auto car bike Dainik Gomantak
अर्थविश्व-

'या' कार ठरल्या टॉप 10 बेस्टसेलर

एसयूव्हीला टॉप 10 मध्ये स्थान मिळवता आलेले नाही

दैनिक गोमन्तक

कार निर्मात्यांनी फेब्रुवारी महिन्यातील कारच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये, मारुती सुझुकीने त्यांचे नंबर 1 स्थान कायम ठेवले आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कारमध्ये 7 कार मारुतीच्या होत्या. टाटा (Tata) नेक्सॉन ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही होती. याशिवाय ह्युंदाई क्रेटा आणि व्हेन्यू याही टॉप 10 मध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक कार ठरली.

टॉप 10 बेस्टसेलर कार

मारुती स्विफ्ट

मारुती डिझायर

मारुती वॅगन आर

मारुती बलेनो

टाटा नेक्सॉन

मारुती अर्टिगा

मारुती अल्टो

ह्युंदाई

मारुती सेलेरियो

ह्युंदाई क्रेटा

मारुती सुझुकी स्विफ्ट ही फेब्रुवारी 2022 मध्ये देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार होती. स्विफ्टने वॅगन आरला मागे टाकले जे याआधी सलग 3 महिने पहिल्या क्रमांकावर होती. फेब्रुवारीमध्ये वॅगन आर तिसऱ्या क्रमांकावर होती. या 10 गाड्यांमध्ये फक्त 3 SUV गाड्याच ग्राहकांच्या पसंतीच्या ठरल्या. ह्युंदाई क्रेटा, ह्युंदाई Venue आणि टाटा नेक्सॉन आहेत. पहिल्या 7 क्रमांकावर मारुती कंपनीच्या गाड्या होत्या.

नेक्सॉन नंबर 1 SUV बनली आहे

यासह नेक्सॉनने क्रेटा आणि व्हेन्यूलाही मागे टाकून देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही बनली आहे. ही कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत 5 व्या स्थानावर पोहोचण्यात यशस्वी झाली. क्रेटा शेवटच्या स्थानावर म्हणजे क्रमांक 10 वर राहिला, एसयूव्हीला टॉप 10 मध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT