Crude oil dainik gomantak
अर्थविश्व-

Crude oil price : कच्च्या तेलाचे दर 40 डॉलरनी घसरले

कच्च्या तेलाचे दर घसरल्याने पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या होत्या. गेल्या दोन आठवड्यांत कच्च्या तेलाच्या किंमती या 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक झाल्या होत्या. ज्यामुळे देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढतील अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता सर्वसामान्यांसह देशासाठी चांगली बातमी असून कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलचे दर उतरले आहेत. त्यामुळे देशातील पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आठवड्यात कच्च्या तेलाचे दर 40 डॉलरनी कमी झाले झाले आहेत. (Crude oil prices fall from $40)

रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) सुरू असून त्यामुळे सगळ्यात जास्त परिणाम हा कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला. यामुळे 28 फेब्रुवारीनंतर प्रति बॅरलपेक्षा 100 डॉलरपेक्षा (Dollars) जास्त दराने कच्चे तेल मिळत होते. जो 139 डॉलर पर्यंत गेला होता. मात्र आता यात उतार दिसत असून प्रती बॅरेलचा दर 40 डॉलरनी कमी झाले झाले आहेत. त्यामुळे चालू आठवड्यात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्याही खाली आले आहेत.

एकीकडे कच्चा तेलाचे दर वाढत असताना देशात मात्र पेट्रोल (Petrol) डिझेलचे (Diesel) दर स्थिर होते. त्यावेळी देशातील पेट्रोलियम कंपन्याना (Petroleum companies) मोठा फटका बसला. मात्र आता कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने या कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (international market)कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी होत असून क्रूड ऑईलचे (Crude oil) दर 139 डॉलर प्रति बॅरलवरून 99 डॉलर प्रति बॅरलच्याही खाली आले आहेत. याचाच अर्थ कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सरासरी 40 डॉलरनी दर कमी झाले आहेत. तर ही बाब देशासाठी दिलासादायक गोष्ट आहे. कारण भारत हा कच्च्या तेलाचा जगातील एक मोठा आयातदार देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty: कुटबण जेटीवर SOP लागू! मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन; कामगारांची तपासणी सुरू

Bhausaheb Bandodkar: गोवा मुक्त होण्यापूर्वी, अनेक भागांत ‘भाऊसाहेब’ हे नाव लोकप्रिय होते..

David Warner: डेव्हिड वॉर्नरची 'कमाल', 'या' बाबतीत विराटला टाकलं मागे; आता शोएब मलिकच्या विक्रमावर डोळा

Ganesh Chaturthi: 'तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता'! आगमनाची तयारी सुरु; माटोळी, वाद्ये, नैवेद्यासाठी बाजारात गर्दी

Goa Crime: 3 सख्या बहिणींवर पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार; रक्षाबंधनाच्या दिवशीच प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT