stock market dainik gomantak
अर्थविश्व-

Sintex Industries Delisting : सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

Sintex Industries Delisting : या शेअरची किंमत 0 निश्चित, तुम्हाला एक पैसाही मिळणार नाही!

दैनिक गोमन्तक

Sintex Industries Delisting : कर्जबाजारी सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे. तर येत्या काही दिवसांत सिंटेक्स इंडस्ट्रीज ही उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आरआयएल कंपनीची होणार आहे. खरं तर, सिंटेक्स इंडस्ट्रीजने एक्सचेंजला सांगितले आहे की, RIL आणि ACRE ने संयुक्तपणे आणलेल्या रिझोल्यूशन प्लॅनमध्ये कंपनीचे विद्यमान भाग भांडवल शून्यावर आणले जाईल आणि कंपनीला BSE आणि NSE मधून डिलिस्ट केले जावे. त्यामुळे याकंपनीचे ज्यांच्याकडे शेअर्स आहेत त्यांना काहीच किंमत मिळणार नाही.

तसेच अरमानी, ह्यूगो बॉस, डिझेल आणि बर्बेरी सारख्या लक्झरी फॅशन ब्रँडला कपड्यांचा पुरवठा करणाऱ्या सिंटेक्सकडे 27 कर्जदारांचे देय बाकी आहे. जे एकूण 7,534.60 कोटी रुपये आहे. तर फॅब्रिक व्यवसायाशी संबंधित सिंटॅक्समध्ये एरेस एसएसजी कॅपिटलचा मोठा हिस्सा आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वर्ष 2017 मध्ये, सिंटेक्स प्लॅस्टिक तंत्रज्ञान सिंटेक्स इंडस्ट्रीजपासून वेगळे केले गेले. सिंटेक्स प्लास्टिक तंत्रज्ञान पाणी साठवण टाक्या बनवते. (Reliance Industries interest for bankrupt Sintex Industries Ltd)

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सिंटेक्सचे नाव जोडताच काही गुंतवणूकदारांनी शेअर्स (Shares) खरेदी करण्यास सुरुवात केली. तर एक्सचेंज फाइलिंगमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की सिंटेक्स इंडस्ट्रीजला BSE आणि NSE मधून डिलिस्ट केले जाईल. सोमवारी सिंटेक्स इंडस्ट्रीजचा (Sintex Industries) समभाग 5 टक्क्यांनी लोअर सर्किट घेत 7.80 रुपयांवर बंद झाला.

तर ऑनलाईन स्टॉक ब्रोकरेज कंपनी झेरोधाचे (Zerodha) संस्थापक आणि सीईओ नितीन कामत (Nithin Kamath) यांनी गुंतवणूकदारांना सावध केले की, गुंतवणूकदार अजूनही त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सिंटेक्सचे शेअर्स (Shares) खरेदी करत आहेत. मात्र येत्या काही दिवसांत शेअरचे मूल्य शून्य होणार आहे. याचा अर्थ स्टॉकची किंमत 0 वर केली जाईल. तसेच कामत यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, गुंतवणूकदार माहिती अभावी सिंटेक्स इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी करत आहेत. गुंतवणुकदार केवळ स्वस्त मिळत असल्याने शेअर खरेदी करत आहेत. पण खरे कारण त्यांना अजूनही माहीत नाही.

तसेच सिंटेक्स इंडस्ट्रीजचे इक्विटी शेअर्स (Shares) डिलिस्ट केले जातील आणि दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत इक्विटी शून्य होईल. त्यामुळे जर तुम्ही सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही पैसे गुंतवले असतील तर तुमची संपूर्ण गुंतवणूक शून्य होण्याआधी तुमच्याकडे असणारे सिंटेक्सचे शेअर्स लवकर विकून टाका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT