ज्यांनी पारंपारिकरित्या थेट दुकानात जात वस्तू खरेदीची परंपरा मोडीत काढली. आणि किरकोळ वस्तुंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर ज्याचा थेट परिणाम झाला. मात्र ग्राहक आवश्यक बदल करत वस्तूंची विक्री करणाऱ्या अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने 200 कोटींचा दंड ठोठावला आहे. तसेच ही रक्कम 45 दिवसांच्या आत भरावी लागणार आहे. (Amazon fined Rs 200 crore )
राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणने सोमवारी अॅमेझॉन-Future डीलबाबत आदेश जारी केला आहे. याबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणने अमेरिकन ई-कॉमर्स कंपनीला 45 दिवसांच्या आत 200 कोटी रुपयांचा दंड जमा करण्यास सांगितले आहे. यामूळे अॅमेझॉन ला 45 दिवसात दंड भरावा लागणार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
हे प्रकरण अॅमेझॉन आणि Future Coupons Pvt Ltd मधील 1,400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या कराराशी संबंधित आहे. सुरुवातीला, या कराराला सर्व आवश्यक नियामक मंजुरी मिळाल्या होत्या. नंतर, फ्यूचर ग्रुपच्या कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत फ्युचर रिटेलसाठी केलेल्या डीलच्या वादावर CCI कडून मंजुरी मागे घेण्याची मागणी केली होती.
अशा गुंतवणूक सौद्यांसाठी CCI ची मंजुरी आवश्यक असते. याबाबत सीसीआयने फर्व्हर ग्रुप कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर चौकशीअंती अॅमेझॉनने काही माहिती दडपल्याचे आढळल्याने हा फटका अॅमेझॉन बसणार आहे.यावर अॅमेझॉनकडे आता एकच पर्याय उरला आहे. ज्यामध्ये अमेझॉन राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणच्या आदेशाला ती सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकते. मात्र अॅमेझॉनने याबाबत अद्याप काहीही खुलासा केलेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.