Doctor Patient Relationship  Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: डॉक्टर-रुग्ण संबंध

त्याचबरोबर रुग्णांच्या हक्कांची आणि डॉक्टरांच्या कर्तव्यांचीही चर्चा

दैनिक गोमन्तक

उपयोजित नीतिमीमांसेची सुरवात मुख्यतः जैव-वैद्यकीय क्षेत्रातील प्रश्नांपासून झाली. तथाकथित वैज्ञानिक संशोधनाच्या नावाखाली मूलभूत मानवी हक्कांची, मानवी प्रतिष्ठेची पायमल्ली दुसऱ्या महायुद्धादरम्यान छळ-छावण्यांमध्ये केली गेली होती. त्या संदर्भात संशोधनातील व्यक्तींच्या हक्कांची चर्चा सुरू झाली.

त्याचबरोबर रुग्णांच्या हक्कांची आणि डॉक्टरांच्या कर्तव्यांचीही चर्चा सुरू झाली. शिक्षक, वैद्य यांना एके काळी समाजात आदर मिळत असे. इतर व्यवसायांपेक्षा हे दोन्ही व्यवसाय आदरणीय श्रेणीतले मानले गेले. आज मात्र हे ‘व्यवसाय’ न राहता केवळ पैसे कमवून देणारे ‘धंदे’ झाले आहेत, अशी तक्रार आपण अनेकदा ऐकतो.

आधुनिक काळात खूप बदललेल्या वैद्यकीय व्यवसायासंबंधीचे नैतिक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत, हे स्वाभाविकच आहे, कारण शेवटी प्राणांशी गाठ आहे!रुग्णालयांचे एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जे रूपांतर झालेले आपण बघतो, त्यामागचे हे कारण आहे.

वैद्यकीय व्यवसायात विशेषज्ञांचे प्रमाण वाढले आहे आणि ‘कौटुंबिक वैद्य’ हा प्रकार मागे पडला आहे. लोकसंख्यावाढीमुळे रुग्णांच्या मानाने डॉक्टरांची व प्रशिक्षित आरोग्य सेवकांची संख्या अपुरी आहे. यामुळे डॉक्टर रुग्णाला कमी वेळ देऊ शकतात. या सगळ्याचा परिणाम डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात आधी असणारे कौटुंबिक स्वरूपाचे संबंध दुरावण्यात झाला आहे.

डॉक्टर-रुग्ण संबंधातील नैतिक समस्यांच्या चर्चेतला एक प्रमुख मुद्दा असा की डॉक्टर आणि रुग्ण या नात्यात ते दोघे कधीच एक पातळीवर नसतात. आजारी असल्यामुळे रुग्ण त्रस्त असतो. रोगमुक्त होण्यासाठी डॉक्टरांवर अवलंबून असतो. डॉक्टरांकडे असणारे ज्ञान, कौशल्य, अनुभव रुग्णाकडे नसतात. त्यामुळे तो एक प्रकारे हतबल असतो.

या व्यवसायात पूर्वी डॉक्टरांचा अधिकार बिनतक्रार मान्य केला जायचा. पण नव्या संदर्भात हे लक्षात आले की निरंकुश अधिकार दिला गेला तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत रुग्णांवर अन्याय होऊ नये यासाठी रुग्ण-हक्कांची कल्पना मांडली गेली.

वैद्यकीय व्यवसायात निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी चार मार्गदर्शक तत्त्वे सांगितली गेली. रुग्णाला स्वयंनिर्णयाचा अधिकार देणे, रुग्णाचे हित करणे, रुग्णाचे अहित न करणे आणि न्याय ही ती चार तत्त्वे आहेत. आपल्याला सुचवलेले उपचार घ्यायचे आहेत की नाहीत हे ठरवण्याचा अधिकार रुग्णाला असतो.

उपचारांसाठी रुग्णाची संमती आवश्यक असते. रुग्णाचा आजार, त्यांवरचे उपचार, त्यांचे परिणाम यांची पुरेशी माहिती त्याला समजेल अशा भाषेत देणे हे डॉक्टरांचे कर्तव्य असते.

त्याचबरोबर रुग्णाला स्वतःबद्दल अत्यंत खासगी माहिती डॉक्टरांना द्यावी लागली, तर सर्वसाधारणपणे ती माहिती डॉक्टरांना गोपनीय ठेवावी लागते. रुग्ण म्हणजे वस्तू नाही तर व्यक्ती आहे याचे भान ठेवून त्याच्याशी वर्तन अपेक्षित असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT