Amla Benefits Dainik Gomantak
ब्लॉग

अमृताचे गुण असलेला 'आवळा' उन्हाळ्यात फायद्याचा...

थकवा दूर करण्यासाठी सर्वाधिक मौल्यवान फळ म्हणजे आवळा

दैनिक गोमन्तक

उन्हाळा सुरू आहे , उन्हे वाढत आहेत. हवामानातही कमालीचे फेरबदल होत आहेत. या ऋतूत नैसर्गिक उत्सर्जनानेही शरीरातील अनेक घटक झपाट्याने कमी होतात. त्यामुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी सर्वाधिक मौल्यवान फळ म्हणजे आवळा होय.सद्या बाजारात उपलब्ध आहेत. शेताबांधावरही ठिकठिकाणी ती आली आहेत . ताज्या फळांची चव चाखलीच  पहिजे  रोज आणि वर्षभर खा.  आयुर्वेदात आवळ्याला अमृत वृक्षाची उपमा दिलेली आहे. खरोखरच एक दिव्य वनस्पती आहे. ब्रह्मदेवाने स्वत: साठी निर्मिलेला वृक्ष असे ग्रंथात आहे. मध्यम उंचीच्या वर्षभर  हिरव्या असणाऱ्या या झाडाची शिरीरात पानगळ होते. खोडावरील साल गुळगुळीत असते. पाने फणीसारखी कातरलेली असतात.नर व मादी फुले फांदीवर झुबक्यात येतात. फळे गोल, गुळगुळीत, फिकट पिवळ्या रंगाची असतात. (Amla Benefits)

100 ग्रॅम आवळ्यामध्ये 600 ते 800 मि. ग्रॅम क जीवनसत्व असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही फळात आढळत नाही. तसेच आवळ्यामध्ये सल्फर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅगनीज, फाॅस्फरस, सिलिकाॅन, क्लोरीन, सोडियम, टॅनिन,,गॅलिक ऍसिड, ग्लुकोज, मिनरल्स, प्रोटीन, पेक्टीन, जीवनसत्व बी 1,2,3- इ. घटक द्रव्ये आढळतात. असा हा आवळा एक श्रेष्ठ फळ आहे. याचे नित्य सेवन करायला पाहिजे.आवळ्यापासून लोणचे, मिठातले आवळे, आवळ्याचा मुरंबा, सरबत, रस बनवतात. अमृतरूपी आवळ्याचे नित्य सेवन मानवाला रूपवान, बल, बुध्दी, धैर्य, सामर्थ्यवान बनवते असे आयुर्वेद म्हणते .

आवळ्याला इंग्रजीत इंडियन गुजबेरी म्हणतात त्याचे वनस्पती शास्त्रीय नाव फिलॅन्थस एमब्लिका असून फॅमिली फिलांथेसी आहे.

- अनिल पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT