आली आली दीपावली Dainik Gomantak
ब्लॉग

आली आली दीपावली

सणाच्या नावातच सणाचे स्वरूप स्पष्ट होते.

दैनिक गोमन्तक

सणाच्या नावातच सणाचे स्वरूप स्पष्ट होते. ‘दीपावली’! दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे शृंखला. दिव्यांची शृंखला! एका शुभप्रसंगी केलेली दिव्याची आरास, हजारो वर्षानंतर परंपरा बनून, एका सुंदर सणाचे निमित्त बनते हेच मुळात किती सुंदर आहे. खरा शुद्ध शब्द ‘दीपावली’ हाच आहे.

कार्तिक महिन्यात, पावसाळी शेतीची कापणी झाल्यानंतर प्रफुल्लित झालेल्या शेतकरी मनांचा हा सोहळा आहे. सहाव्या-सातव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘पद्म’ आणि ‘स्कंद’ पुराणात दीपावलीचा उल्लेख आढळतो. 7 व्या शतकात राजा हर्षने लिहिलेल्या ‘नागानंद’ या संस्कृत नाटकात या सणाला ‘दीपप्रतिपदुत्सव’ तर 9 व्या शतकात ‘काव्यमीमांसा’ या आपल्या ग्रंथात राजशेखर या उत्सवाला ‘दीपमालिका’ असे संबोधतो. 11 व्या शतकातला अल बेरूनी हा प्रवासी म्हणतो की दीपावली हा उत्सव कार्तिक महिन्याच्या नव्या चंद्रदिनी हिंदू साजरा करतात.

अर्थात सामान्यपणे दीपावलीला रामायणाशी अधिक जोडले जाते. असे मानले जाते की 14 वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा वध करून रामाने सीतेसह अयोध्येत याच दिवशी प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासीयांनी शहरभर दिव्यांची आरास मांडली होती आणि तेव्हापासून दीपावली साजरी व्हायला सुरुवात झाली.

त्याशिवाय दीपावलीचा उत्सव देवी लक्ष्मीशी देखील जोडला गेलेला आहे. देव-दानवांनी केलेल्या सागर मंथनातून देवी लक्ष्मी याच दिवशी प्रकट झाली असे मानले जाते. त्याच दीपावलीच्या रात्री धन आणि समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या देवी लक्ष्मीने आपला पती म्हणून श्री विष्णूला निवडले आणि त्यांच्याशी विवाह केला. एका पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने या दिवशी एक अत्याचारी राजा नरकासुराचा वध करून जनतेला आनंदी केले. त्यावेळी हर्षभरित लोकांनी तुपाचे दिवे प्रज्वलित करून नरकासुरावरील विजय साजरा केला होता.

दीपावलीचा संबंध फक्त हिंदू धर्माशीच आहे असे नव्हे तर जैन या धर्मात देखील दीपावली साजरा करण्याची परंपरा आहे. महावीर स्वामींचा निर्वाण दिवस हाच होता. त्यांना मोक्ष प्राप्त झाला आणि ह्याच दिवशी त्यांचे परमशिष्य गौतम गणधर यांना ज्ञान प्राप्त झाले. याच दिवसाच्या मुहूर्तावर 1577 साली सुवर्ण मंदिराचा शिलान्यास घडला म्हणून शीख धर्मात देखील दीपावलीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आताच्या काळात तर दीपावली आर्थिक उलाढालीच्या संदर्भात महत्त्वाचा सण बनला आहे. वस्तू-कपड्यांच्या खरेदीला या सणाच्या निमित्ताने विशेष जोर चढतो. या सणासुदीत केलेल्या खरेदीला शुभ असे मानले जाते. विशेषत: दीपावली हा भारतात सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीचा सर्वात मोठा मोसम आहे.

बृहदारण्यक उपनिषदातील प्रार्थना दिव्यांचे आणि प्रकाशाचे महत्त्व अधोरेखित करते. या दीपावलीत ही प्रार्थना तुम्हा-आम्हा सर्वास फळास येवो.

असतो मा सद्गमय

तमसो मा ज्योतिर्गमय ।

मृत्योर्मा अमृतं गमय

ओम शांती: शांती: शांती: ।।

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT