Aditya - L1 Dainik Gomantak
ब्लॉग

Aditya - L1 मोहीम कशासाठी जाणून घ्या एका क्लिकवर

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘आदित्य- एल १’ अंतराळ यानाचे शनिवारी यशस्वी प्रक्षेपण झाले.

दैनिक गोमन्तक

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘आदित्य- एल १’ अंतराळ यानाचे शनिवारी यशस्वी प्रक्षेपण झाले. इस्रोची ही पहिलीच महत्त्वाकांक्षी सौर मोहीम. ‘आदित्य- एल १’ हे अंतराळ यान सूर्य-पृथ्वीच्या प्रणालीतील ‘एल १’ या बिंदूवर (लँगरेंज) प्रभामंडळ कक्षेमध्ये स्थापित केले जाणार आहे.

हे यान म्हणजे सूर्याचा अभ्यास करणारी अवकाशातील एक प्रकारची वेधशाळाच असणार आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख कि.मी.वर आहे.

कोणत्याही अडथळ्याशिवाय किंवा ग्रहणाशिवाय सूर्याचे या बिंदूवरून निरीक्षण करता येईल. ‘एल १’ या बिंदूंच्या कक्षेतून सूर्याचा किंवा सौर घडामोडींचे सातत्याने निरीक्षण करणे, हा या मोहिमेचा हेतू आहे.

आदित्य एल मोहीम ही सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली वेधशाळा आहे. या यानामध्ये एकूण सात उपकरणे (पेलोड) असतील.

त्यापैकी चार उपकरणे थेट सूर्याचा अभ्यास करतील तर उर्वरित तीन उपकरणे ‘एल १’ बिंदूवरील कणांचा व क्षेत्राचे निरीक्षण करतील.

सूर्याच्या वातावरणाचा ‘फोटोस्फिअर’ हा थर, त्यावरील लाल रंगाचा वायूचा थर व प्रभामंडळ या सूर्याच्या सर्वांत बाहेरील भागाचे निरीक्षण वेगवेगळ्या तरंगलांबीच्या माध्यमातून केले जाईल. या माेहिमेतून सौर वाऱ्यांच्या घडामोडी तसेच सूर्याच्या प्रभामंडळाचे तापमान, सूर्यावर ज्वाला निर्माण होण्याआधी आणि नंतर कोणत्या घडामोडी घडतात, सौरज्वाला आदींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळविली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT