Destroyed city in Goa Dainik Gomantak
ब्लॉग

वास्को रया गेलेले शहर

एका शहराची रया कशी कळते?

दैनिक गोमन्तक

एका शहराची रया कशी कळते? शहरामधल्या बागांचे (Garden) आणि सार्वजनिक ठिकाणांचे रूप बघून शहराची एकंदर स्थिती लगेच लक्षात येते. तिथल्या राजकर्त्यांची आणि अधिकाऱ्यांची मानसिकताही कळते. वास्को शहरामधल्या सार्वजनिक जागांची स्थिती पाहता या शहराच्या व्यवस्थापनाची दुर्दैवी अवस्था लक्षात यायला वेळ लागत नाही.

या बंदर शहरात, मुरगाव नगरपरिषदेच्या अखत्यारीतील पाच कारंजी आणि तीन बागा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही सर्व कारंजी आणि बागा जीर्ण अवस्थेत पडून आहेत. नगरपालिकेद्वारे होणाऱ्या देखभालीच्या अभावामुळे प्लंबिंग, एसी उपकरणे, रंगीबेरंगी दिवे तसेच कारंज्याच्या मोटर्स एकतर गंजल्या आहेत किंवा गायब झाल्या आहेत. बंदर शहरातील नागरिकांनी मुरगाव (Mormugao) नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे दुरुस्ती व देखभालीसाठी नियमित तक्रारी केल्या आहेत. परंतु गंमत म्हणजे 'अ' वर्ग समजल्या जाणाऱ्या वास्कोची नागरी संस्था आर्थिक टंचाईचे कारण देत काम करण्यास अपयशी ठरली आहे.

"परिषदेची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत असल्याने, आम्ही ते बदलू किंवा दुरुस्त करू शकत नाही. मुरगाव नगरपालिकेने ‘कॉर्पोरेट सोशियल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) योजनेतंर्गत कारंज्यांची कामे हाती घेण्यासाठी कॉर्पोरेट हाऊसेस आणि इतर वित्तीय संस्थांशी संपर्क साधला होता. मात्र त्यात आम्ही यशस्वी ठरलो नाही”. अशा त्यांच्या उत्तरामधून परिस्थिती स्पष्ट होते.

खारीवाडा येथील टीबी कुन्हा चौकात असलेला कारंजा पंधरा वर्षांपूर्वी ‘सीआरएस’ निधी अंतर्गत मुरगाव येथील अन्य एका कॉर्पोरेट हाऊसने 10 लाखांहून अधिक खर्च करून विकसित केला होता. सुरुवातीला कारंजे चांगले चालत होते आणि ते वास्कोमधील पर्यटकांचे (Tourist) आकर्षणही बनले होते. मात्र, या कारंज्याची स्थितीही मुरगाव नगरपालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दयनीय झाली. कारंज्यालगतचा परिसर आता भिकारी व इतर असामाजिक घटकांकडून वापरला जातो आहे.

सुप्रसिद्ध सुब्राई जोशी चौकाला लगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ असलेल्या मिनी गार्डनमध्ये असलेल्या कारंज्याकडेही असेच दुर्लक्ष झाले आहे. 2008 साली या कारंज्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कॉर्पोरेट हाऊजिसने सीएसआर फंडांतर्गत राखून ठेवलेला पैसा शेवटी त्यानी अन्य खर्चात बदलला, कारण मुरगाव नगरपालिकेकडे देखभालीसाठी वेळ नव्हता.

या ठिकाणी असलेल्या कारंज्याच्या ठिकाणी पावसाचे पाणी अजून तसेच भरलेले आहे. या पाण्यात बुरशी निर्माण होऊन त्यात किडे तसेच मच्छरांची पैदास झाली आहे.आणखीन एक कारंजा सेंट अँड्र्यू चर्चच्या समोर हुतात्मा चौकात आहे. या कारंज्याची तीन वेगवेगळ्या प्रसंगी लाखो रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आले असले तरी जीर्ण होणेच त्याच्या नशिबी बाकी होते. पाचवे कारंजे मुरगाव म्युनिसिपल चिल्ड्रन पार्कच्या आत (हॉटेल ला पाझ गार्डनच्या समोर) स्थित आहे. तीन वेळा बंदर शहरातील काही कॉर्पोरेट हाऊसेसनी जुन्या कारंज्याच्या जागी नवीन कारंजे लावून लाखो रुपयांचा निधी दिला. पण तेही कोणतीही देखभाल न होता दुर्लक्षित राहिले. 02 जून 2011 मध्ये या कारंज्याचे उद्घाटन माजी महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्या हस्ते करण्यात आले होते. गोवा (Goa) शिपयार्डने हे कारंजे (सीएसआर) योजनेंतर्गत पुरस्कृत केले होते.

सर्वात जुने कारंजे वास्को (Vasco) रेल्वे स्थानकासमोर आहे. 2002 मध्ये सुमारे1 लाख रुपये खर्च करून हा कारंजे बसविण्यात आले आहे. रेल्वे स्थानकासमोरील हे रंगीबेरंगी कारंजे रेल्वे स्थानकाच्या समोरील भागात सौंदर्यात भर घालण्याची संकल्पना होती. परंतु देखभाली अभावी तो उद्देश अपूर्णच राहिला. दोन वेळा राज्य प्राधिकरणांनी, कॉर्पोरेट घराण्यांच्या मदतीने, फिटिंग्ज बदलल्या परंतु खर्च केलेला सर्व पैसा पाण्यात गेला. पावसाळ्यात ही सर्व कारंजी डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे बनतात. ही डासांची कारंजी मात्र नंतर शहरभर थैमान घालत असतात.

- प्रदीप नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

Goa Drug Bust: कोलवाळ जेलजवळ गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 'इतक्या' लाखांच्या गांजासह राजस्थानच्या 19 वर्षीय तरुणाला अटक

Orry in Goa: चक्क बनियानवर 'ऑरी' गोव्यात! सोशल मीडियावर Video Viral; म्हणाला, 'माय काईंड ऑफ गोवा डे'

Goa Live News: पंतप्रधान मोदी काणकोण दौऱ्यावर! भव्य स्वागतासाठी गोवा सज्ज: मंत्री रमेश तवडकर

SCROLL FOR NEXT