Cuckoo Dainik Gomantak
ब्लॉग

सुगम पहाटे कोकीळ गाऊ लागला गाणे...

नवी पालवी आता पोपटी होऊन गर्द हिरवे रूप धारण करू लागते.

दैनिक गोमन्तक

रूपधारी फाल्गुनापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. फाल्गुन पौर्णिमेनंतर प्रत्यक्ष वसंतोत्सव सुरू होतो आणि सारी सृष्टी आपले रूपच पालटून टाकते. या ऋतूतील स्थित्यंतरे अनेक नवनवल अर्थाची असतात. नवी पालवी आता पोपटी होऊन गर्द हिरवे रूप धारण करू लागते. अनेक झाडांच्या फुलोत्सवाला एव्हाना गळती लागलेली असते तर काही फुलांचा सुगंध अजूनही चारी बाजूंनी दरवळत असतो. काही गोडसर फळे पिकू लागतात. अशात एका पक्षाचा लयदार, सुरेल आवाज अगदी पहाटेपासून कानावर पडायला सुरूवात होते. तो पक्षी म्हणजे कोकीळ.

चैत्र म्हणजेच फुलांचा रंगीबेरंगी आविष्कार, पानाचे बदलणे, सुगंधी फुलांचे दरवळ, फळांचा घमघमाट आणि कोकीळ पक्षांच्या सुरेल ताना.

वसंत ऋतूमध्ये हा सुरेल ‘कुहू कुहू’ ऐकायला आला नाही असे होतच नाही. पहाटेपासून अगदी संध्याकाळपर्यंत हे साद घालणारे गुंजन सुरू असते. नर कोकीळ पक्षाने मादी कोकिळेसाठी दिलेली ती मीलन साद असते. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर नराला हा मधुर कंठ फुटतो. मादी मात्र मूळ कर्कश आवाजाचीच राहते.

अनेकांना कोकिळा गात नाही, हे माहीतच नाही. सुरेल स्त्री गायिकेला गानकोकिळा हा किताब देणे खरं तर किती विसंगतीचं आहे! खऱ्या (मादी) कोकिळेचा आवाज खूप कर्कश असतो. गातो तो (नर) कोकीळ.

वसंत ऋतूतील मीलनानंतर कोकिळा स्वतःचे घरटे न बांधता आपली अंडी दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात देऊन मोकळी होते. नंतर पिलांचे पालन-पोषण ते दत्तक पालक करतात. त्यांचीही ‘डीएनए लॉक’ सवय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सरकते. केवळ या कुळातच पिलांचे भरणपोषण आणि काळजी न घेण्याचे उभयचरांचे वैशिष्ट्य कायम आहे. कोकिळेला इंगजीत एशियन कोयल म्हणतात तर शास्त्रीय नाव ‘युडायनिमस स्कोलोपेसिया’ आहे. यांचेच जातभाई पावशा (कुकू) मान्सूनसोबत स्थलांतर करत आपल्याकडे येतात.

-अनिल पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: कर्नाटकातील कोप्पल येथील स्पर्धेसाठी गोवा संघ रवाना

SCROLL FOR NEXT