savings dearness allowance hike for indian railways employees in 6th central pay commission
savings dearness allowance hike for indian railways employees in 6th central pay commission  Danik Gomantak
अर्थविश्व-

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 14 टक्क्यांनी वाढ

दैनिक गोमन्तक

रेल्वे विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकाचवेळी 14 टक्के वाढ केली आहे. हे असे कर्मचारी आहेत ज्यांना 6 व्या वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळतो. या वेतनवाढीमुळे त्यांच्या पगारात हजारो रुपयांची वाढ होणार आहे. यासोबतच 10 महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे. याबाबतचा आदेश रेल्वे बोर्डाने जारी केला आहे. (savings dearness allowance hike for indian railways employees in 6th central pay commission)

रेल्वे बोर्डाने महागाई भत्त्यात दोनदा वाढ केली आहे. त्यात म्हटले आहे की, सहाव्या वेतन आयोगांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जुलै 2021 आणि 1 जानेवारी 2022 पासून वाढवण्यात आला आहे.

केव्हा किती वाढेल

सहाव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलै 2021 पासून 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता ते 189 टक्क्यांवरून 196 टक्क्यांवर पोहोचले आहे. यासोबतच, रेल्वे बोर्डाने 1 जानेवारी 2022 पासून पुन्हा महागाई भत्त्यात 7 टक्क्यांनी वाढ केली आहे. यासह ते 196 टक्क्यांवरून 203 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाचा रेल्वे कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. वित्त संचालनालय आणि रेल्वे मंत्रालयाची मंजुरी घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाने हा निर्णय लागू केला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता

मार्चमध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. हे लाखो कर्मचारी आहेत ज्यांना 7 व्या वेतन आयोगाखाली पगार मिळतो. सध्या या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्के आहे. त्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपये आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करत सरकारने मूळ किमान वेतन 7000 रुपयांवरून 18000 रुपये प्रति महिना केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT