sculptor prakash pednekar  Dainik Gomantak
ब्लॉग

Art Sculptor : प्रकाश पेडणेकर यांची कला सातासमुद्रापलीकडे पोचली

प्रकाश पेडणेकर हे आपल्या निवासस्थानी लहान मोठ्या आकाराची तुळशी वृंदावने तयार करतात.

गोमन्तक डिजिटल टीम

निवृत्ती शिरोडकर

क लेच्या माध्यमातून जेव्हा एखादा कलाकार आपलं करियर घडवू पाहतो तेव्हा त्याच्या कलेला आपल्या प्रदेशापुरती किंवा राज्यापुरती मर्यादा रहात नाही. आपल्या कलाकृती दर्जेदार असतील तर त्यांना सातासमुद्रापलीकडे पोहोचणे कठीन नसते.

देऊळवाडा मांद्रे येथील मूर्तिकार प्रकाश पेडणेकर यांनी आपल्या कलेतून ही गोष्ट सिद्ध केली आहे. प्रकाश पेडणेकर हे आपल्या निवासस्थानी लहान मोठ्या आकाराची तुळशी वृंदावने तयार करतात.

त्याचबरोबरच देव देवतांची शिल्पे, वेगवेगळ्या मुर्ती ते विविध माध्यमातून बनवत असतात. ब्रास (पितळ)चा वापर करून वेगवेगळी शिल्पे त्यांनी तयार केली आहेत. त्यापैकी अनेक शिल्पे लंडन, इंग्लंड, आफ्रिका इत्यादी देशांमध्ये पोचली आहेत.

मांद्रे भागात काही काळ निवास करणार्या आफ्रिकेतील काही कलाकारांनी प्रकाश पेडणेकर यांच्या स्टुडिओत सुमारे एक महिना काम केले. ब्रास माध्यमातील काही तंत्रे त्यांनी प्रकाशकडून शिकून घेतली तर त्यांच्याकडील काही तंत्रे त्यांनी प्रकाशला शिकवली.

या कलाकृतींना सातासमुद्रापलीकडे पोहोचवण्याचं काम या आफ्रिकेतील कलाकारांनीच केलं अशी माहिती चित्रकार-मूर्तिकार प्रकाश पेडणेकर यांनी दिली.

प्रकाश पेडणेकर यांच्या निवासस्थानी वेगवेगळ्या आकाराच्या तुळशी वृंदावनाबरोबरच वेगवेगळी शिल्पे पाहायला मिळतात.

बुद्ध, साईबाबा,विवेकानंद अशा नेत्यांची भव्य शिल्पे त्यांनी तयार केलेली आहेत. केवळ आपल्या राज्यातच नव्हे राज्यापलीकडील भागातही त्यांच्या मुर्तींना मोठी मागणी असते.

प्रकाश पेडणेकर यांचे मत आहे की कोणतीही कोणतीही पारंपारिक कला किंवा व्यवसाय मन लावून, परिश्रम घेऊन केल्यास तो आपल्याला निश्चित फळ देऊ शकतो. ते विश्वासाने सांगतात,

'सरकारी नोकरीच्या मार्गाकडे न जाता आपल्या पूर्वजांचा एखादा पारंपारिक व्यवसाय, शेती, कला असेल तर त्यात युवकांनी स्वतःला झोकून द्यावे. एकदा त्या व्यवसायामध्ये मन रमलं कधीच मागे वळून पाहण्याचा प्रसंग येत नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT