Family  Dainik Gomantak
ब्लॉग

शोध, समाजातील वाढत्या उथळपणाचा!

आजी-नातवांचे, वडील, आई-मुलांचे, भाऊ-बहिणींचे संवाद कमी कमी होत, संपत आले; डॉ. नंदकुमार कामत

दैनिक गोमन्तक

इंग्रजीतील ''डंब'' किंवा ''डंबनेस'' याचे मराठीत ''उथळपणा'' वा ''बथ्थडपणा'' असे जरा विस्कळीत भाषांतर होते. संगणक व इंटरनेट युगात संपूर्ण मानवी समाजातील उथळपणा व बथ्थडपणा कसा वाढत आहे, यासंबंधी ''निकोलस कार'' या विद्वानाने कठोर भाषेत काही पुस्तके लिहिली आहेत. त्याची या विषयावरील व्याख्याने गोव्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांना मुळीच आवडणार नाहीत. माझे उथळपणा व बथ्थडपणावरचे संशोधन गेली 30 वर्षे चालले आहे. पण उथळपणा व बथ्थडपणाचे खरे अनुभव विद्यमान शतकात प्रवेश केल्यापासूनच यायला लागले.

गोमंतकीय समाजातील गांभीर्य या शतकाच्या आरंभापासून कमी होत गेले. जागतिक आर्थिक उदारीकरणामुळे करमणुकीची, मनोरंजनाची परवडण्यासारखी विपुल साधने उपलब्ध झाली. ''डायरेक्ट टू होम'' चॅनेल्स घरोघरी अवतरल्यावर हें बघू की तें बघू अशी ग्राहकांची स्थिती होऊ लागली. आजी-नातवांचे, वडील, आई-मुलांचे, भाऊ-बहिणींचे (Family) संवाद कमी कमी होत, संपत आले. शिक्षण क्षेत्रातील कायम नोकरदारांची कमाई प्रचंड प्रमाणावर वाढली. त्यामुळे एकेकाळी या व्यवसायाकडे पाठ फिरवणारे अध्यापनाचे व संभाषणाचे कसलेही कौशल्य नसताना मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रात शिरले. त्यामुळे बथ्थड-उथळ संस्कृतीचा भरभक्कम पाया रचला गेला.

मला संशोधनांती एक गोष्ट लक्षात आली. गोवा विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थी , विद्यार्थिनीला पहिल्या इयत्तेपासून पदवी स्तरापर्यंत एकच कानमंत्र सारखा दिला जायचाः फक्त जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठीच आवश्यक ते शिका, त्याबाहेरचे सगळे वर्ज्य. म्हणजे शिक्षकांनी गुण देणारे प्रकल्प करायला लावले तरच विद्यार्थी आपल्या गावांचा वा शहरांचा इतिहास, भूगोल वगैरे धडपडून शिकणार. आता या विक्रमी गुण व सुवर्णपदक मिळालेल्या विद्यार्थिनीकडे वळूया. कुठचा विद्यार्थी कुठून येतो हे माहीत असल्याने मी एकेकाकडे वळून विचारायला सुरुवात केली की तुमच्या परिचयाच्या भागात तुम्ही कसे व कुठे वृक्षारोपण करणार? कांहीनी थातुरमातुर उत्तरे दिली.

याबाबतीतही फार उथळपणा दिसून आला. काही विद्यार्थ्यांनी पदवीसाठी वनस्पतीशास्त्र विषय घेतला असूनही आयुष्यात एकही रोपटे स्वतःच्या हाताने लावून कधी वाढवले नव्हते. पण त्यांना सरांच्या नोट्स तोंडपाठ असत. शेवटी हुशारोत्तम विद्यार्थिनीची पाळी आली. ''आता तू सांग, तुझ्या परिचयाच्या भागात म्हणजे त्या दक्षिण गोव्यातील भागात वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईड शोषून घेण्यासाठी कुठे बरे झाडे लावता येतील?’ तर अत्यंत निरागसपणे ही सुवर्णपदक विजेती बोलती झाली, ''सर, रस्त्यावरील खड्ड्यांत आपण झाडे लावू शकतो.'' मी ऐकतच राहिलो. वर्गात अकस्मात शांतता पसरली.

हुशार विद्यार्थिनीला कोण हसून दुखवणार? मी संयमाने व गांभीर्याने तिला विचारले ''ठीक आहे, पण रस्त्यातच का आपण त्या खड्ड्यात झाडे लावायची'' यावर तिने दिलेल्या उत्तराने आपल्या शिक्षणक्षेत्रातील अधिकृत बथ्थडपणावर शिक्कामोर्तब झाले ''सर, मी बसने घरी जात असताना काही दिवसांपूर्वी मुख्य रस्त्यावर अनेक लोक खड्ड्यांत झाडे लावताना बघितले. त्यांनी खूप झाडे खड्ड्यांत लावली होती.'' तिच्या उत्तराने मी थक्क झालो. ती उत्तर देऊन माझे समाधान झाले असावे, असे मानून खाली बसली. मी म्हणालो, ''तुझी बघण्यात व समजण्यात चूक झाली.

तुला कळायला हवे होते की ते लोक रस्त्यावरील खड्डे दुरुस्त केले नाहीत म्हणून प्रतिकात्मक आंदोलन करीत होते. पण असे करणे बेकायदेशीरच नव्हे तर हास्यास्पद आहे. " गंमत म्हणजे आपली समजण्यात चूक झाली हे त्या हुशार विद्यार्थिनीने कधीच मान्य केले नाही. पूर्ण पाठांतराधारीत अभ्यासाचे तंत्र हस्तगत करून तिने आजवर आपला उथळपणा व बथ्थडपणा लपवला होता. आज गोव्यातील सुवर्णपदक मंडीत काही विद्यार्थी-विद्यार्थिनींना साध्या-साध्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देणे जमणार नाही. भिंतीवरील ट्युबलाईट बटण दाबल्यावर कशी प्रकाशमान होते वा डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याचा ''ओहमच्या नियमांशी'' व मायकेल फॅरडेशी संबंध काय, हे बहुसंख्य विद्यार्थ्यांना सांगता येणार नाही.

त्यांच्याच शिक्षकांनी व पालकांनी त्यांना विज्ञान व तंत्रज्ञान काहीतरी जादूसारखे आहे असे मनात भरवलेले असते. त्यामुळे माझ्या संशोधनात सिद्ध होत गेले की समाजातील बुद्धिवादी चौकसपणा, सभ्य शंकेखोरपणा व निर्मळ चिकित्सक परंपरा संपत गेली व त्याउलट बथ्थडपणा व उथळपणा मागील 20 वर्षांत फार वाढत गेला. गेल्या दशकात तर एक नवी भयावह ग्राहककेंद्रित संस्कृती अवतरली. हिला ''मिनीमालीझम'' वा लघुतमवाद म्हटले जाते. हे ''मिनीमालिस्ट'' समाजाचा ''ग्रहणकाळ'' अथवा ''आकलन काळ'' म्हणजे इंग्रजीतील ''ॲटेंशन स्पॅन'' कमी झाल्याचा दावा करतात. पत्रकारितेत ''मिनीमालीझम'' आल्यावर लेखांची, स्तंभांची शब्दमर्यादा घटत गेली.

पंधरा वर्षांपूर्वी दुसऱ्या एका दैनिकाचे संपादक म्हणाले होते, स्तंभ- ''बाईट साइझ'' म्हणजे छोटे-छोटे हवेत. त्यांच्या सल्लागारांनी म्हणे त्यांच्या डोक्यात भरवले होते की वाचक व वाचन आता उथळ होत चाललेय. त्यांना लांबलचक गंभीर लेख वाचायला वेळ असला तरी त्यासाठी प्राधान्य नाही. त्यामुळे एका मोठ्या लांबलचक लेखाच्या जागेत चार-पाच वेगवेगळ्या विषयावरचें चुटपुटीत स्तंभ द्यायचे. वीस वर्षांपूर्वी मी वेगवेगळ्या वृत्तपत्रात तीन ते चार हजार शब्दांचे प्रदीर्घ अभ्यासपूर्ण लेख लिहायचो व ते खूप वाचले जायचे. तेव्हा साप्ताहिक स्तंभही सरासरी 1500 शब्दांचे असत. नंतर ही शब्दमर्यादा 1200, 1100 करता करता 700-800 वर येऊन पोहोचली.

एका आज बंद पडलेल्या कोकणी दैनिकाच्या संपादकाने विनंती केली होती की त्यांना रविवारच्या प्रत्येक आवृत्तीत विक्रमी म्हणजे 35-40 स्तंभ द्यायचे आहेत म्हणून. माझा रविवारचा स्तंभ मी आधी ठरलेल्या 800 शब्दांवरून फक्त 400 शब्दांपर्यंत आटोपता घ्यावा. मी त्याना जरा कुचेष्टेनेच म्हणालो ''अहो, 400 शब्दांचा गद्य स्तंभ कसा लिहिणार? त्या ऐवजी मी दर रविवारी एक दीर्घकविताच देतो- 400 शब्दांची.'' अर्थात समाजाचा, वाचकांचा ''ॲटेन्शन स्पॅन'' संकुचित व्हायला पत्रकारिता क्षेत्र, संपादक वगैरे मुळीच जबाबदार नाहीत. उथळपणा आज आमूलाग्र पसरलेला आहे. बथ्थडपणाला तर मर्यादाच राहिलेली नाही.

कुठच्याही गोष्टीचे उत्तर आज इंटरनेटवर सापडू लागले आहे. त्यामुळे ''निकोलस कारला'' प्रगत, पाश्चिमात्य समाजात जो ''डंबनेस'' दिसला तो आता गोव्यात सर्वत्र सभा, संमेलने, परिषदांतूनही दिसू लागला आहे. बथ्थड मुलांना कसलेही प्रश्न विचारता येता नाहीत. ज्या दिवशी पाठांतरावर आधारित परीक्षा पद्धती कायमची निकालात निघेल त्यावेळी समाजात पाठांतरावर आधारित परीक्षा घेण्यासाठी मोठी व हिंसक आंदोलने होतील. 21 व्या शतकात कुणालाही आपली बथ्थडता, उथळपणा उघड झालेला नको आहे. गेल्या तीस वर्षात गोव्याच्या बथ्थडतेला, उथळपणाला आमच्यासारख्या कठोर निरीक्षकांची अडचण होत आली आहे. पण त्यामुळे असे सामाजिक चवीला कडवट लागणारं संशोधन मुळीच थांबणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT