A means of livelihood Dainik Gomantak
ब्लॉग

A means of livelihood: रणरणते आयुष्य व अनावश्यक खरेदी

रोजच्या वाटेवर बसणाऱ्या एखाद्या बाईकडून काही वस्तू गरज नसताना खरेदी करा. कदाचित त्या दिवशीची तिची ती पहिलीच कमाई असेल

गोमन्तक डिजिटल टीम

आसावरी कुलकर्णी

ऊन मी म्हणत होते. काम आटोपून थोडा विसावा घ्यावा म्हणून जरा गच्चीत बसले. एक आवाज आला.. ‘जाय गे?’ मी म्हटले या वेळी कोण आले, तर एक सत्तरीकडे पोहोचलेली स्त्री डोक्यावर पाटला घेऊन अननस घेऊन आलेली. मी म्हटले मला नकोयत अननस. ती हिरमुसली झाली, ‘घे मुगो कोणीच घेवंक ना.’ शेवटी माझ्या गळ्यात घालून ती गेलीच.

गावात एकटीच राहणारी ही बाई पोट भरण्यासाठी व्यवसाय करते. स्वतःच्या मालाची विक्री करून जे काही पैसे मिळतात त्यावर उदरनिर्वाह करायचा. त्याबाबतीत पक्की आहे. मला सेल्समनवाले दिवस आठवले, बॅग्स विकण्यासाठी विविध आस्थापनात फिरायचे, एकही बॅग विकली गेली नाही, तर रडू यायचे.

पण कुणी दया येऊन बॅग घेतो म्हटले तर नम्रतेने नाकारायचे. उन्हाची रणरण, पायपीट स्वाभिमान शिकवून जाते हे खरे आहे. हे सगळे आठवताना त्या सगळ्या स्त्रिया डोळ्यांसमोर आल्या ज्या रस्त्यावर, बाजारात, शेताच्या बाजूला शेतमाल विकण्यासाठी बसतात.

खरे तर अशा प्रकारे विक्री करणे हा खूप जुना व्यवसाय आहे. मासे, फळे, फुले, भाजी, मीठ अशा जीवनावश्यक वस्तू घेऊन विकायला बसणे हे पिढीजात चालत आलेले काम आहे.

पूर्वीच्या काळी श्रमाची कामे हे बहुधा पुरुष करायचे आणि विक्रीचे काम स्त्रियांकडे असायचे असे वाटते. स्त्रियांना शून्य व्यवहार ज्ञान असते असे ठसवून मनात भरायच्या काळात, विक्रीसाठी बसणाऱ्या स्त्रियांना पाहिले की हसू येते.

पणजीच्या हायकोर्ट बिल्डिंगकडे अशाच कितीतरी स्त्रिया बसलेल्या असतात. त्यात अगदी कोपऱ्यात बसणारी म्हातारी मला नेहमी खुणावायची. गेली कितीतरी वर्षे मी या बाईला, मौसमी फळे आणि केळी विकताना पाहत आले आहे.

या वर्षी मुद्दाम मी तिच्याकडे जांभळे विकत घ्यायला गेले, आणि घेता घेता तिला बोलती करण्याचा प्रयत्न केला. पण छे! तिने चेहऱ्यावरच्या सुरकुत्यादेखील हलवल्या नाहीत. मी तिला विचारले ‘गेली किती वर्षे हे काम करते आहेस?’

त्यावर ती म्हणाली, ‘कुणी मोजली आहेत?’ मी आपली त्यांच्या सुरकुत्यांवरून त्यांचे वय अमुक असेल असा तर्क बांधू लागेल. एकही अक्षर न शिकता, एखाद्या अर्थतज्ज्ञाला लाजवेल असे यांचे व्यवहारज्ञान तर थक्क करून टाकते.

‘हाडाची काडे करणे’ या वाक्प्रचाराला तंतोतंत सार्थ करणाऱ्या स्त्रिया मला स्वयंपूर्णतेच्या आधिकारिक प्रवक्त्या वाटतात. काय असेल यांच्या आयुष्याची कथा? आपण पुढल्या भागात पाहूच.

पण, तोपर्यंत आपल्या रोजच्या वाटेवर बसणाऱ्या एखाद्या बाईकडून गरज नसताना खरेदी करा.. कदाचित त्या दिवशीची तिची ही पहिलीच कमाई असेल आणि त्यातून मिळालेले पुण्य गंगेत उडी मारायच्या दुपटीने असेल यात शंकाच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT