Money Dainik Gomantak
अर्थविश्व-

बँकेतून PF काढण्यासाठी वापरा 'या' पद्धती

या काळात केंद्र सरकारने मदतीसाठी EPFO धारकांसाठी अनेक सवलती दिल्या आहेत.

Dainik Gomantak

नवी दिल्ली - देशात कोरोना संसर्गाने थैमान माजवले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितितभविष्य निर्वाह निधीचे पैसे तुमच्या उपयोगी पडू शकतात या काळात केंद्र सरकारने मदतीसाठी EPFO धारकांसाठी अनेक सवलती दिल्या आहेत.

परंतु, तुम्हाला जर तातडीने पैसे हवे असतील तर तुमचे खाते ज्या बँकेत आहे , तेथे तुमचे खाते EPFO लिंक असणे गरजेचे आहे.त्याकरिता बांकमधील केवायसी अपडेट असायला हवे. तसेच जर एखादी बँक दुसऱ्या बँकेत मर्ज झाली असेल तर तुम्हाला तुमचे खाते अपडेट होणे आवश्यक आहे. असे न झाल्यास तुम्हाला PF काढण्यास समस्या निर्माण होऊ शकतात.

एखादी बँक मर्ज झाल्यानंतर त्या बँकेचे अस्तीत्व नष्ट होते. यामुळे संबंधित बँकांचे IFSC कोड उपयोगात येत नाही. यामुळेच संबंधित बँकेतील EPFO धारकांनी आपली खाते अपडेट करावी , अशा सूचना दिल्या यामुळेच आल्या आहेत. यामुळेच प्रत्यक्ष बँकेत जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने तुमहाल तुमचे खाते अपडेट करता येणार आहे. यानंतरच EPFO च्या संकेतस्थळावर जुब नवीन बँकेचा तपशील अपडेट करावा.

या बँकेचे IFSC कोड ग्राह्य धरले जाणार नाही -

कर्मचारी भविष्य निधी संघटन (Employees' Provident Fund Organization) ने दिलेल्या माहितीनुसार आंध्र बँक, सिडिकेट बँक, ओरिएंटल बँक ऑफ कोमर्स , अलाहाबाद बँक युनायटेड बँक ऑफ इंडिया , कार्पोरेशन बँक यांचे IFSC कोड 1 एप्रिल 2021 पासून उपयोगात नाही.

PFOने घेतलेले निर्णय कोणते -

- EPFO च्या घोषणेनुसार, कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ज्यांनी या खात्यातून आगाऊ पैसे काढले होते, त्यांना परत पैसे काढण्याची सवलत दिली गेली आहे. या खात्यातील 75 टक्के रक्कम अथवा मूळ वेतन व महागाई भत्ता यापैकी यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे पैसे पीएफधारकांना काढत येणार आहे.

- माहामारीच्या काळात ज्या लोकांचे जॉब गेले आहे तसेच जे लोक अधिक महिन्यापेक्षा बेरोजगार आहेत. ते पीएफधारक (PF) त्यांच्या खात्यातून 75 टक्के रक्कम काढू शकतात .

- ईपीएफओच्या ईडीएलआय योजनेतंर्गत विम्याचा लाभ 7 लाखांपर्यंत वाढवला आहे. यामुळेच पीएफधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला 7 लाख रुपये मिळतील.

- ईपीएफओ खाते आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ केली आहे. आधार कार्ड ईपीएफओ खात्याशी लिंक न केल्यास कंपन्यांना PF खात्यात पैसे जमा करणे शक्य नाही.

- जर एखाद्या व्यक्तीने आपला जॉब सोडला असेल तर त्याला ईपीएफओ खात्यातून अगाऊ रक्कम काढू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT