Jet Airways Dainik Gomantak
अर्थविश्व-

जेट एअरवेज पुन्हा घेणार उड्डाण, 2022 च्या पहिल्या तिमाहीत होणार उड्डाणे सुरु

एअरलाईनच्या अधिग्रहणासाठी यशस्वी बोली लावणारे जालान कॅलरॉक कन्सोर्टियमने (Jalan Kalrock Consortium) याबाबत माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

जेट एअरवेज (Jet Airways) लवकरच उड्डाण करण्याची तयारी करत आहे. कंपनी 2022 च्या पहिल्या तिमाहीत देशांतर्गत विमान सेवा पुन्हा सुरु करणार आहे, 2022 च्या अखेरीस छोट्या अंतरावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील सुरु करण्यात येतील असं सांगण्यात आले आहे. एअरलाईनच्या अधिग्रहणासाठी यशस्वी बोली लावणारे जालान कॅलरॉक कन्सोर्टियमने (Jalan Kalrock Consortium) याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान जालान कालरॉक कन्सोर्टियमच्या (Jalan Kalrock Consortium) यांच्या मते, जेट एअरवेजचे पहिले उड्डाण दिल्ली-मुंबई मार्गावर (Delhi-Mumbai) असेल तसेच विमान कंपनीचे मुख्यालय आता मुंबईऐवजी दिल्लीत असणार आहे. विशेष म्हणजे, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने या वर्षी जूनमध्ये जेट एअरवेजसाठी जालान कॅलरॉक यांनी टाय-अपच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली आहे. कंपनीच्या दिवाळखोरी ठरावाची कार्यवाही दोन वर्षांपूर्वी सुरु झाली होती.

कंपनीचं नेमकं ध्येय काय

"जेट एअरवेज 2.0 चे लक्ष्य 2022 च्या पहिल्या तिमाहीत आणि 2022 च्या तिसऱ्या/चौथ्या तिमाहीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरु करायची असल्याचे जालान कॅलरॉक कन्सोर्टियमचे प्रमुख सदस्य मुरारी लाल जालान यांनी यावेळी सांगितले. जालान यांनी तीन वर्षात 50 हून अधिक आणि पाच वर्षांत 100 हून अधिक विमानांचा ताफा तयार करण्याची योजना आखत आहेत. अल्पकालीन आणि दीर्घकालीन व्यापारी योजनेसाठी योग्य असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

2019 मध्ये ऑपरेशन्स बंद

जेट एअरवेजने 2019 मध्ये आपले संचालन बंद केले होते. कंपनीला आपली सर्व उड्डाणे बंद करावी लागली होती. सध्या, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल ( NCLT) ने या वर्षी जूनमध्ये जेट एअरवेजसाठी जालान कॅलरॉक कन्सोर्टियमच्या रिझोल्यूशन योजनेला मंजुरी दिली. कंपनीच्या दिवाळखोरी ठरावाची कार्यवाही दोन वर्षांपूर्वी सुरु झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT