VerSe Innovation FY26: भारतातील आघाडीची स्थानिक भाषा तंत्रज्ञान आणि एआय-आधारित कंपनी 'व्हेर्स इनोव्हेशन' (VerSe Innovation) ने आर्थिक वर्ष २०२५ (FY25) मध्ये दमदार आर्थिक आणि व्यावसायिक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने महसुलात वार्षिक ८८ टाक्यांची लक्षणीय वाढ साध्य केली असून, त्याचबरोबर EBITDA खर्चात २० टक्क्यांची मोठी कपातही केली आहे. या मजबूत कामगिरीमुळे कंपनीने नफा आणि शाश्वत वाढीसाठी भक्कम पाया रचला असल्याचे जाहीर केले आहे.
कंपनीच्या ऑपरेशन्सपासूनचा महसूल आर्थिक वर्ष २०२४ मधील १,०२९ कोटींवरून वाढून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १,९३० कोटींवर पोहोचला, ज्यामुळे ८८टक्क्यांची वाढ झाली. एकूण महसूलही ६४ टक्क्यांनी वाढून २,०७१ कोटी झाला आहे.
खर्चात शिस्तबद्धता पाळल्यामुळे कंपनीचा EBITDA खर्च (रोखरहित खर्च वगळून) वार्षिक २० टक्क्यांनी कमी झाला असून, तो (९२०) कोटींवरून (७३८) कोटींवर आलाय. या कामगिरीमुळे EBITDA मार्जिन -८९ टाक्यांवरून -३८ टक्क्यांपर्यंत सुधारला आहे.
ऑपरेशन्सपासूनच्या महसुलाच्या तुलनेत सेवांचा खर्च ११२टक्क्यांवरून ७७टक्क्यांपर्यंत कमी झाला, तर इतर ऑपरेटिंग खर्च ७७ टक्क्यांवरून ६१ टक्क्यांपर्यंत कमी झाला, ज्यामुळे कंपनीच्या कार्यक्षमतेतही सुधारणा दिसून येते.
या प्रभावी कामगिरीनंतर, 'व्हेर्स इनोव्हेशन' ने आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत संपूर्ण गटाच्या पातळीवर ब्रेक-इव्हन आणि नफा कमावण्याचे महत्त्वाचे लक्ष्य ठेवलेय. कंपनीच्या या उद्दिष्टामागे एआय-आधारित कमाईचे इंजिन NexVerse.ai, Magzter च्या सहकार्याने सुरू झालेली Dailyhunt Premium सारख्या सबस्क्रिप्शन सेवांमधील वाढ, आणि Josh Audio Calling तसेच VerSe Collab सारख्या प्लॅटफॉर्ममुळे वाढलेला कम्युनिटी सहभाग यांचा मोठा वाटा आहे. तसेच, Magzter आणि ValueLeaf सारख्या कंपन्यांचे धोरणात्मक अधिग्रहण करून कंपनीने आपले महसुलाचे स्रोत वाढवण्यावर भर दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.