Acting and its magnetism Dainik Gomantak
ब्लॉग

अ‍ॅक्टिंग अँड इट्स मॅग्नेटिझम

पहाटे पाच 5 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यशाळेत कलारीपयट्टू, नवरस, शरीर आणि भावना या संबंधात 8 तासांचा कठोर दिनक्रम पाळला जात होता

गोमन्तक डिजिटल टीम

अ‍ॅक्टिंगअँड इट्स मॅग्नेटिझम’ ही 8 दिवसांची नाट्यविषयक कार्यशाळा काणकोण येथील तळपण नदीच्या काठावरच्या निसर्गरम्य गावात पार पडली. हावभाव, आवाज आणि शारीरिकता या नाटकाच्या मूलभूत घटकांवर या कार्यशाळेत लक्ष केंद्रित केले गेले होते.

दर दिवशी पहाटे पाच 5 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यशाळेत कलारीपयट्टू, नवरस, शरीर आणि भावना या संबंधात 8 तासांचा कठोर दिनक्रम पाळला जात होता. गोव्याव्यतिरिक्त मुंबई, बेंगळूर, जयपूर आणि गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणावरच्या एकंदर 11 प्रशिक्षणार्थ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला.

गेली काही वर्षे थिएटर फ्लेमिंगो एक्टर्स लॅब अशा प्रकारच्या निवासी नाट्य कार्यशाळांचे आयोजन करत आली आहे. यंदाची ही त्यांची 12वी निवासी कार्यशाळा होती.

यंदाच्या कार्यशाळेत शेक्सपियरच्या ‘मॅक्बॅथ’ या प्रसिद्ध नाटकाच्या आधारावर एक विशेष नाट्यरचनेची निर्मिती सहभागी प्रशिक्षणार्थ्यांकडून करून घेण्यात आली. शरीर माध्यमाचा उपयोग करून अभिनेत्याच्या कौशल्याला अधिक सक्षम बनवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

कार्यशाळेचा समारोप मॅक्बॅथवर आधारलेल्या ‘मूकभट’ या नाट्य सादरीकरणाने झाला. कार्यशाळेत सराव केल्या गेलेल्या व्यायामांचा व रसपूर्ण हावभावांचा अविष्कार अभिनेत्यांद्वारा या सादरीकरणात केला गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 Cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT