टाटा मोटर्स त्यांच्या वाहनांची लाइनअप सतत अपडेट करत असते. गेल्या काही महिन्यांत अनेक नवीन वाहने बाजारात दाखल झाली आहेत. यामध्ये नवीन पंच, डार्क एडिशन रेंज आणि नुकत्याच लाँच झालेल्या काझीरंगा एडिशनचा समावेश आहे. यासोबतच कंपनीने सीएनजी (CNG) टियागो आणि सीएनजी टिगोरही बाजारात आणली आहे.
कंपनी आता मोठे बॅटरी पॅक असलेले अपडेटेड नेक्सन इव्ही लाँच करणार आहे. पण त्याआधीच कंपनीने सध्याच्या नेक्सन इव्ही च्या किमती 25 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. नेक्सॉन इलेक्ट्रिकचे सर्व मॉडेल महाग झाले आहेत. याशिवाय टाटाने आपल्या पेट्रोल/डिझेल (Diesel) कारच्या किमती 3 HAहजार रु.ने वाढवल्या आहेत.
टाटा नेक्सन इव्ही च्या पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, या गाडीला 30.2kWh लिथियम-आयन बॅटरी दिली जाते, जी 125bhp पॉवर आणि 245Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही 5-सीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायामध्ये उपलब्ध आहे.
टाटा मोटर्स (Tata) चा दावा आहे की नेक्सन इव्ही पूर्ण चार्ज केल्यावर 312 किमी पर्यंत धावू शकते. नेक्सन एव्ही AC चार्जरने 8-9 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते, तर DC फास्ट चार्जिंगसह केवळ एका तासात 80 टक्के पर्यंत चार्ज करता येते. टाटा नेक्सन इव्ही चा सर्वाधिक वेग 120kmph आहे. 400 किमीची बॅटरी रेंज असलेली टाटा नेक्सन इव्ही लवकरच लॉन्च होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.