बालनाट्य Dainik Gomantak
ब्लॉग

साखळीत झाले बालनाट्य शिबिर सुरू...

रंगकर्मी अभय जोग हे या नाट्यकार्यशाळेचे संचालक असतील.

दैनिक गोमन्तक

गोवा: नाट्यशिबिरांचा मोसम पुन्हा सुरू होतोय. मध्यंतरीच्या ठप्प झालेल्या काळात, बालवयासाठी मौजेची आणि धामधुमीची ठरणारी बालनाट्य शिबिरे बंदच झाली होती. साखळी येथे ‘खेडेकर सभागृहा’त येत्या 27 एप्रिलपासून ‘अभय थिएटर अकादमी’तर्फे 10 ते 15 या वयोगटातील मुलांसाठी बालनाट्य शिबिर सुरू होत आहे. रोज सकाळी 9 ते दुपारी 1 असा कालावधी असणारे हे शिबिर 15 मेपर्यंत चालेल. रंगकर्मी अभय जोग हे या नाट्यकार्यशाळेचे संचालक असतील.

‘नाटक’ या माध्यमासाठी आवश्यक असणारे घटक- शारीरिक हालचाली, मुकाभिनय, वाचिक अभिनय, स्मरणशक्ती, उत्स्फूर्तता, समयसूचकता, निरीक्षण क्षमता, सांघिकता आदींचा विकास या नाट्यशिबिरात वेगवेगळ्या नाट्यखेळांद्वारे होईल. व्यक्तिमत्त्व विकास हेदेखील या नाट्यशिबिराचे उद्दिष्ट राहील. नाट्यशिबिराचे फलित म्हणून एक दीर्घांक या शिबिराच्या समारोप समारंभात सादर करण्यात येईल. या नाट्यशिबिरात भाग घेण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT