवर, ज्यांच्या जीवनावर दृष्टिक्षेप टाकणाऱ्या मालिका विविध चॅनेल्सवर सुरू आहेत. ह्या प्रभावी माध्यमाचा एक गाढा अभ्यासक असल्यामुळे मला काही वेचक आणि वेधक बाबी तुमच्यासमोर मांडाव्याशा वाटताहेत.

दैनिक गोमन्तक

केशव नाडकर्णी

मी कशाबद्दल आणि कुणाबद्दल बोलतोय हा तुम्हाला, म्हणजेच वाचक मायबापांना, प्रश्न पडला असेल! हो ना? अहो, मी बोलतोय त्या तीन महाविभूतींवर, ज्यांच्या जीवनावर दृष्टिक्षेप टाकणाऱ्या मालिका विविध चॅनेल्सवर सुरू आहेत. ह्या प्रभावी माध्यमाचा एक गाढा अभ्यासक असल्यामुळे मला काही वेचक आणि वेधक बाबी तुमच्यासमोर मांडाव्याशा वाटताहेत.

दररोज नेमाने सात वाजता सुरू होणारी मालिका म्हणजेच ‘शिर्डी संत साईबाबा’ ह्यांच्या जीवनावर आधारित जी सोनी-एचडीवरून सादर होते. यापूर्वीही अनेक मालिका या संतांवर येऊन गेल्या. पण त्या सर्व मालिकांवर वरताण ठरावी अशी ही सुरू असलेली सध्याची मालिका. आमचे छोटे बंधू ही मालिका न चुकता बघतात. तुषार दळवींचा अप्रतिम अभिनय. मला म्हणाले ‘मला तुषार यांच्याशी बोलायचे आहे, फोन लावून देशील काय?’ मी म्हटले ‘हो, लगेच.’

माझ्याकडे तुषारचा फोन क्रमांक नव्हताच. मी पुष्कर श्रोत्रीला फोन करून त्याच्याकडे तुषारचा फोन क्रमांक मागितला. पुष्करने तो तर दिलाच, शिवाय तुषारशी संपर्क साधून अमक्या अमक्या वेळेला माझा फोन येईल, असेही सांगितले. पुष्कर मित्रा, याबद्दल तुला बिग थँक्स. आमचे छोट्या बंधूंनी तुषारकडे बोलून त्यांची प्रशंसा केली आणि वेळ दिल्याबद्दल स्तुतीही केली. आजपर्यंत अनेक सीरिअल्स साईबाबा या महान विभूतीवर झाल्या. अगदी गिरिराज, सुधीर दळवींपासून अभिनेत्यानी गाजवल्या. पण या सर्वांवर वरताण करतात ते सध्या चालू असलेल्या सिरियलमधील तुषार दळवींचा साईबाबा. याला कारण दोन प्रमुख गोष्टी. एक म्हणजे मेकअप दादाची कमाल. अर्थपूर्ण रिसर्च, डीओपीची आणि एडिटिंगची कर्तबगारी. त्यामुळे ही सीरिअल सर्वांवर वरताण ठरतेय, यात शंकाच नाही.

आता वळूया दुसऱ्या विभूतींकडे म्हणजेच बाळूमामा. कलर्स मराठी चॅनलवर साकारणारी ही मालिका अतिशय श्रद्धेनं भारलेली असून या संतांवर अर्थपूर्ण असा रिसर्च झालेला आहे. सुरवातीला तर ही मालिका अतिशय लोकप्रिय झालेली. पण तेच तेच स्टॉक शॉट्स, गचाळ एडिटिंग, मेकअप दादाचे कच्चं काम त्यामुळे संतोष आयचीत ह्यांच्या हातातून मालिका वाहावत जात आहे. बाळूमामाच्या मुख्य भूमिकेत काम करणारे सुमित पुसावले हे कमालीचे कलाकार आहेत, हे प्रत्ययास येते आहे. तरीसुद्धा स्टॉक शॉट्सनी तेच तेच दाखवण्याऐवजी डीओपी आणखी छान काम करू शकतात. पण एकदम नवीन कलाकारांकडून काम करून घेणं ही सोपी गोष्ट नाही, हेही तेवढच खरे.

सरतेशेवटी आपण तिसऱ्या विभूतींकडे वळूया. स्वामी समर्थांची कलर्स मराठी चॅनलवर दररोज आठच्या ठोक्याला प्रसारित होणारी मालिका मात्र अतिशय खालच्या दर्जाची आहे असं माझं प्रांजळ मत आहे. मीसुद्धा एक स्वामीभक्त आहे. पण अतिशय नाटकीय आणि भडक अंगाने सादर होणारी ही मालिका लोकांच्या पसंतीस आलेली नाही. जास्तीत जास्त भर दिला गेला आहे तो शारीरिक अभिनयावर. रामाचार्य, त्यांचे अनुयायी, दाजीबा या पात्रांचा शारीरिक तमाशा मालिकेची सात्विकता हरवून टाकतात. मेकअप दादांचं गचाळ काम, संवादातल्या त्रुटी, डीओपीची फोटोग्राफी, या सर्व बाबी हलक्या दर्जाच्या वाटतात. स्वामी समर्थ विविध चॅनलने ह्यापूर्वीही रसिकांसमोर सादर केले. त्यातल्या त्यांत उजवा ठरलेला समर्थ म्हणजे प्रफुल्ल सामंत ह्यांनी सादर केलेला. सरतेशेवटी एपिसोड पुढे न्यायचा असेल तर कलर्स मराठीला विलनगिरीशिवाय पर्याय दिसतच नाही. त्यामुळं बऱ्याच रसिकांनी मालिका पाहण्याचं सोडून दिलेलं आहे. ही अतिशय गंभीर बाब चॅनलच्या पॅनलने लक्षांत घेतली पाहिजे आणि तीसुद्धा लगेच...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

Goa News Live: लुथरा बंधुंना घेऊन दिल्लीतून निघाले गोवा पोलिस

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर, 50 हजारांच्‍या हमीवर मुक्‍तीचा आदेश

Prithvi Shaw-Sapna Gill: 'विनयभंगाचे आरोप खोटे, माझा अपमान करण्याचा प्रयत्न'; 'पृथ्वी शॉ'नं सपना गिलचे आरोप फेटाळले

ZP Election: गोवा जपण्यासाठी योग्य व्यक्तीला मत द्या! समाज कार्यकर्त्यांची हाक, शहाणपणाने मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT