World Environment Day Dainik Gomantak
ब्लॉग

पर्यावरण संरक्षण प्रत्येकाची जबाबदारी

गोमंतकीय तरूणाईची भावना: यंदाची संकल्पना ‘फक्त एक पृथ्वी’

दैनिक गोमन्तक

पणजी: आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन या दिवसाठी यंदा संयुक्त राष्ट्रसंघाने 2022 साठी ‘फक्त एक पृथ्वी’ (ओन्ली वन अर्थ) ही संकल्पना दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,अशा प्रतिक्रिया गोव्याच्या तरूणाईने व्यक्त केल्या आहेत.

(Environmental protection is everyone's responsibility)

इ.स.1974 पासून संयुक्त राष्ट्र संघाद्वारे दरवर्षी एक संकल्पना (थीम) ठरवून त्या अनुषंगाने जगभरातील देश पर्यावरण दिन साजरा करतात. कोरोना महामारीनंतर नुकतेच कोठे जग सावरत आहे. गेल्या दोन वर्षात आरोग्य तसेच पर्यावरणाचे महत्व जगातील प्रत्येक नागरिकाला कळून चुकले आहे.

या ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवरच केवळ जीवसृष्टी आहे, त्यामुळे तिचा सांभाळ करणे तिला सदोदित हरित ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच प्रत्येकाने पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. आता केवळ पर्यावरणावर उपदेश देऊन चालणार नाही तर प्रत्यक्षात कृती करणे देखील तितकेच महत्वाचे आहे,अशी भूमिकाही काही युवकांनी मांडली.

प्रतिक्रिया

जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जूनला साजरा केला जातो, कारण प्रत्येकामध्ये जागृती व्हावी आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे. प्रत्येक माणसाने वेळात वेळ काढून एक तरी रोप वा झाड लावावे आणि पर्यावरण वाचवावे. फक्त घोषणा देऊन नाही चालणार, पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने मोलाचे योगदान दिले पाहिजे.

चैतन्य प्रभू बोरकर

जी. व्ही. एम. वाणिज्य महाविद्यालय, फोंडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT