goa Dainik Gomantak
ब्लॉग

प्रतापगडावरचा शिवप्रताप

शहाजी राजांना अटक करणारा आणि थोरल्या संभाजी राजांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अफझलखानाचा मृत्यू हे जिजाऊ माँसाहेबांचे ध्येय शिवाजी महाराजांनी पूर्ण केले.

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वेश बोरकर

आदिलशहाचा मोठा फौजफाटा विजापूरहून शिवाजी महाराजांच्या स्वराज्यवर जून १६५९ मध्ये लढायला निघाला.त्या वेळेस शिवाजी महाराजांचे स्वराज्य फार काही मोठं नव्हते. आदिलशहा चे एके ऐक सरदार महाराजांकडून मारले जात होते.

आदिलशहाच्या दरबारात भय होता, शिवबाचा काटा काढण्यासाठी आदिलशहाची बडी बेगम ने विजापूर दरबार भरवला आणि विचारले " आहे का कोणी तयार त्या शिवा शी लढायला ? दरबारात शांतता पसरली ". तेवढ्यात धिप्पाड देहाचा सरदार अफझल खान उठला आणि म्हणाला "मी पकडून आणतो त्या शिवाला, जिवंत किंवा मृत, जातो कुठे तो ". मोठा फौजफाटा घेऊन जून १६५९ मध्ये अफझल खान निघाला.

स्वराज्यावर आलेल्या संकटाची बातमी ऐकल्यावर शिवाजी महाराजांनी आपला मुक्काम राजगडावरून घनदाट वाईच्या जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या किल्ले प्रतापगड येथे हलवला. वाटेत येताना अफझल खान देवळे पाडत व मूर्तिभंजन करत आला.

अफझलखानाने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदिरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदिरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला.

खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. तो पूर्वी वाई-महाबळेश्वरचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती. राज्यांनी त्याला गडावर भेटीचे निमंत्रण दिले. १० नोव्हेंबर १६५९ ,सकाळी ११ वाजता भेटीची वेळ ठरली.

किल्ले प्रतापगडावर भवानी मातेच्या मूर्तीची व नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंगाची पूजा उरकून शिवाजी महाराज निघाले,निघताना शिवाजी महाराजांनी स्वतःकडे एक तलवार, कट्यार आणि वाघनखे ठेवली होती. खानाकडे देखील एक तलवार आणि कट्यार होती. भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांना बघताच तो म्हणाला."मी तुला प्रत्यक्ष सर्व शक्तिशाली विजापूर दरबारात घेऊन जाऊन आदिलशहा समोर हजर करतो.

घाबरू नकोस. हात मिळवणी कर आणि मला आलिंगन दे." असे म्हणून त्याने राजांना मगरमिठीत घेतले. उंचीला जास्त असणाऱ्या खानाने राजांचे डोके दाबून तो आता पाठीवर कट्यारीने वार करणार तेवढ्यात राजांनी एका क्षणात आपली मान त्या मगरमिठीतून सोडवून घेऊन वाघनखे खानाच्या पोटात खुपसली. काही अंतरावर उभे असणाऱ्या अंगरक्षक आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनाच नव्हे तर खुद्द खानाला देखील अनपेक्षित असा हा हल्ला होता. पापणी लावण्यास वेळ लागत नाही इतक्या कमी वेळात राजांनी खानाचा कोथळा बाहेर काढला होता.

तेवढ्यात बडा सय्यद धावून आला, राजांवर वार करण्यासाठी उचललेला त्याचा हात जिवा महालाने खांद्यापासून वेगळा केला. हीच संधी साधून आपली आतडी दोन्ही हातात पकडून खान पालखीकडे धावला, भोई पालखी घेऊन पळू लागले, पण संभाजी कावजीने सगळ्या भोईंचे पाय तोडून टाकले, पुढच्या काही क्षणांत संभाजी कावजीने अफझल खानाचे मुंडके धडावेगळे केले आणि खानाचे सर्व अंगरक्षक तिथल्या तिथे कापले गेले. शिवाजी महाराज, पंताजी आणि महाराजांच्या अंगरक्षकांना घेऊन गडाकडे त्वरित रवाना झाले.

अवघ्या काही क्षणात चित्र पालटले होते. शिवाजी महाराज आता खानाला भेटणार म्हणजे तह करणार ह्या विचारात असलेल्या अफझल खानाच्या फौजेला कसलाच मागमूस लागला नव्हता. तिकडे मराठ्यांनी इशाऱ्याचे कर्णे फुंकले.

शिवाजी महाराजांची फौज तयार होतीच. खानाच्या सोबत आलेल्या उरल्या-सुरल्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवला, वाई तळावर असलेल्या खानाच्या फौजेचा सेनापती नेताजी पालकरने धुव्वा उडवला. त्याने मुसेखान आणि फाझलखान यांची दाणादाण उडवून दिली. मोरोपंतांनी पारघाटावर संपूर्ण नियंत्रण मिळवले. अवघ्या काही तासात मराठ्यांनी विजापूरच्या फौजेचा विनाश करत एक प्रचंड मोठा विजय मिळवला.

६५ हत्ती, ४००० घोडे, १२०० उंट, ३ लाख रुपयाचे दागिने, मोठ्या प्रमाणावर उंची कापड, ७ लाख रुपये नकद याशिवाय तोफा, बंदुका आणि सर्व प्रकारचे युद्ध साहित्य मराठ्यांच्या हाती लागले. अफझलखानाचे मुंडके राजांनी राजगडी जिजाऊ माँसाहेबांना भेट म्हणून पाठवले असे म्हणतात.

राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या डाव्या कोनाड्यात ते पुरलेले आहे अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे.शहाजी राजांना अटक करणारा आणि थोरल्या संभाजी राजांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अफझलखानाचा मृत्यू हे जिजाऊ माँसाहेबांचे ध्येय शिवाजी महाराजांनी पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT