Art Gallery Dainik Gomantak
ब्लॉग

Art Gallery: हिपासोएक्स व एकतारा चित्राविष्कार

कन्नड व संस्कृती खाते बेंगलोर यांच्या सौजन्याने वागातोर येथे चित्रप्रदर्शने भरविण्यात आली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Art Gallery कर्नाटकमधील रायचूर जिह्यातील प्रतिभाशाली चित्रकार हेमारेड्डी एन. आणि विनोदकुमार पी. मूर्ती यांचे अनुक्रमे जलरंगातील 'हिपासोएक्स ४' आणि अक्रेलीक ऑन कॅनव्हास माध्यमातील 'एकतारा' अशी दोन एकत्रित चित्रप्रदर्शने वागातोर येथील उज्वल आर्ट गॅलरीत रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

कन्नड व संस्कृती खाते बेंगलोर यांच्या सौजन्याने ही प्रदर्शने भरविण्यात आली आहेत. हेमारेड्डी हे अधू आहेत, परंतु निसर्गातील तरल भाव आविष्कृत करणाऱ्या त्यांच्या या चित्रकृती निसर्गानुभूती देतात. त्यांचा कलाविष्कार त्यांचे जगणे सुसह्य करायला सहाय्य करतो. त्यांनी आपल्या चित्रातून निसर्गाला सामावून घेतले आहे.

देशभरात प्रतिष्ठेच्या ठिकाणी हेमारेड्डी यांची चित्रप्रदर्शने झाली आहेत.

रायचूर येथील सहाव्या साहित्य संमेलनातील प्रदर्शन, सिरनगरी येथील राज्य प्रदर्शन, कोलकाता येथील गोल्डन ब्रश प्रदर्शन, हंपी आर्ट प्रदर्शन, सेंट्रल झोन कल्चरल सेंटर- तंजावर व चित्रसन्थे म्हैसूर प्रदर्शन, रायपूर, भोपाळ, नवी दिल्ली येथील समूह प्रदर्शने याचा त्यात समावेश आहे.

त्यांना प्रोफेसर टी. एस. मेहता पुरस्कार, प्रतिभा पुरस्कार, रॉयल गोल्ड (रायचूर), चित्र मयुरी, (आंध्रप्रदेश) असे पुरस्कार लाभले आहेत.

विनोदकुमार यांनी कर्नाटक चित्रकला परिषद- बंगलोर, चित्रकला जत्रा- बिदार, चित्रसन्थे- गुलबर्गा, कलवा आर्ट इंटरनॅशनल फेस्टिवल- उज्जजैन, कन्नड अँड कल्चरल खात्याचे दृश्य सिंचन प्रदर्शन, रायचूर राज्य कला दालन हैद्राबाद, दर्पण आर्ट गॅलरी- पुणे, सोलफुल स्टोक्स नॅशनल पैंटिंग एक्झिबिशन- बेंगळुरू अशा ठिकाणी आपली चित्र प्रदर्शने भरवली आहेत.

‘संगीत हे जीवन आहे म्हणून आपल्या हृदयाला ठोके आहेत’ असे म्हणणारे विनोदकुमार यांनी आपल्या चित्रातून एकतारी ही प्रतिमा वापरून संगीतमय चित्राविष्कार घडविला आहे.

त्यात विविधता आणि प्रतिकात्मकता याचा संगम आहे. बुद्धाच्या पायाला सोंडेने स्पर्श करून नतमस्तक होणारा महाकाय हत्ती ही त्यांची चित्रकृती बोलकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT